मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) एसटी बसने प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय लागू केला आहे. राज्य शासनाच्या विविध सवलत योजनांचा लाभ घेत एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी आजपासून (१ सप्टेंबर २०२६) 'राष्ट्रीय सामान्य गतिशीलता कार्ड' म्हणजेच 'एनसीएमसी' (NCMC) कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. या नव्या नियमानुसार, आता पात्र प्रवाशांना सवलतीचे तिकीट केवळ या एनसीएमसी स्मार्ट कार्डच्या माध्यमातूनच दिले जाणार आहे.
प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी निर्णय: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी आणि सवलतीच्या प्रवासाची प्रक्रिया अधिक पारदर्शक व तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. शासनाच्या निर्देशानुसार विविध सामाजिक घटकांना एसटी बसमधून सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना तिकिटामध्ये ५० टक्के सवलत दिली जाते, तर ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के आणि ७५ वर्षांवरील अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करण्याची सुविधा आहे. आता ही सवलत मिळवण्यासाठी प्रवाशांकडे एनसीएमसी कार्ड असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
एक कोटीहून अधिक नागरिकांची नोंदणी: एसटी महामंडळाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, या योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत तब्बल १ कोटी ११ लाख ७८ हजार ९०० नागरिकांनी एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी केली आहे. या कार्डच्या नोंदणी आणि वितरणासाठी 'ई-बिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड' या संस्थेची नियुक्ती करण्यात आली असून, राज्यातील सर्व एसटी आगार आणि बसस्थानकांवर यासंबंधीचे काम सुरू आहे.
कार्डमध्ये रक्कम टॉप-अप करण्याची सुविधा: एसटी महामंडळाने सवलतधारक महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवासाच्या वेळी आपले एनसीएमसी कार्ड सोबत ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, कार्डमध्ये प्रवासासाठी आवश्यक असणारी रक्कम आधीच 'टॉप-अप' करून ठेवावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. कार्डमध्ये पुरेशी रक्कम नसल्यास तिकीट काढताना प्रवाशांना अडचणी येऊ शकतात. ऐनवेळी होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी संबंधित सर्व प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, अशा सूचना महामंडळाकडून देण्यात आल्या आहेत. या नवीन नियमामुळे आता एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासाचे संपूर्ण नियोजन डिजिटल स्वरूपात पार पडणार आहे.
शहर
- मुंबई: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, राजकीय सूत्रांची माहिती
- नाशिक: महागाईचं विघ्न! आंतरराष्ट्रीय युद्ध अन् एफडीएच्या कारवाईमुळे गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ
- पुणे: मी केवळ एक आमदार, सरकारचा भाग नाही मराठा आरक्षण आणि संवादावर सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्टीकरण
- पुणे: राहुल गांधींच्या पुण्यातील 'छात्रों की गूंज' कार्यक्रमावर मुख्यमंत्र्यांचा कडाडून प्रहार; पूर्वनियोजित वाद आणि इन्फ्लुएन्सर्सना पैसे दिल्याचा गंभीर आरोप
महाराष्ट्र
- मुंबई: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, राजकीय सूत्रांची माहिती
- नाशिक: महागाईचं विघ्न! आंतरराष्ट्रीय युद्ध अन् एफडीएच्या कारवाईमुळे गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ
- पुणे: मी केवळ एक आमदार, सरकारचा भाग नाही मराठा आरक्षण आणि संवादावर सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्टीकरण
- पुणे: राहुल गांधींच्या पुण्यातील 'छात्रों की गूंज' कार्यक्रमावर मुख्यमंत्र्यांचा कडाडून प्रहार; पूर्वनियोजित वाद आणि इन्फ्लुएन्सर्सना पैसे दिल्याचा गंभीर आरोप
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: कौशांबीत पटाखा कारखान्यात भीषण स्फोट; महिला व बालकांसह ७ ते ८ जणांचा मृत्यू, परिसर हादरला
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल

























Subscribe to my channel




