पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:कुटुंब टिकवण्यासाठी‎ तरुणांनी योगदान द्यावे

एखाद्या झाडाचे मूळ वाळत चालले असेल, तर ते झाड आजारी पडत‎असल्याचे लक्षण आहे. तसेच नात्यांमध्ये रुक्षपणा आला, तर कुटुंबाचे‎झाड कोलमडून पडेल. याचा थेट परिणाम देशावरही होतो. कारण‎निरोगी झाडांनाच फळे आणि फुले येतात. आज भारतासमोर‎चोहोबाजूने अनेक आव्हाने उभी आहेत. या आव्हानांचा सामना‎करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील लोक काही करत असतील ते ठीक‎आहे. पण एका सामान्य माणसाचे योगदान हे असू शकते की, त्याने‎आपले कुटुंब जपले पाहिजे आणि टिकवले पाहिजे. कुटुंबे ही आपल्या‎देशाची एक खूप मोठी ताकद आहेत. उदाहरणार्थ- पूजा-अर्चा किंवा‎प्रार्थनेचा एक वेगळाच आनंद असतो. यांच्या मूळ रूपात आरोग्य‎सामावलेले आहे. यांना सोडून देणे हे आजाराचे लक्षण असू शकते.‎ पण यांना जपणे आणि पाळणे ही निरोगी राहण्याची धडपड आहे.‎आणि आरोग्य तर देवाने आपल्याला जन्मापासूनच शरीराच्या रूपात‎दिलेली भेट आहे. आजार आपण बाहेरून ओढावून घेतो. म्हणूनच‎विशेषतः तरुणांनी आपले कुटुंब वाचवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी‎योगदान दिले पाहिजे. देशाच्या उत्पादकतेमध्ये तरुणांचा वाटा आजही‎खूप कमी आहे. पण कमीत कमी आपले कुटुंब जपण्यात तरी हे योगदान‎नक्कीच वाढले पाहिजे.‎‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *