सय्यद अता हसनैन यांचा कॉलम:आपल्या भूतकाळाचा वारसा जतन‎करण्याची जबाबदारी आपलीच

‎‎‎‎‎‎‎‎‎‎दीदारगंजची प्रसिद्ध यक्षी मूर्ती 1917 मध्ये गंगा नदीच्या‎काठी सापडली होती. आज पाटणा येथील बिहार‎संग्रहालयात येणारे पर्यटक पॉलिश केलेल्या बलुआ‎दगडातील त्या मूर्तीसमोर उभे राहून तिची निर्मिती‎करणाऱ्या मूर्तिकाराच्या कौशल्याचे कौतुक करू‎शकतात. परंतु, तिच्या शोधापासून ते आज‎संग्रहालयाच्या दालनात तिची प्रतिष्ठापना होईपर्यंतचा‎प्रवास हा धैर्य व सततच्या प्रयत्नांची कहाणी सांगतो.‎अनेक पिढ्यांनी मिळून ही मूर्ती जतन करण्यात योगदान‎दिले आहे. एका संस्थेने ती सर्वसामान्य जनतेसमोर‎आणणे शक्य केले आहे.‎ ‘वर्थ अ जर्नी’ या पर्यटन नियतकालिकाने जगातील 100 ‎‎सर्वोत्कृष्ट संग्रहालयांच्या यादीत बिहार संग्रहालयाला ‎‎जागतिक स्तरावर नववे व आशियात पहिले स्थान दिले ‎‎आहे. या यादीत बिहार संग्रहालयाने न्यूयॉर्कच्या ‎‎‘मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट'' आणि पॅरिसच्या ‎‎जगप्रसिद्ध ‘लूव्र'' संग्रहालयालाही मागे टाकले . हा‎सन्मान निश्चित स्वागतार्ह आहे. आपण बिहारमधील ‎‎नालंदा, बोधगया, राजगीर, वैशाली व या भूमीचा‎इतिहास सांगणाऱ्या अशाच इतर अनेक ठिकाणांना भेट‎देणाऱ्या पर्यटकांचा अनुभवही तितक्याच‎संवेदनशीलतेने आणि काळजीपूर्वक समृद्ध करू‎शकतो. या संग्रहालयाची संकल्पना मांडणे, त्यासाठी‎निधी उपलब्ध करून देणे आणि ते सातत्याने चालवणे‎याचे श्रेय बिहार सरकारला जाते. तत्कालीन मुख्यमंत्री‎नितीश कुमार यांच्या दूरदृष्टीमुळे बिहारच्या ऐतिहासिक‎महत्त्वाच्या वस्तू व शिल्पांना त्यांच्या महत्तेनुसार एक‎योग्य आश्रय मिळाला. संग्रहालयाचे महासंचालक‎राहिलेले अंजनी कुमार सिंह यांच्या नेतृत्वाचाही येथे‎आवर्जून उल्लेख करावा. 1917 मध्ये स्थापन झालेल्या‎पाटणा संग्रहालयाने या यशाचा पाया रचण्यात मोठी‎भूमिका बजावली होती. आपल्या नवीन सुविधा आणि‎दालनांसह आजही ती एक प्रतिष्ठित संस्था म्हणून उभी‎आहे. ही दोन्ही संग्रहालये पर्यटकांना बिहारचा इतिहास‎जाणून घेण्याच्या संधी देतात. ही दोन्ही संग्रहालये मिळून‎पाटणाला विशिष्ट शहर बनवतात. येथून बिहारच्या‎इतिहासाचा प्रवास सुरू होऊ शकतो. जपानच्या ‘माकी‎अँड असोसिएट्स'' आणि मुंबईच्या ‘ओपोलिस''ने येथे‎दालने, खुल्या अंगणांची अशी साखळी तयार केली‎आहे. तेथे पर्यटक आपल्या गतीने संग्रहालय पाहू आणि‎समजून घेऊ शकतात. आतमध्ये मौर्य, गुप्त आणि पाल‎राजघराण्यांसोबतच बौद्ध आणि जैन परंपरांची माहिती‎मिळते. प्रादेशिक व समकालीन कला आणि स्थलांतरित‎बिहारींना समर्पित एक दालन बिहारची सांस्कृतिक‎जीवनधारा कशी विकसित होत राहिली. हे दाखवते.‎बाल दालनात मुले स्वतः विविध उपक्रमांत भाग घेऊन‎शिकू शकतात. एखादे मूल संग्रहालयातून परतताना तिथे‎पाहिलेल्या गोष्टींबद्दल प्रश्न विचारत असेल तर समजा‎की या भेटीतून त्याने काहीतरी नक्की मिळवले आहे.‎बिहारच्या राज्यपालपदाची सूत्रे घेतल्यापासूनच‎बिहारकडे भारत आणि जगाला देण्यासारखे खूप काही‎आहे, असे सांगत आलो आहे. हा वारसा मांडण्याची‎पद्धत किती महत्त्वाची आहे, हे संग्रहालय दाखवून देते.‎नालंदाच्या अवशेषांमध्ये फिरताना पर्यटकाला‎एकेकाळी इथे विद्वान कसे अध्ययन, शास्त्रार्थ आणि‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎विचारांची देवाणघेवाण करायचे, याची जाणीव झाली‎पाहिजे. बोधगया येथे पर्यटकांसाठी उपलब्ध सुविधांची‎काळजी घेतानाच त्या स्थानाचे धार्मिक पावित्र्य आणि‎वैशिष्ट्य जपले गेले पाहिजे. राजगीर व वैशालीचाही‎आपला वेगळा इतिहास आहे. तो पर्यटकांसमोर सोप्या‎आणि सुटसुटीत पद्धतीने मांडला गेला पाहिजे. बिहार‎संग्रहालय या दिशेने होणाऱ्या प्रयत्नांसाठी एक आदर्श‎वस्तूपाठ घालून देते. एखाद्या ठिकाणाबद्दल प्रभावीपणे‎दिलेली माहिती लोकांना तिथे अधिक वेळ‎घालवण्यासाठी प्रेरित करते. जतन आणि संवर्धनाचे‎काम ती जागा येणाऱ्या पिढ्यांसाठी उपलब्ध राहील‎याची खात्री देते. शाळेसोबत बिहारमधून येणाऱ्या‎मुलांचा अनुभवही जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यातून‎आलेल्या पर्यटका इतकाच समृद्ध असायला हवा. प्राचीन‎शिक्षण-केंद्रे आणि आध्यात्मिक चिंतनाची परंपरा‎एकेकाळी संपूर्ण आशियातील लोकांना आकर्षित‎करायची. विद्वानांचे आदान-प्रदान, संयुक्त प्रदर्शने‎आणि शैक्षणिक प्रवासाच्या माध्यमातून आपण ते संबंध‎जिवंत करू शकतो. याच भूमिकेला मी नालंदा ॲप्रोच‎ म्हटले. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)‎ प्राचीन शिक्षण-केंद्रे, आध्यात्मिक‎चिंतनाची परंपरा संपूर्ण आशियातील‎लोकांना आकर्षित करायची. विद्वानांचे‎आदान-प्रदान, संयुक्त प्रदर्शने आणि‎शैक्षणिक प्रवासाच्या माध्यमातून आपण‎ते संबंध पुन्हा जिवंत करू शकतो. याच‎भूमिकेला मी ‘नालंदा ॲप्रोच’ म्हटले‎.‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *