शुक्रवारी बहुतांश आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर अव्वल मानांकित जानिक सिनरचा फोटो छापून आला होता, ज्याला फ्रेंच ओपन जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानले जात होते. पण याचे कारण त्याने आदल्या दिवशी कोणताही सामना जिंकला होता असे नव्हते, तर तो जागतिक क्रमवारीत 56 व्या स्थानावर असलेल्या हुआन मॅन्युएल सेरुंडोलोकडून हरला होता, हे होते. बहुतांश वृत्तपत्रांनी त्याच्या पराभवाचे कारण असे सांगितले की, “कडक उन्हाने फिलिप-शात्रिये कोर्टला एका मोठ्या भट्टीमध्ये बदलले होते आणि सिनरची अवस्था इतकी बिघडली होती की त्याला ओळखणेही कठीण झाले होते.’ सामन्यानंतर सिनर म्हणाला, “मला आठवत नाही की शेवटच्या वेळी मला कधी इतका अशक्तपणा जाणवला होता. मी पूर्णपणे थकून गेलो होतो- माझे संपूर्ण शरीर साथ सोडत होते.’ बहुतांश वृत्तपत्रे आणि क्रीडा पत्रकारांनी त्याच्या पराभवाला भीषण उकाड्यालाच जबाबदार धरले. वास्तविक, जगातील नंबर एक खेळाडू तिसऱ्या सेटमध्ये विजयापासून केवळ एक गेम दूर होता व नेमक्या त्याच वेळी उष्णतेने त्याची सर्व ऊर्जा शोषून घेतली. हे वाचताच मला काही विद्यापीठातील प्राध्यापिका व शाळेतील शिक्षिकांची आठवण आली, ज्या सतत सांगत असतात की दिवसभराचे व्यावसायिक काम पूर्ण करून जेव्हा त्या आपली “सेकंड शिफ्ट’ करण्यासाठी घरी परततात, तेव्हा उकाडा व थकवा त्यांची सर्व ऊर्जा शोषून घेतो. हे असे काम आहे, ज्यामध्ये कोणतीही सुट्टी मिळत नाही. त्यांचे म्हणणे होते की त्या रोज या दबावाखाली गलितगात्र होतात. त्यांचा थकवा समजून घेणारे किंवा वाटून घेणारे कुणीही नसते. आणि त्या अगदी बरोबर होत्या. अनेक सनातनी किंवा पारंपरिक कुटुंबे अभिमानाने नोकरदार सुनेचा स्वीकार तर करतात, परंतु त्याचे प्रमुख कारण बहुधा तिच्याकडून मिळणारा आर्थिक लाभ किंवा सामाजिक प्रतिष्ठा असते. पण ही स्वीकृती अनेकदा अटींसह येते. मूळ धारणा हीच कायम राहते की तिच्या नोकरीमुळे पारंपरिक घरगुती रचना किंवा कुटुंबाच्या सोयी-सुविधांमध्ये कोणताही अडथळा येऊ नये. समाज आणि मीडियाने निर्माण केलेल्या सुपरवुमनच्या मिथकाने आदर्श भारतीय महिलेचा एक अवास्तव निकष प्रस्थापित केला आहे, जी जणूकाही कोणत्याही अडचणीशिवाय सर्वकाही साध्य करू शकते. जर त्यांनी मदत मागितली, घरगुती काम कोणाशी तरी वाटून घेण्याचा प्रयत्न केला किंवा आपला थकवा व्यक्त केला, तर बहुधा याकडे त्यांचे अपयश किंवा कुटुंबाप्रति समर्पणाचा अभाव म्हणून पाहिले जाते. ज्याप्रमाणे एखादा जगातील नंबर एक खेळाडू भीषण उकाड्यात नेहमीच जिंकू शकत नाही, त्याचप्रमाणे या तरुण महिलांकडून ही अपेक्षा करणेही अवास्तव आहे की त्यांनी एका आधुनिक व्यावसायिकाप्रमाणे कमवावे आणि एका पारंपरिक गृहिणीप्रमाणे सेवाही करावी. जेव्हा या नोकरदार महिला स्वयंपाकी, स्वच्छता कर्मचारी किंवा आया यांसारख्या घरगुती मदतनीसांची नियुक्ती करून वेळेअभावी निर्माण होणाऱ्या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांना अनेकदा विरोध किंवा टीकेचा सामना करावा लागतो. कुटुंबातील सदस्य बाहेरील मदतनीसांनी केलेल्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करू शकतात, त्यात अतिरिक्त हस्तक्षेप करू शकतात किंवा नोकरदार महिलांना