
Unseasonal Rain : राज्यामध्ये सर्वत्र जोरदार स्वरूपाचा अवकाळी पाऊस बरसतोय. यामध्ये शेतातील अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना, रविवारी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे हिंगोलीतील पूर्णा सहकारी साखर कारखान्यातील 500 मेट्रिक टन साखर या पावसामुळे भिजली आहे. पाऊस एवढा मोठ्या प्रमाणात होता की, हे पाणी गोडाऊनमध्ये शिरेल याचा अंदाज सुद्धा कारखाना प्रशासनाला नव्हता. त्यामुळे हे साखरेचे नुकसान झाले आहे. 500 मेट्रिक टन साखर भिजल्यामुळे कारखान्याचे तब्बल दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर, गोडाऊनमध्ये सगळीकडे साखरेचा पाक पाहायला मिळत असून, यामुळे कारखान्याचे गाळप पूर्ववत चालू करण्यासाठी तब्बल 24 तासाचा कालावधी लागला आहे. तर, पुढील काही दिवस गाळप करताना याचा अडथळा सुद्धा होणार आहे. त्यामुळे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणत नुकसान होतांना पाहायला मिळत आहे.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार स्वरूपाच्या होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कापूस, तूर, हरभरा, ज्वारी यासह भाजीपाला आणि फळ बागांना पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसतोय. अनेक ठिकाणी ज्वारीचे पिके पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. हिंगोलीच्या वाई गोरखनाथ येथील शेतकरी व्यंकटेश कदम यांनी यांच्या शेतात एक महिन्यापूर्वी ज्वारीच्या पिकाची पेरणी केली होती. या ज्वारीच्या पिकावर शेतातील गुरांच्या चाऱ्याचे आणि कुटुंबातील व्यक्तींचे खाण्याचे नियोजन नियोजन असते. परंतु, या वादळी वारे आणि पावसामुळे संपूर्ण अडीच एकर जमिनीवरील ज्वारीचे पीक जमीनदोस्त झाले आहे.
|
|
शेतकऱ्याने साकारलेले स्वप्न धुळीस मिळाले...
नांदेड जिल्ह्यात सोमवारी पहाटे झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याने साकारलेले स्वप्न धुळीस मिळाले असल्याचे चित्र आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पांगरी येथील शेतकरी लालबा जाधव या शेतकऱ्याच पपईची बाग वादळीवाऱ्यात आडवी झाल्याने पाच लाख रुपयांचा फटका बसलाय. लालबा जाधव यांनी त्यांच्या शेतीमध्ये एक एकर पपईची लागवड केली. या बागेसाठी मोठा खर्चही केला. मोठ्या कष्टाने बाग वाढवली. भाव यंदा दरवर्षीच्या तुलनेत चांगला असल्यामुळे चांगले उत्पन्न अपेक्षित होते. दहा ते बारा टन माल काढणीस आला होता. त्यामुळे अंदाजे अडीच लाख रुपयांचा माल शेतात तयार होता. पण, अचानकपणे सोमवारी पहाटे वादळी वारा आणि पाऊस आल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गान हिरावून घेतला.
शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ
यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे नंदुरबार जिल्ह्यातील रब्बी हंगामातील क्षेत्र घटले होते. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे, त्या शेतकऱ्यांनी गहू आणि हरभऱ्याची पेरणी केली होती. मात्र जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका गहू आणि हरभरा पेरणी केलेल्या क्षेत्राला बसला आहे. शेतांमध्ये पंधरा दिवसांपूर्वी पेरणी केलेल्या गहू आणि हरभऱ्याचे पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे.
शहर
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
महाराष्ट्र
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- अमरावती: प्राध्यापक भरतीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार; १०० टक्के पारदर्शकतेसाठी 'महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण आयोग' स्थापन करण्याची 'डाटा'ची मागणी
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
गुन्हा
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा; थेट १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचे रणशिंग, सरकारची वाढली डोकेदुखी
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान





















Subscribe to my channel


