महाराष्ट्र: तीव्र दुष्काळाची आणि अस्मानी संकटाची दाहकता वाढलेली असताना, राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या ५,००० रुपयांच्या दिवाळी अनुदानावर काँग्रेसने कडाडून टीका केली आहे. "अस्मानी संकटात होरपळणाऱ्या बळीराजाच्या दुःखाची ही थेट थट्टा आहे. केवळ ५ हजार रुपयांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी साजरी होणार?" असा उद्विग्न सवाल उपस्थित करत काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांनी महायुती सरकारवर तीव्र शब्दांत तोफ डागली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित 'जनाक्रोश दुष्काळ मार्च' दरम्यान ते बोलत होते.
५ हजार रुपयांची मदत म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार
काँग्रेस नेत्यांनी आरोप केला की, यंदाचा खरीप हंगाम दुष्काळामुळे पूर्णपणे वाया गेला आहे. शेतात पेरलेले काहीही हातात आलेले नाही आणि आगामी रब्बी हंगामाची परिस्थितीही अत्यंत चिंताजनक आहे. अशा काळात राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना दिवाळीसाठी केवळ ५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला, जो अत्यंत असंवेदनशील आहे. ही मदत म्हणजे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा प्रकार असल्याची टीका सपकाळ यांनी केली.
काँग्रेसच्या प्रमुख मागण्या:
-
हेक्टरी १ लाख रुपयांची थेट मदत: पंचनामे, सर्वे आणि कागदोपत्री अभ्यास करण्याचे नाटक बंद करून राज्यातील सर्व पीडित शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी १ लाख रुपये आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी.
-
संपूर्ण कर्जमाफी: अस्मानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोणतीही अट न ठेवता सरसकट पूर्ण कर्जमाफी जाहीर करावी.
-
छावण्या व पाणीपुरवठा: मराठवाड्यासह संपूर्ण राज्यातील ग्रामीण भागात जनावरांसाठी तात्काळ चारा छावण्या सुरू कराव्यात आणि पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करावी.
-
विद्यार्थी व मजुरांना दिलासा: शेतमजुरांना सानुग्रह अनुदान देऊन गावातच मनरेगाअंतर्गत कामे उपलब्ध करून द्यावीत. तसेच शेतकऱ्यांच्या मुलांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करून त्यांना मोफत एसटी बस पास द्यावेत.
ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही या प्रसंगी बोलताना मराठवाड्यातील परिस्थिती अत्यंत वाईट असल्याचे सांगत, जिराईत आणि बागायती शेतीसाठी सरकार नेमकी किती मदत देणार याचे स्पष्टीकरण देण्याची मागणी केली.
शहर
- पुणे: कापलेली लिंबे, छायाचित्रांचे तुकडे अन् अनेक प्रश्न..! पिंपरी पेंढारमधील गूढ घटनेने परिसरात उडाली खळबळ!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- रत्नागिरी: चिमुकल्या आयरिशचा जागतिक विक्रम; अवघ्या १ वर्ष ५ महिन्यांच्या बालकाने १६ मिनिटांत १०० मीटर अंतर पोहून केला विक्रम!
- बीड: रस्तेरविना दुर्दैवी अंत; सर्पदंश झालेल्या १२ वर्षांच्या चिमुकलीचा उपचाराअभावी वाटेतच मृत्यू!
- राजगड: गोळीबाराने खळबळ! ४७ वर्षीय व्यक्तीवर झाडली गोळी; आरोपीला पोलिसांकडून अवघ्या ८ तासांत अटक!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर




























Subscribe to my channel




