
मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना एक अत्यंत महत्त्वाचे आणि खळबळजनक पत्र लिहिले आहे. या पत्रात संजय राऊत यांनी तुकाराम मुंढे यांच्या प्रशासकीय कामाचे आणि कारवाईचे अभिनंदन केले आहे, परंतु त्याचबरोबर एफडीए (FDA) अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या वसुलीच्या आणि भ्रष्टाचाराच्या प्रकारावर तीव्र आक्षेप घेत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
संजय राऊतांनी पत्रात म्हटले आहे की, तुकाराम मुंढे यांनी एफडीए आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. अॅनालॉग पनीर, भेसळयुक्त दूध, हॉटेल किचनमधील अस्वच्छता आणि मुदतबाह्य (Expired) झालेला साठा यावर तुकाराम मुंढे यांनी घेतलेला धडाका स्वागतार्ह आहे. महाराष्ट्रातील नागरिकांना आपण काय खातोय हे कळायलाच हवे, आणि मुंढेंनी जनतेला याविषयी जागरूक केले हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
परंतु, या कारवाईची दुसरी बाजू तितकीच धक्कादायक आणि गंभीर असल्याचे राऊतांनी नमूद केले आहे. पत्रात आरोप करण्यात आला आहे की, एकीकडे मुंढेंच्या धाडींमुळे व्यावसायिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून ते प्रसिद्धीच्या झोतात आहेत, तर दुसरीकडे याच गोष्टीचा गैरफायदा एफडीएमधील अधिकारी घेत आहेत. एफडीएचे पदनिर्देशित अधिकारी (DO), सहायक आयुक्त तसेच अन्न सुरक्षा अधिकारी (FSO) हे उघडपणे हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्विक कॉमर्स (Quick Commerce) व्यवसायांना परवाना निलंबनाची धमकी देऊन मोठ्या प्रमाणावर खंडणी व वसुली करत आहेत. हॉटेल व्यावसायिकांना ब्लॅकमेल करून पैसे गोळा करण्याचा हा उद्योग आता पूर्वीपेक्षा अधिक जोमाने सुरू झाला आहे.
संजय राऊतांनी आपल्या पत्रात आणखी एक मोठा दावा केला आहे की, "मुंढे हे एफडीए आयुक्त होण्यापूर्वी क्लोजिंग नोटीसचा दर १० ते १२ हजार होता, तो आता दहशत निर्माण झाल्यानंतर थेट ७५ हजार ते २ लाखांवर पोहोचला आहे." त्यामुळे सामान्य व्यावसायिक दुहेरी कात्रीत सापडले आहेत. एफडीएचे वांद्रे मुख्यालय आणि ठाणे कार्यालयाचा तिसरा मजला हा या लुटीचा मुख्य अड्डा बनला असून तिथे अधिकारी खुलेआम पैसे मागतात. नागपूर, पुणे, सोलापूर, वर्धा आणि छत्रपती संभाजीनगर येथील क्लोजिंग नोटीसच्या लुटीच्या कथा सांगत अनेक सामान्य व्यावसायिक आपल्याला भेटल्याचे त्यांनी उघड केले आहे.
एफडीएचा कायदा काय सांगतो हे अधिकाऱ्यांना समजलेले दिसत नाही, अशी टीका करत राऊतांनी म्हटले आहे की, तपासणी नोटीस, १५ दिवसांत अनुपालन, इम्प्रूव्हमेंट नोटीस, मुदतवाढ आणि त्यानंतर सुनावणी अशी कायदेशीर प्रक्रिया आहे. परंतु ही सर्व प्रक्रिया डावलून थेट परवाना निलंबनाची भीती दाखवून जर वसुली होत असेल, तर ही अन्न सुरक्षा नसून अधिकाराचा दुरुपयोग व खंडणी वसुली आहे. उंदीर, झुरळे किंवा मुदतबाह्य सामान दिसताच थेट परवाना निलंबित केला जात आहे. ठाण्यातील एका जोडगोळीने एका क्विक कॉमर्स कंपनीकडून निलंबित परवाना परत मिळवण्यासाठी १७ ते १८ लाखांची वसुली केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
या सर्व प्रकारावर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी संजय राऊत यांनी तुकाराम मुंढेंकडे ५ प्रमुख मागण्या केल्या आहेत: १. वांद्रे, ठाणे व इतर विभागांतील 'क्लोजिंग नोटीस रेट कार्ड' आणि निलंबित परवाने परत करण्याच्या प्रकरणांची स्वतंत्र व तातडीची चौकशी सुरू करणे. २. ग्राहक तक्रार (Customer Complaint) आधारावर मारल्या जाणाऱ्या धाडींची पडताळणी बंधनकारक करणे आणि बनावट तक्रारींवर कारवाई करणे. ३. कायद्यानुसार नोटीस, सुनावणी आणि निलंबनाची प्रक्रिया बायपास करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करणे. ४. ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या १७-१८ लाखांच्या वसुलीच्या आरोपाची स्वतंत्र तपासणी करणे. ५. प्रत्येक परवाना निलंबन व पुनःस्थापनेची कारणे, तारखा आणि सुनावणीचा सारांश सार्वजनिक करणे.
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!



























Subscribe to my channel




