पुणे: लग्नाच्या वरातीत गाण्यावर नाचताना झालेल्या एका किरकोळ धक्काबुक्कीचा राग मनात धरून तरुण मित्राचा निर्घृण खून करणाऱ्या प्रकरणातील फरार मुख्य आरोपीला पुणे पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. अटक केल्यानंतर पुणेकरांमधील गुन्हेगारांची दहशत कमी करण्यासाठी आणि खाकीचा धाक दाखवण्यासाठी भारती विद्यापीठ पोलिसांनी या फरार आरोपीची भररस्त्यातून धिंड काढली. या धिंडीदरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भररस्त्यात ओरडून, "हा क्रिमिनल आहे, आम्ही त्याची वरात काढतोय. नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही," असे सांगत गुन्हेगारांना जाहीर इशारा दिला. पोलिसांच्या या 'सिंघम' स्टाईल कारवाईचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
मयत तरुणाचे नाव तेजस दत्तात्रय पिलाने (वय २४) असे आहे. काही दिवसांपूर्वी वेल्हा तालुक्यात एका लग्नाची वरात सुरू असताना, गाण्यावर नाचताना तेजसचा धक्का आरोपी विशाल खोपडे याला लागला होता. या अगदी किरकोळ कारणावरून दोघांमध्ये मोठा वाद झाला आणि प्रकरण हाणामारीवर गेले.
याच भांडणाचा आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी तेजसचा काटा काढण्याचा थरारक कट रचला.
सर्व्हिस रोडवर गाठून केला खून
२५ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास तेजस पिलाने हा पुणे-सातारा हायवेवरील शिवसृष्टी ते कात्रज सर्व्हिस रस्त्यावरून जात असताना, आरोपींनी त्याला रस्त्यात अडवले. पूर्ववैमनस्यातून आरोपींनी धारदार शस्त्राने आणि दगडाने ठेचून तेजसचा अत्यंत निर्घृणपणे खून केला आणि सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
फरार आरोपीला 'अशा' ठोकल्या बेड्या
घटनेचे गांभीर्य ओळखून भारती विद्यापीठ पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवली. पोलिसांनी अवघ्या काही तासांत मुख्य संशयित विशाल खोपडे, अभिषेक खोपडे, सचिन धुळे आणि आदिनाथ कसबे यांना अटक केली होती. मात्र, या गुन्ह्यातील पाचवा आणि महत्त्वाचा आरोपी आदित्य काका गायकवाड हा पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला होता.
गुन्हे शाखा आणि भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक त्याच्या मागावर होते. दरम्यान, फरार आरोपी आदित्य गायकवाड हा आंबेगाव बुद्रुक परिसरातील लेकटाऊन रोडवर येणार असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून त्याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले.
भरचौकात काढली धिंड; पोलिसांचा नागरिकांना शब्द
आरोपीला आंबेगाव बुद्रुक परिसरात आणून पोलिसांनी त्याची जाहीर धिंड काढली. यावेळी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना सांगितले, *"हा क्रिमिनल आहे, याने खून केलाय आणि आम्ही याची वरात काढतोय. तुमच्या परिसरात गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही. सामान्य नागरिकांनी गुन्हेगारांना मुळीच घाबरण्याची गरज नाही, पोलीस तुमच्या पाठीशी आहेत."*
पुण्यात पोलिसांचा नवीन 'खाकी पॅटर्न'
गेल्या काही दिवसांत पुण्यात कोयता गँग आणि इतर सराईत गुन्हेगारांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी गुन्हेगारांची परिसरात असणारी दहशत एका झटक्यात संपवण्यासाठी आणि नागरिकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी हा नवा 'खाकी पॅटर्न' सुरू केला आहे. पोलिसांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आंबेगाव आणि कात्रज परिसरातील नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




