
Pune : मोठ्या कालावधीनंतर होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शनिवारी जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात आणि शांततेत मतदान पार पडले. ठिकठिकाणच्या मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्या होत्या. सकाळी उत्साहात असलेला मतदानाचा वेग दुपारी मंदावला होता. सायंकाळच्या सुमारास मतदारांनी पुन्हा रांगा लावल्या. काही ठिकाणी वेळ संपल्यानंतरही रांगा लागलेल्याच होत्या. लग्नतिथीचा मुहर्त जोरात असल्याने याचा काहीसा परीणाम मतदानावर झाला. व-हाडी मंडळीनी सकाळीच मतदान केंद्रात जाऊन मतदानाचे कर्तव्य बजावले.
बारामतीत मतदान केंद्रे ओसाड
बारामती : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी बारामती तालुक्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर लोकशाहीचा नेहमीचा उत्साह या वेळी पूर्णपणे हरवलेला दिसून आला. मतदान केंद्रांवर गर्दी नव्हती, उत्सुकता नव्हती आणि प्रचाराचा शेवटचा जोरही जाणवला नाही. गावपातळीवरील पुढारी, नेते, सत्ताधारी-विरोधक नाराज मुद्रेने मतदारांची वाट पाहत बसले होते. ‘मतदान करा... शंभर टक्के मतदान झाले पाहिजे... मी विकास केला आहे... गावात पाणी दिले आहे, शेतकरी-मजुरांच्या आरोग्याची काळजी घेतो,’ असे ठामपणे सांगणारे अजित पवार या वेळी कुठेच दिसले नाहीत. परिणामी, अनेक मतदान केंद्रे ओसाड भासत होती. प्रशासनाने केलेल्या जनजागृतीमुळेच मतदानाचा टक्का कसाबसा ५० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकला. या निवडणुकीवर अजित पवार यांच्या निधनाची छाया स्पष्टपणे दिसून आली. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली राजकीय पोकळी आणि भावनिक धक्का थेट मतदानावर परिणाम करणारा ठरला. त्यामुळे ही जिल्हा परिषद निवडणूक केवळ आकड्यांपुरती मर्यादित न राहता, बारामतीच्या राजकीय इतिहासातील एक भावनिक आणि वेगळी, थंडावलेली निवडणूक म्हणून नोंदली जाण्याची शक्यता आहे.
|
|
दौंड तालुक्यात सुरळीत मतदान
दौंड : जिल्हा परिषदेच्या सात गटांसाठी ३४, तर पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ३५ उमेदवार रिंगणात होते. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्य लढत होत असून, काही ठिकाणी बंडखोर व अपक्ष उमेदवारांनी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना आव्हान दिले. कानगाव-गोपाळवाडी गटातील सोनवडी गावात नववधू स्नेहल येवले यांनी परिवारासह मतदान केले आणि नंतर वऱ्हाड लग्नासाठी परगावी रवाना झाले. पाटस-कुरकुंभ गटातील कुरकुंभ येथे रांगोळी काढून व फुग्यांच्या कमानीने मतदारांचे स्वागत करण्यात आले. देऊळगाव राजे गणातील मलठण गावात गजराबाई उगले यांनी मतदानापूर्वीच मतदान प्रतिनिधीने बटण दबल्याची तक्रार केली. कानगाव येथे मतदान केंद्र वाढवल्याने अनुक्रमांक आणि भाग क्रमांकाचा गोंधळ झाला. रयत क्रांती संघटनेचे भानुदास शिंदे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. खामगाव येथे भटक्या समाजातील संपूर्ण परिवाराने उत्साहाने मतदान केले. केडगाव येथील धुमळीचा मळा मतदान केंद्रात पोहोचला मतदान करू न दिल्याची तक्रार मतदाराने केली.
जुन्नरला मतदान यंत्र बदलले
जुन्नर : जुन्नरला झेडपी-पंचायत समिती निवडणुकीसाठी ६१.१५ टक्के मतदान झाले. तालुक्यात काही ठिकाणी कार्यकर्त्यांची लगबग आणि किरकोळ घोषणाबाजीचे प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. आळे येथील ३७ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर लावलेल्या मतदान यंत्रातून सातत्याने बीप आवाज येवू लागल्याने तेथील यंत्र पहिल्या एक तासात बदलण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्वप्नील मोरे यांनी सांगितले. मतदान प्रक्रीया सुरळीत पार पडल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील; तसेच सहाय्क निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुनील शेळके यांनी दिली.
