एआयच्या मदतीने काम पूर्ण करणाऱ्या लोकांना विचारा की, ते याद्वारे किती वेळ वाचवतात? 'एआयने आमचे काम सोपे नाही तर अधिक कठीण केले आहे,' असे म्हणून ते तुम्हाला चकित करू शकतात. केवळ कर्मचाऱ्यांचीच नाही, तर एआयच्या सर्वात मोठ्या समर्थकांचीही हीच अपेक्षा होती की, यामुळे कामाचा भार कमी होईल आणि लोकांना उच्चस्तरीय सर्जनशील कामांसाठी अधिक वेळ मिळेल. बिल गेट्स आणि जेपी मॉर्गन चेसचे जेमी डायमन यांसारख्या तंत्रज्ञान आणि व्यवसाय क्षेत्रातील दिग्गजांनीही म्हटले होते की, 'एआयमुळे अखेर लोकांना जास्त नाही तर कमी काम करावे लागेल आणि कामाचे दिवस कमी होऊ शकतात.' इलॉन मस्क यांनी तर म्हटले होते की, पुढील दोन दशकांत एआय आणि रोबोट्सच्या प्रगतीमुळे काम करणे हे ऐच्छिक ठरू शकते. परंतु, सध्या तरी सर्व काही याच्या उलट घडत असल्याचे संशोधनातून दिसून येत आहे. असे का घडत आहे? असे नाही की एआय कार्यक्षमता वाढवत नाही. खरे तर एआय जी क्षमता किंवा वेळ वाचवते, त्याचा वापर लगेच दुसऱ्या कामात केला जातो. यामुळेच कामाचा ताण वाढू लागतो. उदाहरणार्थ, जर कुणी एआयच्या मदतीने एखादा प्रकल्प करत असेल, तर प्राथमिक अहवाल काही सेकंदांत तयार होतो. पण त्याचसोबत एआय असेही सुचवते की, 'मी या गोष्टीचाही विचार करू का?' किंवा 'तुमच्या कंपनीच्या गरजेनुसार मी अंमलबजावणीची योजना जोडू शकतो' किंवा 'तुमच्या ग्राहकांची यादी मला माहीत असल्याने मी त्यांच्या आवडीनुसार यात बदल करू शकतो.' अशा प्रकारे एआय एकावर एक 7-8 स्तरांपर्यंत नवीन गोष्टी जोडत जाते, ज्याचा कर्मचाऱ्याने विचारही केलेला नसतो किंवा ज्यांची गरजही नसते. एआयच्या याच सवयीमुळे वापरकर्ता एकाच कामाच्या खोलात शिरत जातो आणि थकून जातो. 'ॲक्टिव्हट्रॅक' या उत्पादकता ट्रॅकिंग सॉफ्टवेअर कंपनीने नुकताच कामाच्या सवयींवर होणाऱ्या एआयच्या परिणामाचा एक मोठा अभ्यास पूर्ण केला. यामध्ये 1,111 नियोक्त्यांच्या 1.64 लाख कर्मचाऱ्यांच्या 44 कोटी तासांहून अधिक डिजिटल क्रियाकलापांचा अभ्यास करून काही मनोरंजक तथ्ये समोर आणली आहेत. एआय टूल्स वापरण्यापूर्वीच्या आणि नंतरच्या 180 दिवसांतील कर्मचाऱ्यांच्या हालचालींचे निरीक्षण केल्यावर असे आढळले की, जवळपास सर्वच क्षेत्रांत कामाचा वेग वाढला. ईमेल, मेसेजिंग आणि चॅट ॲप्सवर घालवला जाणारा वेळ दुपटीहून अधिक झाला. दुसरीकडे, एकाग्रतेने आणि कोणत्याही व्यत्ययाशिवाय केल्या जाणाऱ्या कामाचा वेळ 9 टक्क्यांनी कमी झाला. हा तो वेळ असतो जो गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी, नवीन कल्पना तयार करण्यासाठी आणि त्या लागू करण्यासाठी आवश्यक असतो. प्रशासकीय कामे स्वयंचलित(ऑटोमेट) करण्यासाठी ज्या कंपन्यांनी एआय विकसित केले, त्यांनाही याचा फटका बसत आहे. कारण स्वयंचलित कामच पूर्ण होत नाहीये. कर्मचारी तेच काम वारंवार करणे, त्यात सुधारणा करणे आणि पुन्हा एआयच्या सूचना जोडण्यात गुंतलेले असतात. यात जास्त वेळ खर्ची पडतो. लोक कमी नाही
