सध्याच्या धकाधकीच्या युगात खासगी नोकरीतील वाढती अस्थिरता, वेळेचे बंधन, तुटपुंजे वेतन आणि सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी प्रचंड महागाई या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील तरुणांचा तसेच नागरिकांचा कल आता पारंपरिक नोकऱ्या सोडnा व स्वतःचा छोटा-मोता उद्योग-व्यवसाय सुरू करण्याकडे वेगाने वाढू लागला आहे. ‘दुसऱ्याची नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय उत्तम’ हा विचार आता प्रत्यक्षात उतरताना दिसत असून, गेल्या एका वर्षाच्या कालावधीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरात तब्बल २ लाख ४९ हजार ८१७ नवीन दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांची अधिकृत नोंदणी झाली आहे. ही वाढती आकडेवारी शहरात उद्योजकतेची एक नवी लाट आल्याचे स्पष्टपणे दर्शवत आहे.
विशेषतः तरुण वर्ग आणि कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारे नोकरदार वर्ग आता मानसिक ताणतणाव आणि नोकरीतील अनिश्चिततेमुळे कंटाळले आहेत. महिन्याकाठी मिळणाऱ्या मर्यादित पगारातून कुटुंबाचा खर्च भागवणे आणि भविष्याची आर्थिक सुरक्षा निर्माण करणे कठीण होत चालल्यामुळे अनेकांनी आपला मोर्चा स्वयंरोजगार आणि व्यवसायाकडे वळवला आहे. आयटी सेक्टर, मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स, आणि खाजगी कंपन्यांमध्ये सतत होणारी कपात (Layoffs) आणि जॉब सिक्युरिटीचा अभाव यामुळे तरुणांनी स्वतःचे स्टार्टअप्स, रिटेल दुकाने, फ्रँचायझी, क्लाउड किचन, ई-कॉमर्स व्यवसाय तसेच सेवा क्षेत्रातील लहान व्यवसाय सुरू करण्याला प्राधान्य दिले आहे. सरकारी स्तरावर आणि विविध योजनांच्या माध्यमातून मिळणारे प्रोत्साहन देखील या बदलाला मोठे बळ देत आहे.
स्थानिक उद्योग व व्यापार वर्तुळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नोंदणीकृत झालेल्या नवीन आस्थापनांमध्ये किराणा दुकाने, फॅशन बुटीक, रेस्टॉरंट्स, कॅफे, डिजिटल सेवा केंद्रे, इलेक्ट्रॉनिक दुकाने तसेच सेवा पुरवणाऱ्या विविध स्टार्टअप कंपन्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. विशेष म्हणजे केवळ पुरुषच नव्हे, तर महिला वर्ग देखील मोठ्या संख्येने गृहउद्योगापासून ते व्यावसायिक दुकानांच्या माध्यमातून या उद्योजकतेच्या प्रवाहात सामील होत आहेत. हे चित्र पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महानगरांच्या आर्थिक अर्थकारणाला एक नवीन आणि बळकट दिशा देणारे ठरत आहे.
या वाढत्या बदलामुळे शहरात नोकरी शोधणाऱ्यांची संख्या काहीशी कमी होत असली, तरी नवीन उद्योगांमुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या नवीन संधी देखील निर्माण होत आहेत. तज्ज्ञांच्या मते, जर या नवउद्योजकांना योग्य वेळी बँक कर्ज, सुलभ शासकीय परवानग्या आणि व्यावसायिक मार्गदर्शनाचे पाठबळ मिळाले, तर हे लघुउद्योग भविष्यात मोठ्या कंपन्यांमध्ये रूपांतरित होऊ शकतात. यामुळे केवळ वैयक्तिक आर्थिक प्रगतीच नाही, तर देशाच्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही एक नवी गती मिळण्यास मदत होईल.
शहर
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
- पुणे: पत्नीला प्रसूतीसाठी माहेरी सोडून परतताना काळाचा घाला; मंचर बायपासवर २० फूट खोल खड्ड्यात इको गाडी कोसळून दोघांचा मृत्यू
- पुणे: संतापजनक हुंडाबळी प्रकरण; विवाहितेच्या आत्महत्येनंतर सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप, तपासातील त्रुटींवर कुटुंब आक्रमक
- मुंबई: जन्मदात्यांना स्पष्ट नकार देत ११ वर्षांच्या चिमुरडीने निवडले मायेने वाढविणाऱ्या शेजाऱ्यांचे घर; मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
महाराष्ट्र
- यवतमाळ: तान्हा पोळ्याच्या यात्रेत आकाश पाळण्याच्या बेरिंगमध्ये केस अडकून महिलेच्या डोक्याची चामडी निघाली; प्रकृती गंभीर
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
- पुणे: पत्नीला प्रसूतीसाठी माहेरी सोडून परतताना काळाचा घाला; मंचर बायपासवर २० फूट खोल खड्ड्यात इको गाडी कोसळून दोघांचा मृत्यू
- पुणे: संतापजनक हुंडाबळी प्रकरण; विवाहितेच्या आत्महत्येनंतर सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप, तपासातील त्रुटींवर कुटुंब आक्रमक
गुन्हा
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा

























Subscribe to my channel



