
- Mumbai : महायुतीमध्ये समावेश होण्यासाठी भाजपकडून साफ नकार मिळाल्याने अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुंबई महापालिकेसाठी उमेदवार यादी रविवारी सायंकाळी जाहीर केली. पहिल्या यादीत ३७ उमेदवारांच्या नावाचा समावेश असून जवळपास १०० जागांवर पक्ष निवडणूक लढविणार असल्याचे कळते.
- विशेष म्हणजे, पहिल्या यादीत नवाब मलिक यांची बहीण डॉ. सईदा खान, बंधू कप्तान मलिक आणि कप्तान मलिक यांची सून बुशरा मलिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच, गेल्या २४ तासांत शरद पवार यांच्या पक्षातून राष्ट्रवादीत आलेल्या कार्यकर्त्यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आमदार सुनील राऊत यांच्या जवळचा आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सज्जू मलिक यालाही पक्षाने उमेदवारी दिली आहे.
- मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीमधील प्रवेशावरून भाजपने नवाब मलिक यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला नकार दिला होता. तरीही प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भाजपचे मंत्री आशिष शेलार यांच्याशी चर्चा सुरू ठेवली होती. परंतु, अखेर, भाजपकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद न आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने रविवारी रात्री ३७ उमेदवारांचा समावेश असलेली पहिली यादी जाहीर केली.
- पहिल्या यादीत, नवाब मलिक यांच्या घरातीलच तीन जणांचा समावेश आहे. वॉर्ड क्रमांक १६५ मधून अब्दुल रशीद ऊर्फ कप्तान मलिक, १६८ मधून डॉ. सईदा खान आणि १७० मधून कप्तान मलिक यांची सून बुशरा परवीन मलिक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. रविवारी पहिली यादी जाहीर करत ही निवडणूक नवाब मलिक यांच्या नेतृत्वातच लढवित असल्याचे थेट प्रत्युत्तर पक्षाकडून भाजपला देण्यात आले आहे.
- बहुतेक पक्षांचे उमेदवार निश्चित होत असल्याने संधी हिरावल्याची कुणकुण लागलेल्या माजी नगरसेवक तसेच कार्यकर्त्यांनी पक्षांतराला सुरुवात केली आहे. रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात अशा कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचंद्र पक्षाचे ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक धनंजय पिसाळ, मुंबई प्रदेश प्रवक्ते मनीष दुबे हे गेल्या २४ तासांत राष्ट्रवादीत दाखल झाले होते. या दोघांनाही पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर मनसेचे अणुशक्तीनगर विधानसभा विभागअध्यक्ष रवींद्र गवस हे दोन दिवसांपूर्वी पक्षात दाखल झाले होते. त्यांची मुलगी रचना गवस यांना पक्षाने वॉर्ड १४३ मधून उमेदवारी दिली आहे. तर २०१२मध्ये महापालिका निवडणुकीत मनसेकडून निवडणूक लढवलेले दिलीप पाटील यांना १४४ मधून उमेदवारी मिळाली आहे.
- भांडुप परिसरात खंडणीखोरी, मारहाण अशा गुन्हेगारी कृत्यात सहभागी असलेला आणि शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार सुनील राऊत यांचा जवळचा मानण्यात येणाऱ्या सज्जू मलिक यालाही राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. शहरातील बहुतांशी सर्व भागात पक्ष निवडणूक लढवणार असून आणखी दोन याद्या पक्षाकडून जाहीर करण्यात येणार आहेत.
- वादग्रस्त नितीन देशमुख यांचीही उडी ?
- उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत जवळ येत असताना संधी मिळावी यासाठी उड्या मारण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांचे विश्वासू समजले जाणारे नितीन देशमुख हे पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांशी हाणामारी केल्यावर चर्चेत आले. त्यानंतर पक्षाने त्यांच्या गळ्यात प्रवक्तेपदाची माळही टाकली होती. काही दिवसांपूर्वी पवई येथील निवासी संकुलात हाणामारी केल्याने देशमुख यांना तुरुंगामध्येही जावे लागले. रविवारी रात्री राष्ट्रवादीच्या मुख्यालयात ते दाखल झाले. पत्नी प्रियांका देशमुख यांना १२४ या वॉर्डमधून उमेदवारी मिळावी यासाठी देशमुख प्रयत्नशील होते. मात्र, स्वतःच्या पक्षात संधी मिळत नसल्याने देशमुख थेट अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात आले. मात्र, त्यांचा प्रवेश झाला की नाही, याला दुजोरा मिळाला नाही.
- आगामी महापालिका निवडणूक नवाब मलिक यांच्याच नेतृत्वात लढविण्यात येणार आहे. सर्व जातीधर्माच्या कार्यकर्त्यांना संधी देत असतानाच तरुणांना विशेषतः महिलांना आम्ही संधी दिली आहे. - आमदार सना मलिक
हे पण वाचा-
शहर
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
- मुंबईत पाणी माफियांचा खेळ खल्लास! पालिकेकडून वॉटर टँकरसाठी 'OTP' सिस्टीम लागू; आता घरबसल्या करा पारदर्शक बुकिंग!
- उत्तर प्रदेशात 'सैराट'सारखा थरार! परीक्षा केंद्राबाहेर पडलेल्या पत्नीला घेण्यासाठी आलेल्या पतीची साल्याकडून हत्या
महाराष्ट्र
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
- मुंबईत पाणी माफियांचा खेळ खल्लास! पालिकेकडून वॉटर टँकरसाठी 'OTP' सिस्टीम लागू; आता घरबसल्या करा पारदर्शक बुकिंग!
- उत्तर प्रदेशात 'सैराट'सारखा थरार! परीक्षा केंद्राबाहेर पडलेल्या पत्नीला घेण्यासाठी आलेल्या पतीची साल्याकडून हत्या
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
- ८ जून २०२६ रोजी कोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? जाणून घ्या तुमचे भविष्य!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
- इस्रायलमध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा; भारत-इस्रायल मैत्रीची नवी गाथा
- दाम्पत्य रस्ता चुकले, जिवाला मुकले! गोवा बांबोळी महामार्गावर कारची दुचाकीला जोरदार धडक; वृद्ध पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

























Subscribe to my channel


