कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील हाजगोळी येथील एका निर्जन आणि बंदिस्त पोल्ट्री फार्मवर महाराष्ट्र अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सने (ANTF) धाड टाकून एमडी (मेफेड्रॉन) ड्रग्ज तयार करणाऱ्या एका मोठ्या बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईमुळे पश्चिम महाराष्ट्रसह राज्यभरात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणाचे धागेदोरे थेट मुंबई आणि कर्नाटकच्या बेळगावसह आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळ्यांपर्यंत जोडले गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
नेमकं काय आहे प्रकरण आणि कारवाईचा घटनाक्रम: कोल्हापूर जिल्हा आणि लगतचा सीमावर्ती भाग हा अवैध मद्यतस्करी आणि इतर गुन्ह्यांसाठी यापूर्वीही चर्चेत राहिला आहे. मात्र, अत्यंत दुर्गम व लपलेल्या भागात थेट रासायनिक प्रक्रिया करून 'एम. डी. ड्रग्ज' (White Poison) सारखे अत्यंत घातक आणि प्राणघातक मादक द्रव्य तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याचा प्रकार पहिल्यांदाच समोर आला आहे. पुणे येथील अमली पदार्थविरोधी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे चंदगड तालुक्यातील हाजगोळी येथील एका संशयित पोल्ट्री फार्मवर अचानक छापा टाकला.
या कारवाईदरम्यान पथकाने घटनास्थळावरून सुमारे २०८ ग्रॅम तयार एमडी ड्रग्ज, मोठ्या प्रमाणावर कच्चे रसायन, रासायनिक पावडर आणि उत्पादन करण्यासाठी लागणारे विविध कंटेनर, काचेची उपकरणे, वजनकाटे, इलेक्ट्रिक हिटर, मिक्सर, तसेच ड्रिलसदृश मशीन यांसारखे सव्वा कोटी रुपयांहून अधिक मुल्याचे साहित्य व उपकरणे जप्त केली आहेत. या धडक कारवाईत पोलिसांनी ६ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्या कसून चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.
दाऊद टोळीशी कनेक्शन आणि आंतरराष्ट्रीय जाळे: तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, या हाय-प्रोफाइल ड्रग्स कारखान्याचे कनेक्शन थेट कुख्यात अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमच्या टोळीशी जोडले गेले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर ड्रग्ज तस्करी व पुरवठा करणाऱ्या आणि सध्या पोलिसांच्या अटकेत असलेल्या सलीम डोला याच्याशी या रॅकेटचे संधान असल्याचे उघड झाले आहे. नयानगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या तपासादरम्यान अटक करण्यात आलेल्या इरफान सलीम खान (रा. मीरा रोड, ठाणे) याच्या चौकशीतून चंदगडमधील या कारखान्याची माहिती समोर आली.
दाऊदच्या टोळीसाठी भारतात अवैध कारखाने उभा करून अमली पदार्थ बनविणारा दया उर्फ दयानंद मुद्दनार याच्या मार्गदर्शनाखाली हा सारा गोरखधंदा चालत असल्याचे समोर आले आहे (दयात याचा काही दिवसांपूर्वीच मुंबईतील जे. जे. रुग्णालयात मृत्यू झाला आहे). दयानंदचा शिष्य असलेल्या इरफान सलीम खान यानेच सुरक्षित आणि कोणाचे लक्ष जाणार नाही अशा चंदगडच्या दुर्गम भागाची निवड करून हा कारखाना थाटला होता.
मुंबई, पुणे ते बेळगाव आणि बंगळुरू कनेक्शन: चंदगड तालुक्यातून उत्पादित होणारे हे घातक ड्रग्ज केवळ स्थानिक पातळीवर नव्हे, तर महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई, पुणे तसेच शेजारील कर्नाटक राज्यातील बेळगाव आणि बंगळुरू सारख्या मोठ्या शहरांमधील ड्रग्ज पेडलर्स व उच्चभ्रू वर्गातील तरुणांना मोठ्या प्रमाणावर पुरवले जात असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. सीमावर्ती भागाचा फायदा घेऊन सीमापार आणि आंतरराज्यीय पातळीवर चालणारे हे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी आता महसूल आणि पोलीस यंत्रणेने आपली पावले अधिक वेगाने उचलण्यास सुरुवात केली आहे.
या प्रकारानंतर ग्रामीण भागातील तरुणांमध्ये वाढत्या व्यसनाधीनतेबद्दल आणि पालकांच्या चिंतेबद्दल सामाजिक स्तरावर तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी केवळ पोलीस प्रशासनावर मदार न ठेवता पालकांनी आणि समाजाने देखील मुलांच्या वर्तणुकीवर बारीक लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. या प्रकरणाचा अधिक सखोल तपास सध्या अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्समार्फत सुरू आहे.
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




