पुणे: गेल्या काही वर्षांत विशेषतः लॉकडाऊननंतर व्यवसायात शिथिलता आल्याने आमच्याकडूनही चुका झाल्या, कर्कश आवाज वाढला, स्पर्धा वाढली. हे आम्ही १०० टक्के मान्य करतो, अशी कबुली पुणे जिल्हा साऊंड, लाइट आणि जनरेटर असोसिएशनने बुधवारी (दि.२) पत्रकार परिषदेत दिली. मात्र, आता स्वतःहून सुधारणा करत नियमांचे आम्ही पालन करू, असे सांगत गणेशोत्सवाच्या काळात साऊंड सिस्टीमवर सरसकट बंदी घालून किंवा कठोर निर्बंध लावून जिल्ह्यातील लाखो कामगारांवर उपासमारीची वेळ आणू नका; प्रशासनाने ठरवून दिलेल्या डेसिबल मर्यादित आणि '४ बेस, ४ टॉप'च्या नियमांमध्ये व्यवसाय करण्याची आमची पूर्ण तयारी आहे, असेही त्यांनी जाहीर केले.
गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच डीजे मुक्त गणेशोत्सवासाठी विद्यानंद बापट यांच्यासह पुणेकरांनी लढा सुरू केला आहे. त्यामुळे साऊंड व्यावसायिकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. लाखो कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याच्या भीतीने आता पुणे जिल्हा साऊंड, लाइट आणि जनरेटर असोसिएशनने सहकार्याची भूमिका घेतली आहे. यासंदर्भात असोसिएशनचे अध्यक्ष गणेश काळभोर यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी उपाध्यक्ष सागर सदाशिव सुतार, कार्याध्यक्ष ओंकार पडवळ, कायदेशीर सल्लागार मोहित पालेशाह आणि रिपब्लिकन परिवर्तन पँथर्सचे अध्यक्ष गजेंद्र (बाबा) प्रकाश मोरे उपस्थित होते.
लॉकडाऊननंतरच्या काळात नियमांत शिथिलता मिळाल्यामुळे स्पर्धा अवाजवी वाढली, प्रेशर मिड आणि भिंतींसारख्या मोठ्या यंत्रणांमुळे आवाज मर्यादेबाहेर गेला, आमच्याकडूनही चुका झाल्या, हे आम्ही मान्य करतो. म्हणूनच आता आम्ही स्वतःहून सुधारणा करत आहोत,' असे त्यांनी स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ५५, ६५ ते ७५ डेसिबल मयदितच सिस्टीम चालवली जाईल. मिरवणुकीत कर्कश आवाज निर्माण करणारी 'प्लाझ्मा सिस्टीम' व 'प्रेशर मिड' आम्ही स्वतःहून लावणार नाही आणि ऑपरेटर्सचे माईकिंगही पूर्णपणे बंद ठेवले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
ते म्हणाले, पुणे जिल्ह्यात सुमारे १५ ते ३० हजार साऊंड, लाइट आणि जनरेटर व्यावसायिक असून, प्रत्येक व्यावसायिकाकडे १० ते २० कामगार काम करतात. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ३ ते ४ लाख लोकांची उपजीविका या व्यवसायावर अवलंबून आहे. हा व्यवसाय पूर्णपणे मोसमी (सीझनल) असून वर्षातील ३६५ दिवसांपैकी केवळ १०० दिवस काम मिळते; तरीही कामगारांना वर्षभर सांभाळावे लागते. हे व्यावसायिक गर्भश्रीमंत नसून शेतकरी व सर्वसामान्य कुटुंबातील तरुण आहेत. शेती, सोने गहाण ठेवून आणि बँकांकडून लाखो रुपयांचे कर्ज काढून त्यांनी ही यंत्रणा उभारली आहे. अशा वेळी अचानक सरसकट बंदी आल्यास कर्जाचे हप्ते थकतील आणि हजारो कुटुंबे देशोधडीला लागतील.
शहर
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- पुणे: मानवतेला काळिमा फागणारी घटना; ३ वर्षांच्या 'डॅनी' श्वानाला बेल्टने बेदम मारहाण करत भिंतीवर आपटले, नराधम मालक परदेशीविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: कोट्यवधी रुपये 'सांडपाण्यात'! दर्जाहीन मलवाहिन्या आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे मुळा-मुठा नदीची बिकट अवस्था
महाराष्ट्र
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- कोल्हापूर: संकश्र्वरजवळ भीषण अपघात! तिरुपती दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा मालवाहू ट्रकला मागून जोरदार धडक; नाशिकमधील तरुणाचा जागीच मृत्यू
- अमरावती: समृद्धी महामार्गावर भीषण थरार! धामणगाव रेल्वे परिसरात टायर फुटल्याने ट्रकला अचानक लागली भीषण आग; चालकाचा जिवंत जळून मृत्यू, तर दुसऱ्याचा पुलावरून खाली पडून अंत
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
गुन्हा
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
- बीड: अहिल्यानगर महामार्गावरील कासार ओढ्यात आढळला निर्वस्त्र व दाढी वाढलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; आष्टी परिसरात उडाली खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: एकाला मंत्री बनवलं, दुसऱ्याला पद्मविभूषण दिलं… मुख्य निवडणूक आयुक्तांच्या वादावरून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
- नवी दिल्ली: पोलिसांना मोठा चकवा! CJP चे नेते अजिंक्य शिंदे, सौरभ दास आणि आशुतोष रांका थेट जंतरमंतरवर; पोलिसांची धावाधाव, पुन्हा घेतले ताब्यात!
- नवी दिल्ली: सुटकेनंतर ध्रुव राठीचा धक्कादायक खुलासा ;पोलिसांनी माफी मागितली, सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण ते डिटेंशन नव्हे तर अपहरण होतं!
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!



























Subscribe to my channel




