पुणे: ज्या पुण्यात क्रांतीज्योतीसावित्रीबाई फुले यांनी भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची आणि तिच्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवली, त्याच पुरोगामी पुण्यात २१ व्या शतकातही हुंड्यापायी उच्चशिक्षित तरुणींचा बळी जात आहे. शिक्षणाने माणसाची विचारसरणी बदलायला हवी होती, मात्र पैशांची हाव आणि सासरची विकृती आजही निष्पाप मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करत असून असाच एक संतापजनक प्रकार पुण्यातील उंड्री भागात उघडकीस आला आहे.
बंगळुरूच्या एका नामांकित आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या २३ वर्षीय वैष्णवी जरांडे या नवविवाहितेचा सासरच्या छळाला कंटाळून संशयास्पद मृत्यू झाला आहे. अवघ्या चार महिन्यांपूर्वी, ९ मे २०२६ रोजी वैष्णवीचा विवाह ओंकार संजय घिसरे याच्याशी थाटामाटात पार पडला होता. मुलीच्या सुखी संसाराचे स्वप्न उराशी बाळगून तिच्या आई-वडिलांनी लग्नात तब्बल ४५ लाख रुपये खर्च केले आणि १० तोळे सोनेही दिले. मात्र, सासरच्यांची भूक एवढ्यावर भागली नाही. वैष्णवी पुण्याहून वर्क फ्रॉम होम करत असतानाच, नवीन कार खरेदी करण्यासाठी माहेरहून आणखी ५ लाख रुपये आणावेत, यासाठी तिचा सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला.
रात्रीच्या वेळी पतीचा धमकीचा कॉल
२४ सप्टेंबरच्या रात्री या छळाने टोक गाठले. रात्री सव्वानऊच्या सुमारास वैष्णवीने रडत रडत आईला फोन करून सासरच्या त्रासाबद्दल सांगितले. त्यानंतर अवघ्या दोन तासांत, म्हणजेच रात्री साडेअकराच्या सुमारास तिच्या पतीने थेट वैष्णवीच्या माहेरी फोन फिरवला. "तुमच्या मुलीला ताबडतोब घरी घेऊन जा, नाहीतर माझ्या हातून काहीतरी बरेवाईट घडेल," अशी थेट धमकीच त्याने दिली.
काळजात भीतीचा गोळा घेऊन आई-वडील रात्रीतून पुण्याकडे निघाले. पहाटे उंड्रीतील घरी पोहोचल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. पोटच्या लेकीचा निष्प्राण देह एका गोधडीत गुंडाळून ठेवण्यात आला होता. वैष्णवीने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचा दावा सासरच्यांनी केला असला, तरी ही निव्वळ आत्महत्या नसून तिचा घातपात करण्यात आला आहे, असा गंभीर आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी वैष्णवीच्या आई-वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
शहर
- नागपूर: "मतदानाची चोरी नाही, राहुल गांधींचा मेंदूच चोरीला गेलाय"; संवैधानिक संस्थांवरील आरोपांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा संताप
- पुणे: लॉजमध्ये प्रियकरासोबत वाद; तरुण रागाने निघून गेला अन् तरुणीने संपवलं आयुष्य, हडपसरमधील घटना
- पुणे: कौटुंबिक कलहातून ३६ वर्षीय पोलिस कर्मचाऱ्याने सरकारी पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडून संपवले आयुष्य
- पुणे : ज्येष्ठ डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण अन् खंडणी, 'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेवर पुण्यात गुन्हा दाखल!
महाराष्ट्र
- नागपूर: "मतदानाची चोरी नाही, राहुल गांधींचा मेंदूच चोरीला गेलाय"; संवैधानिक संस्थांवरील आरोपांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा संताप
- पुणे: लॉजमध्ये प्रियकरासोबत वाद; तरुण रागाने निघून गेला अन् तरुणीने संपवलं आयुष्य, हडपसरमधील घटना
- पुणे: कौटुंबिक कलहातून ३६ वर्षीय पोलिस कर्मचाऱ्याने सरकारी पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडून संपवले आयुष्य
- पुणे : ज्येष्ठ डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण अन् खंडणी, 'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेवर पुण्यात गुन्हा दाखल!
गुन्हा
- पुणे : ज्येष्ठ डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण अन् खंडणी, 'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेवर पुण्यात गुन्हा दाखल!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!






















Subscribe to my channel




