नाशिक: "राजसत्तेपेक्षा नेहमीच धर्मसत्ता श्रेष्ठ असते. संतांच्या पायाशी नतमस्तक होऊन राज्यकारभार चालवणे हाच आमचा खरा संस्कार आहे," असे अत्यंत महत्त्वाचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीच्या निमित्ताने आणि नियोजनासंदर्भात नाशिकमधील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे शिवसेना पक्षाच्या वतीने एका विशेष संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाला उपस्थित राहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशभरातून आलेल्या साधू-संत आणि महंतांशी विस्तृत संवाद साधला.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, "भगवान त्र्यंबकेश्वर आणि गोदामाईच्या पवित्र चरणी वंदन करून देशभरातून आलेल्या संत-महंतांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळणे, हे आमचे परमभाग्य आहे. साधू-संत येती घरा तोची दिवाळी दसरा, या उक्तीप्रमाणे संतांच्या सानिध्यात खरी दिवाळी साजरी होत आहे. हे केवळ कोणतेही राजकीय किंवा सामाजिक संमेलन नसून आध्यात्मिक ऊर्जेचा एक मोठा उत्सव आहे."
बाधितांचे पुनर्वसन आणि विकासाची हमी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजित कामांमुळे आणि प्रकल्पांमुळे ज्या कुटुंबांवर विस्थापित होण्याची वेळ येईल किंवा जे बाधित होणार आहेत, त्या प्रत्येक कुटुंबाला हक्काची पक्की घरे देऊन त्यांचे योग्य पुनर्वसन केले जाईल. कुणावरही शासनाकडून अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ठाम हमी यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच, कुंभमेळा आणि विकासाच्या कामांमध्ये जर एखादे व्यापारी, लहान-मोठे दुकानदार किंवा शेतकरी यांचे नुकसान झाले, तर राज्य सरकार त्यांना योग्य तो आर्थिक मोबदला देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. साधुग्रामच्या भूसंपादनासंदर्भातील सर्व स्थानिक तक्रारी आणि समस्या प्राधान्याने सोडवल्या जातील. त्र्यंबकेश्वर स्टेडियमसाठी आवश्यक असलेली भूसंपादन प्रक्रिया सध्या सुरू असून त्यासाठी योग्य निधीचे नियोजन करण्यात आले आहे, तसेच नगरपरिषद प्रशासकीय भवनासाठी लागणारा निधी विनाविलंब उपलब्ध करून दिला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.
बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे विचार वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख जननायक बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांनी आम्हाला राजकारण हे केवळ सत्तेसाठी नव्हे, तर ते नेहमी समाजकारण, राष्ट्रसेवा आणि राष्ट्ररक्षणासाठी करण्याचे संस्कार दिले आहेत. राजसत्ता हातात असली तरी आध्यात्मिक आणि धर्मसत्ता नेहमीच मोठी असते, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
याचबरोबर, सध्या राज्यासमोर असलेल्या दुष्काळजन्य परिस्थितीवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार पूर्ण ताकदीने आणि खंबीरपणे उभे आहे. दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहासाठी शिवसेनेच्या वतीने विशेष आर्थिक मदत केली जाईल, अशी महत्त्वाची घोषणाही त्यांनी यावेळी केली. तसेच, येत्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशभरातून आणि विविध १३ आखाड्यांमधून येणाऱ्या सर्व संत-महंत आणि साधूंच्या महाप्रसादाची व भोजनाची संपूर्ण व्यवस्था शिवसेनेच्या वतीने केली जाईल, असे जाहीर करत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
शहर
- पुणे: आदिवासी विद्यार्थ्यांच्या डीबीटी प्रक्रियेत मोठे सुधारणा निर्णय; आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अर्ज करताना आता अनावश्यक कागदपत्रांपासून सुटका
- पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; विविध प्रकल्पांचे उद्घाटन, सहकार क्षेत्राचे भूमिपूजन आणि दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याचे होणार अनावरण
- नागपुर: सडक्या सुपारीचा महाघोटाळा! शहराच्या सीमेवर उभारली हजारो क्विंटलची गोदामं अन् भट्ट्या; रासायनिक प्रक्रियेद्वारे घातक सुपारीची होतेय तस्करी
- नाशिक: लालपरीतून आता थेट अयोध्येचे दर्शन! नाशिकमधूनही राम मंदिराच्या तीर्थयात्रेचे नियोजन; एसटी महामंडळाकडून विशेष सोय उपलब्ध
महाराष्ट्र
- मुंबई: गोरेगावमधील संतापजनक घटना: घरखर्चावरून झालेल्या वादातून दारूच्या नशेत असलेल्या मुलाकडून वृद्ध आईची हत्या; बांगुरनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या
- पुणे: आदिवासी विद्यार्थ्यांच्या डीबीटी प्रक्रियेत मोठे सुधारणा निर्णय; आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अर्ज करताना आता अनावश्यक कागदपत्रांपासून सुटका
- पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; विविध प्रकल्पांचे उद्घाटन, सहकार क्षेत्राचे भूमिपूजन आणि दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याचे होणार अनावरण
- नागपुर: सडक्या सुपारीचा महाघोटाळा! शहराच्या सीमेवर उभारली हजारो क्विंटलची गोदामं अन् भट्ट्या; रासायनिक प्रक्रियेद्वारे घातक सुपारीची होतेय तस्करी
गुन्हा
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाल्या, हे पुस्तक म्हणजे अत्यंत मनापासून आणि प्रामाणिकपणे...
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!


























Subscribe to my channel




