पुणे: शिवाजीनगर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील कँटीनमधील निकृष्ट जेवण आणि क्रीडा प्रशिक्षकच नसणे यावरून विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी सोमवारी (दि. ३१) महाविद्यालयाला भेट देऊन या प्रश्नांवर प्राचार्यांना जाब विचारला. तसेच कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावल्याचे पाहून तीव्र संताप व्यक्त केला. सीओईपी पाठोपाठ शासकीय तंत्रनिकेतनही आता राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.
'महाराजांच्या आणि बाबासाहेबांच्या बाजूला मोदींचा फोटो कशाला?' असा सवाल अमित ठाकरे यांनी प्राचार्यांना केला. तसेच तात्काळ फोटो हटवण्यास सांगितले. त्यावर प्रशासनाने फोटो हटवण्यास नकार देताच, मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत स्वतःच फोटो खाली उतरवला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. याबाबत प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
'नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवराय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी होऊच शकत नाही' असे स्पष्ट करत अमित ठाकरे यांनी मनविसे कार्यकर्त्यांनी फोटो हटवल्याच्या कृतीचे समर्थन केले. शासकीय प्रोटोकॉलनुसार पंतप्रधानांचा फोटो लावण्यास आक्षेप नाही, मात्र तो महापुरुषांच्या शेजारी न लावता दुसरीकडे लावावा. 'उद्या तुम्ही देवघरात मोदींचा फोटो लावाल का?' असा प्रतिप्रश्न केला. भाजपचे नेते याचा निषेध करत असतील तर त्यांना विचारा की, तुम्हाला छत्रपती शिवराय आणि मोदींची तुलना मान्य आहे का? आम्ही महाराजांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा दिला. उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनीही महाविद्यालय प्रशासनाची भेट घेऊन चर्चा केली.
पुण्यातील विविध महाविद्यालयांत मनविसेचे कॅम्पेन
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सदस्य नोंदणी अभियानांतर्गत अमित ठाकरे यांनी सोमवारी पुण्यातील विविध महाविद्यालयांना भेट दिली. गणेशखिंड रोड येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजपासून सुरू करून एक-एक करत काही महाविद्यालयांना भेटी दिल्या. सर परशुरामभाऊ महाविद्यालय, भारती विद्यापीठ कॅम्पस, वाडिया महाविद्यालय, विश्वकर्मा युनिव्हर्सिटी येथे मनविसे शाखेचे उद्घाटन केले. पुणे विद्यार्थी गृह 'कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग'लाही भेट दिली. या दरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधला, अशी माहिती मनविसेचे शहराध्यक्ष धनंजय दळवी यांनी दिली.
शहर
- मुंबई: एसटीचा मोठा निर्णय! महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड अनिवार्य
- नाशिक: महागाईचं विघ्न! आंतरराष्ट्रीय युद्ध अन् एफडीएच्या कारवाईमुळे गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ
- पुणे: मी केवळ एक आमदार, सरकारचा भाग नाही मराठा आरक्षण आणि संवादावर सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्टीकरण
- पुणे: राहुल गांधींच्या पुण्यातील 'छात्रों की गूंज' कार्यक्रमावर मुख्यमंत्र्यांचा कडाडून प्रहार; पूर्वनियोजित वाद आणि इन्फ्लुएन्सर्सना पैसे दिल्याचा गंभीर आरोप
महाराष्ट्र
- मुंबई: एसटीचा मोठा निर्णय! महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड अनिवार्य
- नाशिक: महागाईचं विघ्न! आंतरराष्ट्रीय युद्ध अन् एफडीएच्या कारवाईमुळे गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ
- पुणे: मी केवळ एक आमदार, सरकारचा भाग नाही मराठा आरक्षण आणि संवादावर सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्टीकरण
- पुणे: राहुल गांधींच्या पुण्यातील 'छात्रों की गूंज' कार्यक्रमावर मुख्यमंत्र्यांचा कडाडून प्रहार; पूर्वनियोजित वाद आणि इन्फ्लुएन्सर्सना पैसे दिल्याचा गंभीर आरोप
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: कौशांबीत पटाखा कारखान्यात भीषण स्फोट; महिला व बालकांसह ७ ते ८ जणांचा मृत्यू, परिसर हादरला
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
























Subscribe to my channel