अप्रत्यक्षपणे असे संकेत देऊन त्यांच्यात अपराधीपणाची भावना निर्माण करू शकतात की त्यांच्यामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष होत आहे किंवा कुटुंब परक्यांच्या हातचे अन्न खात आहे. दुसरीकडे- विशेषतः विकसित होणाऱ्या शहरांच्या टाऊनशिपमध्ये राहणारे काही ज्येष्ठ सदस्य- जे लिंगभेदाच्या कठोर भूमिका असलेल्या युगात लहानाचे मोठे झाले आहेत, ते अनेकदा त्याच पद्धती पुढे चालवतात, ज्या त्यांनी स्वतः सहन केल्या होत्या. जर सासूने तिच्या काळात संपूर्ण घर एकटीने सांभाळले असेल, तर अशा कुटुंबांमध्ये नवीन सुनांनी केलेल्या कामाच्या वाटणीच्या मागणीला काही वेळा अधिकाराची जाणीव किंवा आळस म्हणून पाहिले जाते. याशिवाय, कुटुंबाच्या सत्ता-रचना देखील एखाद्या नवीन सुनेसाठी घरगुती कामाच्या जबाबदाऱ्या सांभाळणे खूप कठीण बनवतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीकडून पुरेशा विश्रांती किंवा सहकार्याशिवाय दोन फुल-टाइम भूमिकांमध्ये सलग उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा केली जाते, तेव्हा त्याचा परिणाम मानसिक व भावनिक थकव्याच्या स्वरूपात समोर येतो. अशा महिला एका निरंतर “ऑलवेज-ऑन’ अवस्थेत जगतात, जिथे त्यांना खऱ्या अर्थाने विश्रांती घेण्याची फारच कमी संधी मिळते. त्यांचे मन सतत एका मानसिक चेकलिस्टचे व्यवस्थापन करत असते- ऑफिसच्या डेडलाइन्ससोबतच घराच्या गरजा- जसे की किराणा सामान, मुलांची काळजी व जेवणाचे नियोजन. हळूहळू ही स्थिती एका टाइम-डिसीजचे रूप धारण करते, जी वास्तविक या मानसिक जाणिवेला दर्शवते की वेळ कधीही पुरेशी नसते. याचा परिणाम सततची धावपळ, अतिरिक्त सतर्कता व फावल्या वेळातही विश्रांती न घेऊ शकण्याच्या स्वरूपात समोर येतो. नोकरदार महिलांवर पडणारे हे दुहेरी ओझे कमी करण्यासाठी घरगुती स्तरावर तातडीचे बदल, जोडीदाराचे सहकार्य व कुटुंबांच्या संवाद साधण्याच्या पद्धतीत बदल - या तिन्हींची आवश्यकता आहे. फंडा हा आहे की जसे क्रीडा विश्व आपल्या चॅम्पियनच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहते, तसेच आपणही आपल्या सुनांच्या पाठीशी उभे राहायला हवे- कारण त्याही आपल्या मुलीच आहेत.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
महाराष्ट्र
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- अमरावती: प्राध्यापक भरतीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार; १०० टक्के पारदर्शकतेसाठी 'महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण आयोग' स्थापन करण्याची 'डाटा'ची मागणी
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
गुन्हा
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

कसबा गणपती मंदिरात चोरी; देणगीपेटी फोडून ₹६० हजार लंपास!
अल्पवयीन मुलीच्या खुनाबाबत ‘AI’ आणि ‘व्यसन’च्या बातम्या चुकीच्या; DYSP विपुल पाटील!
तब्बल ७ मजली अनधिकृत इमारतीवर कारवाई; महापालिकेच्या कारभारावर सवाल!
देश विदेश
- नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा; थेट १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचे रणशिंग, सरकारची वाढली डोकेदुखी
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान




















Subscribe to my channel


