19 मार्च 26 रोजी (या वर्षीही) मला अन्नत्याग/उपवास करणे भाग पडले आहे. कारण या वर्षीही महाराष्ट्रात दोन हजाराहून अधिक शेतकऱ्यांनां आत्महत्या करणे भाग पडले आहे. त्या थांबविण्यात मी कमी पडलो. सरकारकडून शेतकरीविरोधी कायदे रद्द करून घेणे या वर्षीही जमले नाही. या आत्महत्यांची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे. पण सरकारला लाज वाटत नाही. सरकार कोडगे झाले आहे. सरकार मारेकरी असल्यामुळे त्याला शेतकरी मेल्याचे दुःख होत नाही. मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. अजुनही माझ्या संवेदना जाग्या आहेत. निरपराध माणसाची पावले मरणाकडे जाताना पाहून माझे मन कासावीस होते. मरणाकडे जाणारी पावले मला थांबावता येत नाहीत, ही जाणीव मला अस्वस्थ करते. असाह्यतेची जाणीव करून देते. या जाणीवतून मला अन्नत्याग / उपवास करावा लागतो. 19 मार्च 2017ला मी असा उपवास करण्याचे ठरवले. त्यास संतोष अरसोड सारख्या अनेक मित्रांनी पाठिंबा दिला. महागावला अनेक मान्यवर माझ्या सोबत उपोषणाला बसले होते. त्यानंतर दरवर्षी 19 मार्चला अन्नत्याग/उपवास होत आहे. लाखो लोक अन्नत्याग करतात. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात, देशात काही प्रमाणात व अन्य देशातील किसानपुत्र काही प्रमाणात सहभागी होतात. या दिवसाला 'शेतकरी सहवेदना दिवस' असे नाव पडले. अन्नत्याग करून दिवस पालणारे हजारो कुटुंबे आहेत. या दहा वर्षात सरकारवर शेतकरी आत्महत्याचा साधा ओरखडा देखील उमटला नाही पण शेतकरी जीवनात मोठी उलथापालथ झाली आहे. मागच्या दहा वर्षाच्या काळात शेती हे एकमेव उत्पन्नाचे साधन असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. हा एक मोठा बदल आहे. माझ्याकडे अधिकृत आकडेबारी उपलब्ध नाही पण माझा नजरी-अंदाज असा आहे की, आज 85 टक्के ग्रामीण कुटुंबात शेतीबाह्य पैसा येऊ लागला आहे. शेती हे जळते घरी आहे, आपण निखाऱ्यावर चालत आयुष्य काढले असले तरी हे जळते आयुष्य लेकरांच्या वाट्याला येऊ नये याची जाणीव झाल्या बरोबर 1980 पासून शेतकऱ्यांनी आपल्या मुलांना शेतीतून बाहेर काढायला सुरुवात केली. हे शेतकऱ्यांचे उपजत शहाणपण होते. कोण्या नेत्याने सांगितले म्हणून त्यांनी हा मार्ग स्वीकारला नाही तर परिस्थितीने त्यांना हे शहाणपण दिले आहे. शहराच्या जवळच्या खेड्यात सक्तीच्या स्थलांतराचे प्रमाण खूप जास्त आहे. हे केवळ स्थलांतर नसून हे 'महान व्यवसायांतर' आहे. शेतीवरील अवलंबन कमी करनारी ही ऐतिहासिक घटना आहे. शेतकरी आत्महत्या कोणत्या कुटुंबात होतात? हे बारकाई ने पाहिले तर दिसून येते की 1) तो अत्यल्प भू धारक असतो 2) त्याचे एकमेव उत्पन्नाचे साधन शेती असते. शेतजमिनीच्या विखंडनाचे मुख्य कारण सीलिंग कायदा आहे. हा कायदा कायदेभंग सत्याग्रह करून मोडता येतो नाही. सरकारी कायद्यामुळे शेतीचे विखंडन शेतकरी थांबवू शकत नाही. तो कायदा सरकारच रद्द करू शकते. या ठिकाणी शेतकरी हतबल आहेत. पण 'उत्पन्नाचे एकमेव साधन शेती राहता कामा नये' यासाठी मात्र शेतकरी जीवाचा आटापिटा करू शकतात. तसा त्यांनी केला. 85 टक्के शेतकरी कुटुंबात आज शेतीबाह्य पैसा येऊ लागला आहे. याचा अर्थ त्या कुटुंबातील आत्महत्या टळली आहे. आज फक्त 15 टक्केच शेतकरी कुटुंबावर आत्महत्यांची तलवार लटकती आहे. शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या घटली म्हणून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या त्या प्रमाणात घटली का?तर तसे दिसून येत नाही. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तेवढ्या प्रमाणात कमी झालेली दिसत नाही. आजच्या पेक्षा दुप्पट कुटुंबे जेंव्हा शेतीवर अवलंबून होती, तेंव्हा जेवढ्या आत्महत्या होत असत, जवळपास तेवढ्याच आत्महत्या आजही होत आहेत. याचा अर्थ, शेती आणि शेतकऱ्यांची परिस्थिती जास्त बिकट झाली आहे. काळोख अधिक गडद झाला आहे. वरील पार्श्वभूमीवर यंदाच्या 19 मार्चला अन्नत्याग करणे संयुक्तिक ठरते म्हणून मी हा उपवास करण्याचे ठरवले आहे. 2017ला पहिला अन्नत्याग / उपवास मी चिलगव्हाण (दिवंगत साहेबराव करपे यांचे गाव) येथे सुरु केला होता. या वर्षी म. फुले यांच्या भावानी पेठ, पुणे येथील वाड्यात असणार आहे. वरील सर्व परिस्थितीचा विचार करून मी 19 मार्चला अन्नत्याग करून आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱ्यांनां श्रद्धां्धांजली अर्पण करणार आहे आणि शेतकरी स्वातंत्र्यासाठी शेतकरीविरिद्धी कायदे रद्द करण्याचा निर्धार करणार आहे. तुमचे तुम्ही ठरवा.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: गणेश विसर्जन मिरवणूक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून तब्बल २६ ठिकाणी वाहन पार्किंगची जय्यत व्यवस्था!
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- पुणे: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा निश्चित; २४ ऑक्टोबरला करणार 'प्रेरणास्थळा'चे उद्घाटन, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा!
महाराष्ट्र
- नंदुरबार: प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या आणि नियम मोडणाऱ्या दोन खासगी बसेसवर मोठी कारवाई; आरटीओच्या वायुवेग पथकाकडून दंड वसूल!
- जालना: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी अन् हेक्टरी भरपाई द्या; मागण्या मान्य न झाल्यास पाटोद्यावरून मुंबईकडे कूच करण्याचा मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा
- गोवा:राजकारणात खळबळ मंत्री विश्वजित राणे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व इतर नेत्यांची भेट, दिल्लीत महत्त्वपूर्ण चर्चा!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांना मोठा दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

१०७ वर्षे जुन्या गणेशोत्सव मंडळात १६ फूट बाप्पांवर पहिल्यांदाच 3D मॅपिंग!
कारखेल खुर्दच्या गणपती विसर्जनात चिमुकल्यांनी साकारले महापुरुष-संत! 🙏✨
वर्दीची दुसरी बाजू! पोलिसांनी गणेश मंडळाच्या गाड्याला रेटण्यासाठी केली मदत!
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!






























Subscribe to my channel





Join our affiliate program today and earn generous commissions!
Become our partner now and start turning referrals into revenue!
Share our products and watch your earnings grow—join our affiliate program!