कोकणवासीयांचा प्रवास खडतरच! चिपळूण उड्डाणपुलाचे काम रखडल्याने गणेशोत्सवात सेवारस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी!

गणेशोत्सवापूर्वी चिपळूण शहरातील मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपुलाची किमान एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली होईल आणि शहरवासीयांची वर्षानुवर्षे सुरू असलेल्या वाहतूक कोंडीतून सुटका होईल, ही चिपळूणकरांची आशा यंदा पुन्हा एकदा फोल ठरली आहे. गेल्या तब्बल १५ वर्षांपासून रखडलेल्या या उड्डाणपुलामुळे सेवारस्त्यांवर प्रचंड गर्दी, वाहनांचा कर्णकर्कश हॉर्नचा आवाज आणि अपघातांचा वाढता धोका सहन करावा लागत आहे. यंदाच्या गणेशोत्सवातही स्थानिक नागरिकांना आणि चाकरमान्यांना या बिकट वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील या रखडलेल्या कामामुळे कोकणात गावोगावी येणाऱ्या बाप्पाच्या भक्तांना आणि प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने आणि संबंधित यंत्रणांनी यावर तात्काळ योग्य ते नियोजन करणे गरजेचे झाले आहे, जेणेकरून सणाच्या काळात उद्भवणाऱ्या या वाहतूक समस्येवर मात करता येईल. प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या रखडलेल्या विकासकामांवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *