मुंबई: कुर्ला परिसरात घरच्यांच्या धाडसामुळे गर्भवती महिला आणि तिच्या नवजात बाळाचा जीव वाचला. २२ वर्षीय महिलेची पहाटे अचानक प्रसूतीवेदना सुरू झाल्यानंतर घरातच (Mumbai News) प्रसूती झाली. महिलेने एका मुलाला जन्म दिला. बाळाचं वजन सुमारे २ किलो ४०० ग्रॅम आहे. मात्र प्रसूतीनंतर नाळ बाहेर न आल्याने महिलेला तातडीने रुग्णालयात नेण्याची गरज होती. नातेवाईकांकडून रुग्णवाहिकेसाठी संपर्क करण्यात आला, मात्र रुग्णवाहिका वेळेत न आल्याने, परिस्थिती गंभीर होत असल्याने नातेवाईकांनी महिलेला चादरीची झोळी करून त्यातून डॉ. आनंदीबाई जोशी प्रसूतिगृहात दाखल केलं.
रुग्णालयात पोहोचताच ड्युटीवरील स्टाफ नर्सने बाळाची नाळ कापली. त्यानंतर स्त्रीरोगतज्ज्ञांनी पहाटे सुमारे ५ वाजून १० मिनिटांनी आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया करून नाळेसह वार बाहेर काढली. सध्या माता आणि बाळाची प्रकृती स्थिर असून दोघांनाही वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. दरम्यान, मुंबई महापालिका आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी रुग्णालयात जाऊन संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी चर्चा करून रुग्णाच्या नातेवाईकांकडूनही माहिती घेतली. रुग्णालयातील डॉक्टरांकडून मदत न मिळाल्याचा आरोपही करण्यात आला असून, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
किशोरी पेडणेकरांनी व्यक्त केला संताप
तर या घटनेबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "मी निषेध करते अशा गोष्टीचा. प्रशासनाचा निषेध करते. त्याच्यावरती असलेले MC, त्याच्यावरती असलेले DMC झोपा काढतायत का? असा माझा प्रतीसवाल आहे. काय करताय तुम्ही? तुमचे डीन आहेत, तुमचे अनेक पदं तिथे नुसती शोभेसाठी भरली आहेत का? काय अवस्था करून ठेवलीय ! झोळीमधून! मग माझा महाराष्ट्र सरकारला पण एक प्रतीसवाल... की जे मंत्री महोदय आहेत, जे अख्ख्या महाराष्ट्राचं नेतृत्व... काय करताय काय तुम्ही? आम्ही तुमच्याकडे पत्र पाठवून वेळ मागतोय, तुम्हाला वेळ देता येत नाही. मग तुम्ही... आणि खूप बदल घडलेत. या नर्सिंग ट्रेनिंगच्या गोष्टी किंवा नर्सेस कशा कमी करायच्या, ज्या लोकांनी कोविड काळात म्हणा किंवा जेव्हा कधी पण... जेव्हा मोठमोठ्या साथीचे आजार आले, तेव्हा नर्सेस आणि डॉक्टरांनी ती बाजू चांगली धरून ठेवली. आणि आम्ही फ्लोरेन्स नाइटिंगेलचा आदर्श मानणार आणि तुम्ही... मी त्याचाही तुम्हाला २८ तारखेला PC देणार आहे. या सगळ्याची माहिती घेऊन तुम्हाला देणार. कारण या महाराष्ट्रात, या मुंबईत परिचारिकांना संपवायचंच आहे, ती पदंच ठेवायची नाहीत, असा काहीतरी डाव होतोय आणि प्रायव्हेट सेक्टरला खूप मोठ्या प्रमाणात सपोर्ट करायचाय, असा डाव दिसतोय. माझ्या हातात सगळे पुरावे येऊ दे, मी ते मांडेन, असं म्हणत किशोरी पेडणेकरांनी संताप व्यक्त केला आहे.
शहर
- नाशिक: सरकारी डॉक्टरचा संतापजनक प्रताप; सुसाट लक्झरी कार दामटून इतर वाहनांना धडक आणि पादचाऱ्यांना उडवले!
- पुणे: रविवारी यार्डमध्ये तब्बल ९ तासांचा मेगाब्लॉक; ७ गाड्या रद्द, मेन लाईनवरील वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल होणार!
- पुणे: कार्ला येथील एकविरा देवी मंदिर पार्किंग परिसरात आढळला साडेनऊ फूट लांब अजगर; सर्पमित्रांनी सुरक्षितपणे जंगलात सोडले!
- पुणे: एफडीएचा मोठा दणका! बुधवार पेठेत तब्बल ४ ट्रक भेसळयुक्त पनीर आणि खवा जप्त!
महाराष्ट्र
- नाशिक: सरकारी डॉक्टरचा संतापजनक प्रताप; सुसाट लक्झरी कार दामटून इतर वाहनांना धडक आणि पादचाऱ्यांना उडवले!
- अहिल्यानगर: महाराष्ट्रात अपघातांची मालिका सुरूच! अहिल्यानगर, भंडारा आणि नांदेडमधील भीषण अपघातांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू!
- गोवा: बोरीच्या साईबाबा मंदिर व्यवस्थापनाचा वाद विकोपाला; ग्रामस्थांवर पोलिसांची मोठी कारवाई, काहीजण ताब्यात!
- पुणे: रविवारी यार्डमध्ये तब्बल ९ तासांचा मेगाब्लॉक; ७ गाड्या रद्द, मेन लाईनवरील वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल होणार!
गुन्हा
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



