पुणे: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होणार असल्याने मध्यवर्ती भागात होणारी मोठी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवादरम्यान शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख मार्गांवर जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीवर पूर्णपणे निर्बंध घालण्यात आले आहेत. पुणे शहर वाहतूक शाखेने मध्यवर्ती भागातील मुख्य मार्गांवर दि. १२ सप्टेंबरपासून पुढील २४ तास जड-अवजड वाहनांना वाहतूकबंदी (नो एंट्री) लागू केली आहे. गणेशोत्सवाचा हा काळ विसर्जनापर्यंत म्हणजेच २६ सप्टेंबरपर्यंत चालणार असून, या संपूर्ण कालावधीत नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी हे कडक निर्बंध लागू राहतील.
गणेशोत्सवात मध्यवर्ती भागातील प्रमुख गणपती मंडळे, विसर्जन मिरवणुका आणि दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांची प्रचंड गर्दी होत असते. या काळात जड वाहनांमुळे रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी होऊ नये आणि कोणताही अनुचित प्रकार किंवा अपघात टाळता यावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या वाहतूक बंदीमध्ये टिळक रोड, नाना पेठ, रस्ता पेठ, कुमठेकर रोड, लक्ष्मी रोड, फडके हौद चौक परिसर, बाजीराव रोड, शिवाजी रोड, कर्वे रोड, फर्ग्युसन कॉलेज रोड, जंगली महाराज रोड आणि इतर परिसरातील मध्यवर्ती मार्गांचा समावेश आहे.
तसेच गणेशोत्सवाच्या या १० दिवसांच्या काळात गर्दीच्या ठिकाणी वाहतुकीवर काटेकोर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार आणि परिस्थितीनुसार स्थानिक पोलिसांकडून वाहतूक मार्गांमध्ये तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत. वाहनचालक आणि नागरिकांनी होणारा त्रास टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि प्रशासनाला व वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन पुणे शहर वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
शहर
- पुणे: रविवारी यार्डमध्ये तब्बल ९ तासांचा मेगाब्लॉक; ७ गाड्या रद्द, मेन लाईनवरील वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल होणार!
- पुणे: कार्ला येथील एकविरा देवी मंदिर पार्किंग परिसरात आढळला साडेनऊ फूट लांब अजगर; सर्पमित्रांनी सुरक्षितपणे जंगलात सोडले!
- पुणे: एफडीएचा मोठा दणका! बुधवार पेठेत तब्बल ४ ट्रक भेसळयुक्त पनीर आणि खवा जप्त!
- मुंबई: ठाणे जिल्ह्यातही सार्वजनिक उत्सवांमध्ये डॉल्बी आणि लेझर लाईट्सवर पूर्ण बंदी घाला; अंधश्रद्धा निर्मूलन समितीची आक्रमक मागणी
महाराष्ट्र
- मुंबई: रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने कुर्ल्यात घरीच झाली प्रसूती, प्रसूतीनंतर महिलेला चादरीतून झोळी करून नेण्याची आली वेळ!
- गोवा: बोरीच्या साईबाबा मंदिर व्यवस्थापनाचा वाद विकोपाला; ग्रामस्थांवर पोलिसांची मोठी कारवाई, काहीजण ताब्यात!
- पुणे: रविवारी यार्डमध्ये तब्बल ९ तासांचा मेगाब्लॉक; ७ गाड्या रद्द, मेन लाईनवरील वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल होणार!
- पुणे: कार्ला येथील एकविरा देवी मंदिर पार्किंग परिसरात आढळला साडेनऊ फूट लांब अजगर; सर्पमित्रांनी सुरक्षितपणे जंगलात सोडले!
गुन्हा
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



