लोणावळा/पुणे: पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कार्ला येथील प्रसिद्ध श्री क्षेत्र एकवीरा देवी मंदिर परिसरातील विविध प्रलंबित मूलभूत समस्या तात्काळ सोडवाव्यात आणि स्थानिक व्यावसायिकांचा रोजगार हिरावून घेणारा प्रस्तावित 'रोपवे प्रकल्प' (Ropeway Project) कायमस्वरूपी रद्द करावा, या प्रमुख मागण्यांसाठी वेहरगाव आणि दहिवली येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. रविवारी एकवीरा देवी मंदिर परिसरात कडकडीत बंद पाळत ग्रामस्थांनी एकवीरा पायथा मंदिर ते मुंबई-पुणे महामार्गावरील कार्ला फाट्यापर्यंत एक भव्य पायी मोर्चा काढला. त्यानंतर आंदोलकांनी थेट मुंबई-पुणे महामार्ग अडवून रस्तсаवर बसून तीव्र 'रास्ता रोको' आंदोलन केले.
स्थानिकांचा रोजगार आणि उपजीविकेचा प्रश्न ऐरणीवर: आंदोलनात सहभागी झालेल्या ग्रामस्थांनी आणि स्थानिक व्यावसायिकांनी स्पष्ट केले की, आमचा विकासाला अजिबात विरोध नाही, परंतु स्थानिकांच्या हक्काची भाकर हिरावून घेणारा आणि रोजगारावर पाणी सोडणारा रोपवे प्रकल्प आम्हाला मान्य नाही. या प्रकल्पामुळे पायथ्याशी छोटे-मोठे व्यवसाय करणारे रिक्षाचालक, दुकानदार आणि स्थानिक नागरिक बेरोजगार होणार आहेत. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करण्यात यावा, अशी आक्रमक भूमिका यावेळी महिला, तरुण आणि लहान मुलांसह मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी घेतली.
वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मूलभूत सुविधांची वानवा: एकवीरा गड व मंदिर परिसरात येणाऱ्या लाखो भाविक आणि पर्यटकांसाठी प्रशासनाकडून पुरेशा सुविधा पुरवल्या जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पायऱ्या, पायवाटा, पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छतागृहे, वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षा व्यवस्था यांसारख्या मूलभूत गरजा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. याबाबत संबंधित शासकीय विभागांकडे वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. कार्ला फाटा ते श्री आई एकवीरा देवी मंदिर व गडावर जाणारा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा, देवस्थान परिसरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी कायमस्वरूपी पोलीस चौकी सुरू करून हवालदार नियुक्त करावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
प्रशासन आणि पोलिसांची मध्यस्थी, गुरुवारी संयुक्त बैठक: मुंबई-पुणे महामार्गावर अचानक झालेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या आणि वाहतूक विस्कळीत झाली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे आणि लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस फाटा तैनात करण्यात आला होता. काही काळानंतर मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलक ग्रामस्थांची चर्चा केली. आगामी गुरुवारी (३ सप्टेंबर) सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलावून यावर सकारात्मक व कायदेशीर निर्णय घेतला जाईल, असे अधिकृत आश्वासन तहसीलदार यांनी दिल्यानंतर हे आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आगामी नवरात्रोत्सवादरम्यान अधिक तीव्र आणि उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे.
शहर
- पुणे: मेसमधील निकृष्ट जेवण अन् पंतप्रधान मोदींच्या फोटोवरून पुण्याचे शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज आले चर्चेत
- मुंबई: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, राजकीय सूत्रांची माहिती
- मुंबई: एसटीचा मोठा निर्णय! महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड अनिवार्य
- नाशिक: महागाईचं विघ्न! आंतरराष्ट्रीय युद्ध अन् एफडीएच्या कारवाईमुळे गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ
महाराष्ट्र
- पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाइन फ्लूचा विळखा! एका महिन्यात २३ रुग्ण पॉझिटिव्ह; आरोग्य विभागाकडून तातडीने वैद्यकीय तपासणी करण्याचे आवाहन
- पुणे: मेसमधील निकृष्ट जेवण अन् पंतप्रधान मोदींच्या फोटोवरून पुण्याचे शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज आले चर्चेत
- मुंबई: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, राजकीय सूत्रांची माहिती
- मुंबई: एसटीचा मोठा निर्णय! महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड अनिवार्य
गुन्हा
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: जग चौफेर संकटात, पण भारताची वेगाने प्रगती पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला 'झूठ की गुंज' म्हणत टोला
- उत्तर प्रदेश: कौशांबीत पटाखा कारखान्यात भीषण स्फोट; महिला व बालकांसह ७ ते ८ जणांचा मृत्यू, परिसर हादरला
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा


























Subscribe to my channel



