लहानपणी आपल्यापैकी बहुतेक जण पालकांसोबत सत्संगाला जायचे. त्यांच्या शेजारी बसायचे. कदाचित भजनांचे शब्द काय आहेत आणि ते कसे गायले जातात, हे आपल्याला ठाऊक नसायचे. काही लोकांनी कदाचित त्या ऊर्जा लहरी अनुभवल्या असतील आणि काहींनी त्याकडे दुर्लक्ष केले असेल. आपल्यापैकी बहुतेकांसाठी त्या आठवणी कुठेतरी दबून राहिल्या, कारण आपण धावपळीच्या कॉर्पोरेट जगात पाऊल ठेवले होते. सत्संगाचा काळ दशकानुदशके दबलेला राहिला, विसरला गेला नाही, पण शांत झाला. मग संगीताने नवीन अवतार घेतला. आपण अशा काळात आलो जिथे क्लबमध्ये लोक हातात ग्लास घेऊन संगीताच्या तालावर नाचत असत, जेणेकरून नशा त्या लयीला अधिक वाढवेल. आता 2026 मध्ये येऊया, जिथे वातावरण बदलले आहे. विकसित देशांत आपण नवीन पिढीला (जेन-झी) एका नव्या चळवळीचा उत्सव साजरा करताना पाहू शकतो. तरुण आता मद्याला नकार देत आहेत आणि मानसिक व शारीरिक आरोग्याला प्राधान्य देत आहेत. मात्र, भारतात याच पिढीने हा साधेपणा एक पाऊल पुढे नेला आहे. 2025 पासून गेल्या अवघ्या एका वर्षात कोलकात्याच्या दोन व्यक्तींनी एका सांस्कृतिक बदलाची सुरुवात केली आहे. राघव आणि प्राची अग्रवाल यांनी सत्संगाच्या प्राचीन परंपरेला स्टेडियममधील कार्यक्रमासारख्या सामुदायिक ऊर्जेशी जोडून आधुनिक संगीताला नवे रूप दिले आहे. भाऊ-बहिणीच्या या जोडीने दिवाणखान्यात होणाऱ्या भजनाच्या सत्रांना राष्ट्रीय स्तरावर आणले, ज्याला सोशल मीडियावर ‘भजन क्लबिंग’ म्हटले जात आहे. हे एका खास जागतिक बदलाकडे निर्देश करते की नवीन पिढी आता संपर्क आणि उत्सवाचे कसे मार्ग शोधत आहे. देशभरात त्यांच्या कार्यक्रमांना तरुण खुल्या मनाने स्वीकारत आहेत. दक्षिणेकडील बंगळुरूपासून ते मध्य भारतातील इंदूर आणि उत्तरेकडील चंदीगडपर्यंत ते स्वतःशी आंतरिक नाते प्रस्थापित करण्याची नवी ओळख बनले आहेत. पारंपरिक धार्मिक संगीतातील औपचारिकता कमी करून आणि त्यात सुफी व बॉलीवूड धून मिसळून त्यांनी नवीन पिढीला असे वातावरण दिले आहे, जिथे त्यांना घरच्यासारखे वाटते. त्यांच्या सादरीकरणाचे खरे सौंदर्य साधेपणात आहे. उंच व्यासपीठ असलेल्या पारंपरिक कार्यक्रमांपेक्षा वेगळे, ते दोघे अनेकदा जमिनीवर बसून सादरीकरण करतात. त्यांच्याभोवती प्रेक्षक बसलेले असतात. त्यांच्या सत्रांचे काही स्पष्ट नियम आहेत : मद्य नाही आणि जेवण नाही. यामुळे ऊर्जा शुद्ध आणि पूर्णपणे संगीतावर केंद्रित राहते. ते परस्पर सहभागाला प्रोत्साहन देतात, जिथे प्रेक्षक केवळ ऐकत नाहीत तर सोबत गातात आणि जप करतात. मोठ्या आवाजाच्या पाश्चात्त्य संगीताची जागा आता शांत आणि सुश्राव्य धूनने घेतली आहे, जी ध्यानासारखी स्थिती निर्माण करते. ते कोणत्याही अडथळ्यांविना खुले आणि आपुलकीचे वातावरण निर्माण करतात, जिथे उद्देश केवळ गाणे आणि संगीत अनुभवणे हा असतो. ते प्रत्येकाला सहभागासाठी प्रोत्साहित करतात, मग ते पारंपरिक भजन असो, एखादे जुने बॉलीवूड गाणे असो किंवा कविता असो. 50 लोकांसह त्यांच्या दिवाणखान्यात सुरू झालेले हे छंद म्हणून केलेले भजन सत्र हळूहळू एका चळवळीत बदलले, ज्याने मनोरंजनात खोली शोधणाऱ्या संपूर्ण पिढीला जोडले. राघव आणि प्राची यांच्या यशाचे कारण त्यांचे संगोपन आहे. ते अनेकदा आपल्या वडिलांसोबत पारंपरिक भक्ती सभांमध्ये जात असत. याला कौटुंबिक श्रद्धा म्हणा किंवा परंपरा, जी त्यांच्या मनात खोलवर रुजली. याच कारणामुळे ते आपल्या दृष्टिकोनातून नवीन पिढीसाठी एक नवीन नाते निर्माण करू शकले, जरी उच्च पगाराची कॉर्पोरेट नोकरी करत असताना ते आधीच समाजाच्या नजरेत यशस्वी होते. फंडा हा आहे की, बालपणात असे एक चांगले बीज पेरा, ज्यावर तुमचा विश्वास असेल की ते खोलवर मुळे धरेल आणि मग विसरून जा. तेच बीज एक दिवस नवीन रूपात फळ देईल आणि संपूर्ण नवीन पिढीसाठी आनंद आणि उद्देश घेऊन येईल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

गणेश मंडपात मध्यरात्री चोरी; बाप्पाच्या पैशांच्या हारासह कार्यकर्त्याचा मोबाईल लंपास!
पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते पोलिसांच्या १२ नव्या वाहनांचं लोकार्पण!
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अतिवेगाने वाहन; नंबर प्लेटही झाकलेली! 🚗⚠️
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




