मध्य प्रदेशातील भोजशाला संकुलाच्या वादात सर्वोच्चन्यायालयाने उच्च न्यायालयाला तीन आठवड्यांतसुनावणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणाची पुढील सुनावणी 2 एप्रिलला होईल.भोजशाला हे 11 व्या शतकातील एक संरक्षित स्मारकआहे. हिंदू समुदाय याला देवी सरस्वतीचे मंदिर मानतोतर मुस्लिम समुदाय याला कमल मौला मशीद म्हणूनओळखतो. 2003 मध्ये दोन्ही समुदायांच्या दाव्यांवरतोडगा काढण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणनेमुस्लिम समुदायाला शुक्रवारच्या दुपारी 1 ते 3 या वेळेत नमाजासाठी संकुलात प्रवेश करण्याची परवानगी दिलीतर हिंदूंना वसंत पंचमीच्या निमित्ताने धार्मिक विधी करण्याची परवानगी दिली होती. यावर्षी वसंत पंचमी शुक्रवारी आली होती. त्यामुळे न्यायालयाकडे धावघेण्यात आली. न्यायालयाने दोन्ही समुदायांना एकाच दिवशी प्रार्थना करण्याची परवानगी दिली व त्याचे वेळापत्रक व प्रवेशाची व्यवस्था ठरवली. एका पातळीवर हा हस्तक्षेप व्यावहारिक वाटतो. परंतु हेप्रकरण सामायिक धार्मिक स्थळांशी संबंधित वादांमध्येन्यायालयीन भूमिकेच्या व्याप्तीबद्दल एक घटनात्मकप्रश्न उपस्थित करते. भोजशाला प्रकरण ही एक वेगळीघटना नाही. हा एका व्यापक प्रवाहाचा भाग आहे. त्यातधार्मिक व्यवस्थांच्या देखरेखीसाठी न्यायालयांकडेअधिकाधिक प्रमाणात धाव घेतली जात आहे.न्यायालयासमोर झालेल्या चर्चेतून हे स्पष्टपणे दिसून येतेकी मुख्य मुद्दे प्रशासकीय स्वरूपाचे होते—वेळेचेव्यवस्थापन, प्रवेशाचे नियमन, गटांमधील समन्वय.सण, मिरवणुका किंवा सार्वजनिक जागांच्या सामायिकवापरादरम्यान या बाबी सामान्यतः जिल्हा प्रशासनाकडूनहाताळल्या जातात. अशा व्यवस्थापकीय व प्रशासकीयप्रश्नांना वारंवार न्यायालयीन देखरेखीची आवश्यकताभासते तेव्हा ते एका संरचनात्मक बदलाचे संकेत देते.1991 च्या प्रार्थनास्थळ कायद्याच्या पार्श्वभूमीवर हीबदलती प्रथा अधिकच महत्त्वपूर्ण ठरते. वाढत्या जातीयतणावाच्या पार्श्वभूमीवर संमत झालेल्या या कायद्याने15 ऑगस्ट, 1947 रोजी अस्तित्वात असलेले धार्मिकस्वरूप स्थिर केले आणि त्यात बदल करण्यास मनाईकेली. त्याचा उद्देश स्पष्ट होता : ऐतिहासिक धार्मिकदाव्यांची न्यायालयीन पुनर्तपासणी रोखणे आणि देशभूतकाळातील वादांमध्ये अडकणार नाही याची खात्रीकरणे. परंतु अलीकडील घडामोडींनी या कायदेशीरतडजोडीच्या योग्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.ज्ञानवापी प्रकरणात वाराणसी जिल्हा न्यायालयाने मशीदसंकुलाचे स्थान निश्चित करण्याचे आदेश भारतीयपुरातत्व सर्वेक्षणला दिले. त्या निर्णयाला उच्च न्यायालयव सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवले.याचिकाकर्त्यांनी असा युक्तिवाद केला की, असेसर्वेक्षण 1991 च्या कायद्याचे उल्लंघन करेल. अशासर्वेक्षणांमुळे निराधार दाव्यांना प्रोत्साहन मिळू शकते. याभीतीला उत्तर देताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी टिप्पणीकेली की, तुम्हाला निराधार वाटते ती दुसऱ्या पक्षासाठीश्रद्धा असू शकते. धार्मिक सहअस्तित्वासाठी कोर्टाचावारंवार घेतला जाणार आधार हा संस्थात्मक चिंतेचेद्योतक आहे. हे केवळ निःपक्षपाती मध्यस्थीसाठीकार्यकारी मंडळावरील विश्वासाचा अभावच दर्शवतनाही तर समुदायांमधील स्थानिक संवादाची कमजोरीहीउघड करते. भोजशाला प्रकरणात न्यायालयासमोरीलचर्चेतून असे दिसते की दोन्ही पक्ष व्यवहार्य तोडग्यांवरविचार करू शकले. असा सलोखा स्वागतार्ह आहे.अशा प्रशासकीय व्यवस्था सहसा सण आणि इतर प्रसंगीजिल्हा स्तरावर केल्या जातात. मात्र त्यासाठीन्यायालयांच्या मंजुरीची गरज भासते तेव्हा ते प्रशासकीयविश्वासार्हतेवरील विश्वास कमी होत असल्याचे लक्षणअसू शकते. (ही लेखकांची वैयक्तिक मते आहेत) भोजशाला येथील प्रकरण ही एक वेगळीघटना नाही. केवळ हक्क निश्चितकरण्यासाठीच नव्हे तर धार्मिकव्यवस्थेच्या देखरेखीसाठीहीन्यायालयाकडे धाव घेतली जात आहे.अशा प्रवाहाचा हा भाग म्हणावा लागेल.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुणे पदवीधरमध्ये भाजपला धक्का; शरद लाडांचा अचानक अर्ज!
पुण्यात ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत दुचाकी रॅली; मुरलीधर मोहोळ हेल्मेट घालून सहभागी
भारतीय हवाई दलाची ऐतिहासिक कार पुन्हा चर्चेत; १९६० ची फोर्ड गॅलॅक्सी!
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



