चंद्रपुर: वाघाचा थरार अन् उडाली दहशत! एकाच दिवशी वाघाच्या हल्ल्यात दोन शेतकरी जागीच ठार, तर एक गुराखी गंभीर जखमी

चंद्रपूर: जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी वाघाने हल्ला करून दोन शेतकऱ्यांचा बळी घेतला, तर एका गुराख्याला गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवार, ३० ऑक्टोबर रोजी घडली. यात चिमूर तालुक्यात कापूस वेचणी करताना शेतातच शौचाला गेलेल्या सदाशिव चिरकुटा खडसंग (५०, रा. गरडापार) आणि सिंदेवाही तालुक्यातील धुमनखेडा येथे शेतात गेलेल्या पत्रू रामा मेश्राम (६०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर पोंभुर्णा तालुक्यात जनावरे चराईसाठी गेलेला गुराखी राजेश्वर बिजा सिडाम (६०, रा. सातारा तुकूम) हे गंभीर जखमी झाले आहेत. एकाच दिवशी जिल्ह्यात तीन ठिकाणी वाघाचे हल्ले झाल्याने शेतकऱ्यांत दहशत पसरली आहे.

भर दुपारी हल्ले झाल्याने चिंतेत भर

सदाशिव खडसंग हे चिमूर वनपरिक्षेत्रातील गरडापार क्षेत्रातील जंगलालगतच्या शेतात पत्नी व महिला मजुरांसोबत कापूस वेचणीचे काम करत होते. दुपारी १ वाजताच्या सुमारास ते शेतालगतच्या झुडपांत शौचास गेले असता, तिथे आधीच दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक झडप घातली. या भीषण हल्ल्यात ते जागीच ठार झाले. बराच वेळ ते परत न आल्याने पत्नी व मजुरांनी शोधाशोध केली असता झुडपात त्यांचा मृतदेह आढळला. या प्रकरणी वनविभागाकडून मृताच्या पत्नीला ५० हजारांची तातडीची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली आहे. चिमूर तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची गेल्या दोन आठवड्यांतील ही दूसरी घटना आहे.

गुराखी गंभीर जखमी
पोंभुर्णा तालुक्यातील सातारा तुकूम परिसरात शुक्रवारी दुपारी दीड वाजता वाघाने एका गुराख्यावर जीवघेणा हल्ला केला. राजेश्वर बिजा सिडाम (६०, रा. सातारा तुकूम) असे जखमीचे नाव आहे. राजेश्वर सिडाम हे नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी जंगलात गेले असताना सातारा तुकूम वनक्षेत्रातील कक्ष क्रमांक ४३६ मध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *