मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाचे विधि व न्याय विभागाचे सचिव आणि वरिष्ठ विधि सल्लागार दिलीप घुमारे यांच्या विरोधात अत्यंत कडक भूमिका घेत त्यांच्यावर अवमान कारवाईची (Contempt Notice) नोटीस बजावली आहे. जलदगती न्यायालयांमधील (Fast Track Courts) रिक्त पदांच्या संदर्भातील एका जनहित याचिकेवर सुनावणी सुरू असताना, विधि सचिव दिलीप घुमारे यांनी भर न्यायालयात अत्यंत आक्रमक पवित्रा घेत चढ्या आवाजात व उद्धटपणे युक्तिवाद केला होता. न्यायालयाच्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी त्यांनी थेट उच्च न्यायालयाच्या प्रशासनालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्यामुळे न्यायालयाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
नेमकं काय घडलं न्यायालयात? (घटनाक्रम): मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर एका जनहित याचिकेवर (PIL) सुनावणी सुरू होती. या प्रकरणात जलदगती न्यायालयांसाठी नवीन १७९ पदे निर्माण केल्याबाबत शासनाच्या वतीने एक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले होते. या प्रतिज्ञापत्रातील मुद्द्यांवर आणि नेमकी ही पदे का भरली गेली नाहीत, यावर जेव्हा खंडपीठाने सरकारी वकिलांकडे विचारणा केली, तेव्हा त्यांना स्पष्ट उत्तर देता आले नाही.
यावर न्यायालयाने न्यायालयात उपस्थित असलेले विधि व न्याय विभागाचे सचिव दिलीप घुमारे यांना हे प्रतिज्ञापत्र कोणी तयार केले आणि त्यात नेमका तपशील काय आहे, याबाबत थेट विचारणा केली. या सोप्या प्रश्नाचे थेट उत्तर देण्याऐवजी सचिव दिलीप घुमारे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि अत्यंत चढ्या आवाजात (ओरडण्याच्या सुरात) बोलण्यास सुरुवात केली. भरलेल्या न्यायालयासमोर त्यांनी थेट उच्च न्यायालयाच्या प्रशासनावरच ठपका ठेवला आणि "१७९ पदे न भरण्यास उच्च न्यायालयाचे प्रशासनच जबाबदार आहे," असा वादग्रस्त दावा केला.
न्यायालयाचे कडक ताशेरे आणि अवमान नोटीस: एका जबाबदार वरिष्ठ अधिकाऱ्याने आणि स्वतः न्यायिक अधिकारी असलेल्या व्यक्तीने भर न्यायालयात दाखवलेली ही अरेरावी आणि आक्रमक वर्तणूक न्यायालयाच्या प्रतिष्ठेवर व अधिकारावर जाणीवपूर्वक केलेला आघात असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. खंडपीठाने आदेशात नमूद केले की, "घुमारे हे पूर्वी प्रधान सचिव आणि सध्या विधि व न्याय विभागाचे सचिव व वरिष्ठ विधि सल्लागार या अत्यंत महत्त्वाच्या पदावर आहेत. न्यायपालिका आणि विधिमंडळ यांच्यातील समन्वयाचा ते महत्त्वाचा दुवा आहेत. परंतु, या उच्च पदावर असल्यामुळे त्यांना न्यायालयाचा अनादर करण्याचे किंवा न्यायालयाशी उद्धटपणे वागण्याचे कोणतेही विशेषाधिकार मिळत नाहीत." हे वर्तन उघडपणे न्यायालयाचा अवमान (Contempt Ex Facie) करणारे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
माफीनामा फेटाळला: या प्रकारानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे महाधिवक्ता (Advocate General) डाॅ. मिलिंद साठ्ये यांना न्यायालयात बोलावण्यात आले. महाधिवक्त्यांनी विधि सचिव दिलीप घुमारे यांच्या वतीने न्यायालयाची माफी मागितली. मात्र, खंडपीठाने ती माफी स्पष्टपणे फेटाळून लावली. न्यायालयाने स्पष्ट केले की, एखादा न्यायिक अधिकारी किंवा वरिष्ठ अधिकारी भर न्यायालयात असे अत्यंत अक्षम्य वर्तन करून नंतर वरिष्ठ वकिलांमार्फत किंवा औपचारिक रीतीने माफी मागून सहज सुटकेची अपेक्षा करू शकत नाही. जर असे खपवून घेतले, तर समाजात अत्यंत चुकीचा संदेश जाईल की कोणीही व्यक्ती न्यायालयात मनमानी करू शकते.
या सर्व घटनेची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारमार्फत दिलीप घुमारे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्या या कृतीबद्दल त्यांच्यावर अवमान कारवाई का सुरू करण्यात येऊ नये, याचा खुलासा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले असून या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ सप्टेंबर रोजी निश्चित करण्यात आली आहे.
शहर
- पुणे: अभ्यासाचा आणि परीक्षेचा प्रचंड ताण; बारामतीत १६ वर्षीय विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल, शैक्षणिक वर्तुळात मोठी हळहळ!
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
- मुंबई: राष्ट्रीय विस्तारासाठी शिंदेंची मोठी रणनीती; देशभरातील १५ राज्यांत शिवसेना वाढवण्याची जय्यत तयारी!
- पुणे: दहीहंडी अन् गणेशोत्सवातील कर्णकर्कश डीजेच्या आवाजाविरोधात नागरिक आक्रमक; शांततेत सण साजरा करण्याची मागणी!
महाराष्ट्र
- जालना: माझ्यामधी वळवळ करू नका.. मराठा आरक्षण मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचे छगन भुजबळांवर अत्यंत तिखट शब्दांत हल्लबोल!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
- कोल्हापूर: महाराष्ट्रात भाजपची अवस्था दयनीय झाली आहे खासदार संजय राऊतांचे पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार प्रहार!
- पुणे: अभ्यासाचा आणि परीक्षेचा प्रचंड ताण; बारामतीत १६ वर्षीय विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल, शैक्षणिक वर्तुळात मोठी हळहळ!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: राजकारणात मोठा भूकंप होणार? संजय राऊतांचा मोठा दावा, देवेंद्र फडणवीस होऊ शकतात देशाचे नवे 'उपपंतप्रधान'!
- नवी दिल्ली: 'काॅक्रोच जनता पार्टी'मध्ये उभी फूट! मनीष ब्रह्मभट्ट यांनी 'CJP-डेमोक्रेटिक' पक्षाची केली घोषणा, अरविंद केजरीवाल आणि अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप!
- अयोध्या: राम मंदिरात ऐतिहासिक निर्णय; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओ पदी नियुक्ती
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड



























Subscribe to my channel