आंबेगावात शांततेत मतदान
मंचर : आंबेगाव तालुक्यात मतदारांमध्ये अत्यंत उत्साह दिसून आला. घोडेगाव-पेठ- अवसरी बुद्रुक गट, निरगुडसर- पारगाव- कळंब-चांडोली, शिनोली-बोरघर या गटांसाठी गावागावांमध्ये मतदारांमध्ये उत्साह पाहावयास मिळाला. तालुक्याच्या पूर्व भागातील गावडेवाडी अवसरी बुद्रुक, निरगुडसर, पारगाव, खडकवाडी, लोणीधामणी व पोंदेवाडी येथे मतदारांनी सकाळपासूनच रांगा लावून उन्हाच्या आधी उत्साहात मतदान केले. निरगुडसर येथे अनसुया महिला उन्नती केंद्राच्या अध्यक्षा किरण वळसे पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला. खडकवाडी येथे लग्न असूनही नवरदेव प्रमोद बाबाजी डोके यांनी नवरदेवाच्या पोशाखात वऱ्हाडी मंडळींसमवेत मतदानाचा बजावला.
खेडमध्ये तणाव
राजगुरुनगर : खेड तालुक्यात किरकोळ घटना वगळता शांततेत मतदान पार पडले. पाईट गटात मतदानाच्या आदल्या रात्री धामणे येथे जिल्हा परीषदेचे माजी गटनेते शरद बुट्टे पाटील आणि एका कार्यकर्त्याला गाडी अडवून अंधारांचा फायदा घेऊन मारहाण केल्याच्या प्रकारामुळे तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिस यत्रंणेने बंदोबस्त वाढवून सर्तकता बाळगल्याने सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. तालुक्यातील आठ गटांतील २८ उमेदवारांसह १६ गणांमधील ६१ उमेदवारांचे विजयाचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. सोमवारी हुतात्मा राजगुरू तालुका क्रीडा संकुलात मतमोजणी होणार आहे.
भोरमध्ये मतदारांचा उत्साह
भोर : भोर तालुका पंचायत समितीच्या आठ गणांत आणि जिल्हा परिषदेच्या चार गटांत सर्वत्र शांततेत मतदान झाले. सकाळपासून सर्वत्र मतदानाचा उत्साह दिसत होता. ४९ उमेदवारांनी त्यांच्या गावात मतदानाचा हक्क बजावला. माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशानंतर प्रथमच ही निवडणूक होत आहे. त्यामुळे आमदार शंकर मांडेकर व माजी आमदार थोपटे यांच्यासाठी निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या चारही गटांत हायहोल्टेज लढती झाल्या आहेत. भाजप व राष्ट्रवादीमध्ये काही ठिकाणी झालेल्या बंडखोरीचा फटका कोणाला बसणार, हे सोमवारी समजणार आहे. रणजित शिवतारे व स्वरूपा थोपटे, विक्रम खुटवड व चंद्रकांत बाठे, पोपटराव सुके व अमोल पांगारे, विठ्ठल आवाळे व प्रवीण जगदाळे यांच्यात ‘काँटे की टक्कर’ पाहायला मिळत आहे.
इंदापुरात मतदानाची चुरस
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शांततेत मतदान पार पडले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ५१.७२ टक्के मतदान पार पडल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिली. इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषद सदस्यपदाच्या आठ जागांसाठी ४१ उमेदवारांचे, तर पंचायत समितीच्या १६ जागांसाठी ७२ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे. तालुक्यातील ४०० मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भरणेवाडीतील बोराटेवस्ती मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला, तर माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथील मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदानाचा हक्क बजाविला.
शहर
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
गुन्हा
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.



























Subscribe to my channel




1 thought on “ZP Election : जिल्हा परिषदेसाठी शांततेत मतदान; ‘मिनी मंत्रालय’च्या कारभाऱ्यांचे भवितव्य मतदानयंत्रात कैद, निकाल सोमवारी”