नवी दिल्ली: देशातील परीक्षांमधील गैरप्रकार, पेपरफुटी आणि इतर प्रमुख शैक्षणिक प्रश्नांवरून आक्रमक पवित्रा घेतलेल्या अभिजीत दिपके यांच्या 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) या संघटनेने आगामी ५ सप्टेंबर रोजी दिल्लीत काढण्याचे ठरवलेल्या बहुचर्चित निषेध मोर्चाला आणि रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे 'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनाचा मार्ग मोकळा झाला असून, या प्रकरणी सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी अत्यंत महत्त्वाची टिप्पणी केली आहे.
काय आहे प्रकरण आणि याचिका?
अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली 'कॉकरोच जनता पार्टी'ने देशातील परीक्षांमधील कथित अनियमितता, रखडलेले निकाल आणि अश्वासनपूर्तीविरोधात ५ सप्टेंबर रोजी दिल्लीत एका भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. हा मोर्चा इंडिया गेटपासून सुरू होऊन थेट दिल्ली पोलीस मुख्यालय (Delhi Police Headquarters) आणि संबंधित उच्चाधिकार क्षेत्रापर्यंत नेण्याचे नियोजनCJP कडून करण्यात आले आहे. दरम्यान, या नियोजित रॅलीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि वाहतूक विस्कळीत होऊ शकते, असा युक्तिवाद करत या रॅलीला किंवा आंदोलनाला प्रतिबंध करावा, अशी मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेत न्यायालयाने कोणतीही स्थगिती देण्यास नकार दिला.
सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण:
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी स्पष्ट केले की, कोणतीही ठोस किंवा भक्कम कारण नसताना केवळ पूर्वग्रहातून किंवा अंदाज बांधून आधीच अप्रिय घटना घडतील असे गृहीत धरता येणार नाही. लोकशाही देशात नागरिकांना शांततापूर्ण मार्गाने आपले प्रश्न मांडण्याचा आणि निषेध व्यक्त करण्याचा अधिकार आहे. प्रशासकीय यंत्रणा आणि संबंधित प्राधिकाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्था राखणे ही त्यांची जबाबदारी आहे आणि ते योग्य ती काळजी घेतील, अशी अपेक्षा न्यायालयाने व्यक्त केली. तसेच, कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्याचे काम पोलीस आणि प्रशासनाचे असून, त्याआधीच आंदोलनावर सरसकट बंदी घालता येणार नाही, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.
आंदोलनाची रूपरेषा व CJP ची भूमिका:
'कॉकरोच जनता पार्टी'ने जाहीर केल्यानुसार, या आगामी मोर्चाचे नेतृत्व अशा विद्यार्थ्यांचे कुटुंबीय करणार आहेत, ज्यांनी नीट (NEET) किंवा इतर महत्त्वाच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर तसेच फेरपरीक्षा व निकालातील तणावामुळे आपले प्राण गमावले होते. याशिवाय, जुलै महिन्यातील मागील आंदोलनादरम्यान ज्या विद्यार्थ्यांना कथितरित्या पोलीस कारवाई व अत्याचारांना सामोरे जावे लागले होते, त्यांच्या कुटुंबातील सदस्यही या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. CJP च्या कार्यसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, "आमच्या शांततेला किंवा सद्भावनेला कुणीही कमजोरी समजण्याची चूक करू नये, तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्या सरकारविरोधातील हा लढा अधिक तीव्र केला जाईल," असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




