४ शिक्षकांना इतर कामाला लावले; संतापलेल्या सरपंचाचे जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन, मंगेश साबळेंना अटक
छत्रपती संभाजीनगर: जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना अशैक्षणिक कामासाठी नियुक्त केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा आरोप करत फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले. आंदोलनादरम्यान अधिकाऱ्यांशी वाद, महिला तहसीलदारांना शिवीगाळ, धमकी तसेच आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा आरोप करत पोलिसांनी त्यांच्यावर सहा गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
शिक्षकांच्या नियुक्तीवरून वाद
मिळालेल्या माहितीनुसार, गेवराई पायगा येथील जिल्हा परिषद शाळेत एकूण आठ शिक्षक कार्यरत आहेत. त्यापैकी चार शिक्षकांची एसआयआरच्या कामासाठी बीएलओ (BLO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ आणि सरपंच मंगेश साबळे यांनी केला.
याच पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी मंगेश साबळे हे २० ते २५ गावकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले आणि प्रशासनाविरोधात आंदोलन सुरू केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ
आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यालयाबाहेर आल्यानंतर सरपंच मंगेश साबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनासमोर ठिय्या आंदोलन केले.
महिला तहसीलदारांना धमकीचा आरोप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलनादरम्यान मंगेश साबळे यांनी महिला तहसीलदारांना अश्लील शिवीगाळ केली. तसेच "मी आणि माझ्यासोबतचे लोक ठोकून काढू, काठीने मारू," अशी धमकी दिल्याचाही आरोप आहे.
याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांविरोधातही अर्वाच्य भाषेत घोषणाबाजी करण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
आत्मदहनाचा प्रयत्न
पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताच मंगेश साबळे यांनी विरोध करत अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
सहा गंभीर कलमांन्वये गुन्हा
शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, सरकारी अधिकाऱ्यांना धमकावणे आणि इतर संबंधित आरोपांप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात मंगेश साबळे यांच्याविरुद्ध सहा गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश साबळे यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश केदार करत आहेत.
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!



























Subscribe to my channel




