न्यायालयांमध्ये एआय वापराद्वारे खटल्यांच्या कामकाजाचे ट्रान्सस्क्रिप्ट तयार झाले, तर ‘तारीख पे तारीख’चा चक्रव्यूह कमी होऊ शकतो. मात्र, जनतेच्या हितासाठी एआयचा व्यावहारिक वापर न केला जाणे चिंताजनक आहे. देशात सध्या एआयची लाट आहे. हे संकट ठरेल की विकसित भारताचा शंखनाद, याचे चित्र लवकरच स्पष्ट होईल. सध्या तरी ४ मुद्द्यांच्या आधारे न्यायिक व्यवस्थेतील एआयशी संबंधित आव्हाने आणि विरोधाभासांचे मूल्यमापन केले जाऊ शकते:
१. ई-कोर्ट््स प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात एआय आणि ब्लॉकचेनच्या वापरासाठी केवळ ५३.५७ कोटी रुपये दिले गेले. सर्वोच्च न्यायालयात संशोधन आणि अनुवादासाठी अनेक एआय साधने तयार केली गेली आहेत. परंतु ९९ टक्क्यांहून अधिक खटले उच्च व जिल्हा न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. तिथे एआयच्या माध्यमातून पोलिस, न्यायालय, तुरुंग, फिर्यादी आणि पक्षकार यांना जोडून जामिनाशी संबंधित लाखो प्रकरणांमध्ये लवकर निर्णय होऊ शकतो. एआयच्या वापरामुळे चेक बाउन्स आणि ट्रॅफिक चलान यांसारख्या कोट्यवधी खटल्यांचा जलद निपटारा होऊन न्यायालयांवरील खटल्यांचा बोजा कमी होऊ शकतो. न्यायालयांमध्ये एआय साधनांच्या वापराद्वारे खटल्यांच्या कामकाजाचे ट्रान्सस्क्रिप्ट तयार झाले, तर तारखांचा घोळ कमी होऊ शकतो. पण सामान्य जनतेसाठी जलद आणि योग्य न्यायाचा अधिकार सुनिश्चित करण्यात एआयचा व्यावहारिक वापर न होणे चिंताजनक आहे. २. विधी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांनी म्हटले की, निर्णयापर्यंत पोहोचण्याच्या प्रक्रियेत मदत आणि केस मॅनेजमेंटच्या माध्यमातून एआय न्यायाचा वेग वाढवू शकते, परंतु हे न्यायाधीशांचा विवेक आणि मानवी भावनांची जागा घेऊ शकत नाही. न्यूझीलंडमधे ख्राइस्टचर्च जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांनी एआयद्वारे लिहिलेले माफीपत्र नाकारताना म्हटले की, त्यात संवेदना व मानवी भावांचा अभाव आहे.गतवर्षी तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती गवई यांनी म्हटले होते की, चॅटजीपीटीच्या वापरामुळे घटनात्मक व्यवस्थेसमोर मोठी संकटे येत आहेत. गेल्या महिन्यात बॉम्बे हायकोर्टानेही एआयद्वारे तयार केलेल्या काल्पनिक खटल्याच्या उल्लेखावर ५० हजारांचा दंड ठोठावला होता. आता मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने या समस्येवर चिंता व्यक्त केली आहे. वकिलांच्या ड्राफ्टिंगमध्ये व न्यायाधीशांच्या निर्णयात एआयच्या चुकीच्या वापराने खटले अधिक गुंतागुंतीचे बनवले जात आहेत. ३. लोकसभेत कायदामंत्र्यांनी डिसेंबर २०२५ मध्ये सांगितले होते की, न्यायपालिकेत एआयच्या वापरामुळे अल्गोरिदम (पूर्वग्रह), अनुवादाची समस्या आणि डेटा सुरक्षा यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर ई-कमिटी विचार करत आहे. त्यापूर्वी मार्च २०२५ मध्ये मंत्र्यांनी संसदेत सांगितले होते की, नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरच्या माध्यमातून निर्णयांचे १८ भाषांमध्ये भाषांतर होत आहे. गेल्या डिसेंबरमध्ये जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान मुख्य न्यायमूर्तींनी म्हटले की, एआयच्या चुकीच्या वापरामुळे न्यायिक प्रशासनात अडथळा येऊ नये. तरीही सोनम वांगचुक यांची अटक वैध ठरवण्यासाठी पुरावा म्हणून सरकारने तीन मिनिटांच्या भाषणाचा आठ मिनिटांचा अनुवाद सादर केला. न्या.ती अरविंद कुमार व वराळे यांच्या खंडपीठाने म्हटले की, एआयच्या युगात अनुवादाच्या प्रकरणांमध्ये किमान ९८ टक्के अचूकता आवश्यक आहे. न्यायाधीशांच्या मते, सरकार अशा गोष्टीवर विश्वास ठेवत आहे जी वास्तव नाही. ४. सुनावणी आणि प्रसारणात व्हॉट्सॲप आणि झूम सारख्या ॲप्सचा वापर होणे बेकायदेशीर असण्यासोबतच न्यायिक व्यवस्थेत विदेशी हस्तक्षेपदेखील आहे. गृह मंत्रालयाच्या नवीन आदेशानुसार, वर्गीकृत माहिती प्रसारमाध्यमांशी शेअर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गोपनीयता कायद्यांतर्गत कडक फौजदारी कारवाई केली जाईल, परंतु डिजिटल आणि एआय कंपन्यांसोबत जनता आणि सरकारचा डेटा बेकायदेशीर आणि संघटित पद्धतीने शेअर करण्याविरुद्ध कारवाई होत नाही. गोपनीयतेच्या अधिकारावरील सर्वोच्च न्यायालयाचा नऊ वर्षे जुना निर्णय लागू करण्याऐवजी, थंड बस्त्यात पडलेल्या डेटा सुरक्षा कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर न्यायालयांत सुनावणी होणे हे एक वेगळेच प्रहसन आहे. एआयच्या माध्यमातून ‘सर्वजन हिताय सर्वजन सुखाय’ हे लक्ष्य साध्य झाले तर उत्तम, परंतु एआय क्रांतीच्या नावाखाली परदेशी कंपन्यांचे वर्चस्व निर्माण झाले, तर संविधानाचे सार्वभौमत्व आणि आत्मनिर्भर भारतासमोर संकटाची त्सुनामी येऊ शकते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) viraggupta@hotmail.com
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- पुणे: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा निश्चित; २४ ऑक्टोबरला करणार 'प्रेरणास्थळा'चे उद्घाटन, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा!
- नाशिक: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ६ हजार आदिवासी करणार भव्य गोदाआरती; सिंहस्थ कुंभमेळा तयारीनिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन!
महाराष्ट्र
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- कोल्हापूर: निधी मिळत नसल्याने महायुतीच्या सदस्यांना सत्तेत आल्याचा पश्चाताप; आमदार सतेज पाटील यांचा मोठा दावा!
- जळगाव: महाराष्ट्रात दिवाळीनंतर होणार मंत्रिमंडळ विस्तार? आमदार बच्चू कडू यांचे मोठे भाकीत, जळगावमधून किशोर पाटलांना मंत्री करण्याची मागणी!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!



























Subscribe to my channel




