सिंधुदुर्ग: कणकवली मुलांना सरकारी खात्यांमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून प्रत्येकी २४ लाख असे पाच मुलांचे १ कोटी २० लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची तक्रार कणकवली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत कलमठ येथील सुनील दामोदर धुरे (वय ५९) यांनी तक्रार दिली. याप्रकरणी विनिता विवेक मुंज (रा. कणकवली, पटकीदेवी मंदिराशेजारी), सुबत्ता गिरीश माळी (रा. पुणे), मनोज जैन या तिघांविरुद्ध गंभीर आरोप केले असून पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा अशी मागणी केली.
तक्रारीनुसार, सुनील धुरे हे जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथून नेत्र चिकित्सक अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झाले असून त्यांची पत्नी सुनिता धुरे या आरोग्य विस्तार अधिकारी आहेत. फोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असताना त्यांची ओळख विनिता विवेक मुंज यांच्याशी झाली. त्यानंतर ऑक्टोबर २०२४ मध्ये विनिता मुंज यांनी केंद्र शासनाच्या फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तसेच मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे ऑफ इंडिया या विभागांमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
नोकरीसाठी प्रत्येक उमेदवाराकडून २४ लाख रुपये लागतील असे सांगितले. विश्वासाने सुनील धुरे व त्यांच्या पत्नीने विविध टप्प्यांत विनिता मुंज यांना पैसे दिल्याचा दावा केला आहे. ११ डिसेंबर २०२४ रोजी आरटीजीएसद्वारे ६ लाख रुपये, त्यानंतर १० जानेवारी २०२५ रोजी आणखी ४ लाख रुपये पाठविण्यात आले. पुढे विविध वेळा रोख रक्कम, कर्ज, बचत व आरडी मोडून एकूण ४८ लाख रुपये दिले.
प्रशिक्षणासाठी दिल्लीला बोलावले
मुलांना दिल्ली येथे मेडिकल व प्रशिक्षणासाठी बोलावण्यात आले. त्यानंतर उमेदवारांना फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तसेच नंतर मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे ऑफ इंडिया या विभागांचे नियुक्तीपत्र पोस्टाने मिळाल्याचे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात नोकरी लागली नाही. दोन महिन्यांचे प्रशिक्षण दिल्याचे सांगितले असले तरी कोणतेही अधिकृत प्रशिक्षण झाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
केवळ २ लाख परत मिळाले
वारंवार पाठपुरावा केल्यानंतर १४ फेब्रुवारी २०२६ रोजी १ लाख रुपयांचा धनादेश, तसेच ४ जून २०२६ रोजी ५० हजार रुपये रोख आणि ५० हजार रुपये यूपीआयद्वारे असे मिळून केवळ २ लाख रुपये परत मिळाले. उर्वरित ४६ लाख रुपये अद्याप परत मिळालेले नाहीत.
यांचीही झाली फसवणूक तक्रारीत इतर पालकांचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रताप प्रभाकर दळवी यांनी २४ लाख रुपये (१० लाख आरटीजीएस व १४ लाख रोख), मनीषा मनोहर नाईक यांनी २४ लाख रुपये (९ लाख आरटीजीएस व १५ लाख रोख) आणि संतोष बाबाजी मसके यांनी २४ लाख रुपये रोख दिल्याचा उल्लेख आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
शहर
- बीड: मुंबईकडे निघाल्यादरम्यान पाटोद्यात मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावली; बेडवरून हलणेही झाले कठीण, डॉक्टरांकडून तातडीचा इशारा
- मुंबई: गोरेगाव चेकनाक्याजवळ बिबट्याचा वाढता वावर; दूधसागर सोसायटी परिसरातील रहिवासी प्रचंड दहशतीखाली, अंधार पडताच नागरिक घरातच
- मुंबई: ओबेरॉय मॉल सिग्नलजवळ अनियंत्रित बेस्ट बस कारला घासून थेट मेट्रोच्या खांबावर आदळली, दोघे जण जखमी
- मुंबई: मिरा-भाईंदर जमीन विवाद प्रकरणाला मोठे वळण; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बालमित्राच्या तक्रारीनंतर भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांनी सोडला वादग्रस्त जमिनीचा ताबा
महाराष्ट्र
- मराठवाडा: कोरडा दुष्काळ आणि पीकविम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा महामार्ग बंद; वाहतूक पूर्णपणे विस्कळीत!
- नागपूर: आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर; कॉकरोच जनता पक्षाचे प्रमुख अभिजित दिपके यांच्याकडून 'आदिवासी शाळा ठीक करा' नवीन अभियानाची घोषणा
- महाराष्ट्र: ११ रुपयांची सलाईनची नळी थेट ३२५ रुपयांना; आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंनी खासगी रुग्णालयांच्या अवाजवी नफेखोरीचा आणि आरडाओरड्याचा पोलखोल केला
- भंडारा: ऋषीपंचमीच्या स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू, चार महिला वारकरी गंभीर जखमी
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही





























Subscribe to my channel