तर जास्त काम करत आहेत. बर्कले येथील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या हास स्कूल ऑफ बिझनेसमधील सहयोगी प्राध्यापिका अरुणा रंगनाथन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'एआय आपल्याला अतिरिक्त कामात गुंतवून ठेवते. ते काम काही प्रमाणात सोपे करत असले तरी आपण त्यात अडकून पडतो, ज्यामुळे फक्त वेगाने काम केल्याची जाणीव होते.' एआय टूल्ससोबत काम करण्याचा सरासरी वेळ आठपटीने वाढला असल्याने, एआयचा वापर कसा करावा की ऊर्जा आणि उच्च उत्पादकता दोन्ही टिकून राहतील? तज्ज्ञांच्या मते, जे लोक आपल्या एकूण कामाच्या वेळेपैकी 7 ते 10 टक्के वेळ एआय टूल्सवर खर्च करतात, त्यांची उत्पादकता सर्वाधिक असते. फंडा हा आहे की, एआय ही दुधारी तलवार आहे. ते तुम्हाला वेगाने पुढे नेऊ शकते, पण अधिक खोलात जाण्यासाठी भुरळही घालू शकते. जर तुम्ही एकाच कामाच्या खोलात जात राहिलात, तर पुढचे काम करण्यासाठी तुम्ही पुन्हा मूळ पातळीवर येऊच शकणार नाही. त्यामुळे सध्या तरी याचा वापर संयमाने करणेच हिताचे आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणेः पोलीस दलात मोठी खळबळ! औंध परिसरातील राहत्या घरी पोलीस उपनिरीक्षकाने डोक्यात गोळी झाडून संपवले जीवन
- पुणे: अजितदादा खूप मोठ्या मनाचे होते, पण मी दादांसारखी नाही; पुरुषोत्तम जगतापांना लक्ष्य करत सुनेत्रा पवारांचा कडक इशारा!
- नाशिक: प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! १७ ऑक्टोबर रोजी नाशिक-मुंबई रेल्वेसेवेला बसणार मोठा 'ब्रेक'; अनेक गाड्या रद्द किंवा विचलित!
- पुणे: मक्याच्या भाकरीऐवजी मुरघासाला मका; पावसाअभावी पिके करपल्याने इंदापुरातील शेतकऱ्यांचा हटके आणि फायदेशीर हिशेब!
महाराष्ट्र
- पुणेः पोलीस दलात मोठी खळबळ! औंध परिसरातील राहत्या घरी पोलीस उपनिरीक्षकाने डोक्यात गोळी झाडून संपवले जीवन
- वर्धा: 'घरकुल योजनेचा' लाभ न मिळाल्याने थेट नगरपरिषदेत नागरिकाने अंगावर ओतून घेतले रॉकेल!
- परभणी: बळीराज्याला वाऱ्यावर सोडणार नाही, सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकऱ्यांचाच; परभणीत एकनाथ शिंदेंची ठाम ग्वाही!
- सिंधुदुर्ग: मुसळधार पावसाचे तांडव! कुडाळमध्ये ओहोळात वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, करूळ घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
गुन्हा
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनादरम्यान आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश; राहुल आणि प्रियंका गांधींव्यतिरिक्त इतर नेत्यांवर गुन्हा दाखल!
- बेंगळुरु: हिंदी शिकत नसाल तर नोकरी सोडून निघून जा; बंगळुरुच्या वेअरहाऊसमध्ये भाषिक वाद विकोपाला, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल अन् मोठा संताप
- नवी दिल्ली: मोठ्या बंदोबस्तात महिलांशी गैरव्यवहार ; दिल्लीतील 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सरकारवर गंभीर आरोप
- नवी दिल्ली: हे आपण करून दाखवणारच ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाची २५ वर्षे पूर्ण, विकसित भारत २०४७' च्या संकल्पावर भर
























Subscribe to my channel





Promote our products—get paid for every sale you generate!