सोलापूर: उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी धरणात वर्षानुवर्षे साचलेला गाळ वैज्ञानिक पद्धतीने तातडीने काढणे अत्यंत आवश्यक आहे. याचबरोबर धरणात नवीन गाळ साचू नये, यासाठी भीमा नदीच्या संपूर्ण प्रवाह क्षेत्रात प्रभावी उपाययोजना राबविणे ही काळाची गरज आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांनी भीमा नदीत वाहून जाणारा गाळ, सांडपाणी व घनकचरा रोखण्यासाठी ठोस आणि दीर्घकालीन नियोजन करणे आवश्यक आहे. नदीपात्रातील तसेच उपनद्यांवरील योग्य ठिकाणी लघु बंधारे (Check Dams), गाळ अडविणारे बंधारे (Silt Traps) आणि गाळ संकलन व्यवस्था उभारून वेळोवेळी गाळ काढण्याची जबाबदारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींना देण्यात यावी. यासाठी स्वतंत्र निधी, निश्चित कालबद्ध कार्यक्रम आणि प्रभावी देखरेख व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून मोठ्या प्रमाणावर मैलायुक्त सांडपाणी, प्लास्टिक, रासायनिक प्रदूषके, घरगुती व औद्योगिक कचरा तसेच इतर घनकचरा नदीपात्रात सोडला जातो. हा सर्व प्रदूषित प्रवाह भीमा नदीमार्गे उजनी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये येऊन साचतो. परिणामी धरणातील पाण्याची गुणवत्ता सातत्याने खालावत असून जलप्रदूषणात मोठी वाढ होत आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर साचणाऱ्या गाळामुळे धरणाची पाणी साठवण क्षमता दिवसेंदिवस कमी होत आहे.
नदीतून वाहून येणारा गाळ वर्षानुवर्षे धरणात जमा होत असल्याने जलसाठा क्षेत्र उथळ होत चालले आहे. त्यामुळे पूर्वीइतका पाणीसाठा धरणात होत नाही. याचा थेट परिणाम शेती, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, उद्योग, मत्स्यव्यवसाय आणि पर्यावरणावर होत आहे. पावसाळ्यात धरणाची साठवण क्षमता कमी झाल्याने अतिरिक्त पाणी सोडावे लागते, तर उन्हाळ्यात पाणीटंचाई अधिक तीव्र होते. त्यामुळे पूर व्यवस्थापन आणि जलसंधारण या दोन्ही बाबींवर विपरीत परिणाम होत आहे.
उजनी धरण हे सोलापूर, पुणे आणि परिसरातील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच हजारो हेक्टर शेतीच्या सिंचनाचा प्रमुख आधार आहे. त्यामुळे या धरणाचे संरक्षण, संवर्धन आणि दीर्घकालीन शाश्वत व्यवस्थापन ही शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, उद्योग आणि समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.
त्यासाठी पुढील उपाययोजना तातडीने राबविण्यात याव्यात:
- उजनी धरणातील साचलेला गाळ आणि घनकचरा वैज्ञानिक पद्धतीने काढण्यासाठी विशेष मोहीम राबविणे.
- पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सर्व मैलायुक्त सांडपाणी पूर्णपणे प्रक्रिया (Treatment) करूनच नदीत सोडणे.
- सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची (STP) क्षमता वाढवून त्यांचे नियमित कार्यक्षम संचालन सुनिश्चित करणे.
- औद्योगिक सांडपाण्यावर कठोर नियंत्रण ठेवून प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर प्रभावी दंडात्मक कारवाई करणे.
- नदी स्वच्छता मोहिमा सातत्याने राबविणे आणि प्रभावी घनकचरा व्यवस्थापन प्रणाली विकसित करणे.
- नदीपात्र व उपनद्यांवर आवश्यक त्या ठिकाणी बंधारे, गाळ अडविणाऱ्या संरचना (Silt Traps) उभारून नियमित गाळ काढणे.
- गाळ व्यवस्थापनाची जबाबदारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना देऊन त्यासाठी स्वतंत्र निधी व वार्षिक कृती आराखडा तयार करणे.
आज या उपाययोजना प्रभावीपणे राबवल्या नाहीत, तर भविष्यात उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता आणखी कमी होईल, जलप्रदूषण वाढेल आणि त्याचा गंभीर परिणाम लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यावर, शेतकऱ्यांच्या सिंचनावर, मत्स्यसंपदेवर, जैवविविधतेवर आणि संपूर्ण पर्यावरणावर होईल.
उजनी धरण वाचविणे म्हणजे भविष्यातील जलसुरक्षा, अन्नसुरक्षा आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे होय. त्यामुळे शासनाने, स्थानिक स्वराज्य संस्थांनी आणि नागरिकांनी संयुक्तपणे तातडीने प्रभावी कृती करणे हीच काळाची गरज आहे.
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!



























Subscribe to my channel




