
Supriya Sule on Narendra Modi : शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुरुवारी कार्यक्रम झाला. यावेळी शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारला. शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, नरेंद्र मोदी यांनी अनेक भाषणांच्या माध्यमातून पवार साहेबांची स्तुती केलेली आहे. मोदींनीच पद्मविभूषण दिलं आहे. शेतीमधील कामासाठी हा पुरस्कार दिलेला आहे. एका गोष्टीचा मला आनंद आहे की, महाराष्ट्रात आल्यावर ते पवार साहेबांचं नाव घेतात. कधी टीका करून तर कधी प्रेमाने नाव घेत असतात. पण राजकारणात एवढं तर चालतंच. ”इतना तो हक बनता है’. महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल बोलताना मोदी नेहमी नॅचरली करप्ट पार्टी म्हणायचे. यावेळी मोदींनी करप्शनचा आरोप आमच्यावर केला नाही.
खोके सरकार दिल्लीसमोर अखंड नमतं घेतंय
मराठा आरक्षण हे राज्यातील ट्रिपल इंजिनच्या सरकारचं अपयश आहे. मराठी माणसाच्या हक्काच्या मेरीटवरच्या नोकऱ्या तुम्ही इतर राज्यात घेऊन जाणार? हे खोके सरकार अखंड नमतं घेतंय दिल्लीसमोर. आम्ही दिल्लीसमोर कधी झुकलो नाही आणि कधी झुकणार नाही. राज्यात महागाईवर अस्वस्था आहे. गुंतवणुकीचा प्रश्न आहे. बेरोजगारी वाढत आहे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील महागाई, बेरोजगारी आणि हक्काचे रोजगार बाहेर जात आहेत ते आधी थांबवावे. मग दुसऱ्यांना नावं ठेवावं.
|
|
हिरे व्यापारी का जातायं…
मुंबईत हिऱ्यांच्या व्यापाऱ्यांची गुंतवणूक आपण जपली होती. पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्यासाठी बीकेसीत मोठी इमारत उभारून इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं होतं. आज ते सर्व सुरतला जात आहे. एवढे लोक सुरतला का जात आहे. कारण काय. ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार काय करत आहे. कोणीही यावं दिल्लीवरून आणि महाराष्ट्राल टपली मारून जावं हे या खोके सरकारला चालत असेल. आम्हाला नाही चालणार. शेवटी महाराष्ट्राने या व्यवसायासाठी मोठं योगदान दिलं आहे. मराठी माणसाचा काही हक्क आहे की नाही?
विशेष अधिवेशन बोलवा
भाजप हा एक जुमलेबाज पक्ष आहे. त्यांना मी भ्रष्ट जुमलेबाज पक्ष म्हणते. कारण ते भ्रष्ट आहेत. जुमलेबाज आहेत. याचं कारण मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणावर सातत्याने बोलत राहिले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता आहे. ते या घटकांना आरक्षण दिलं पाहिजे होते. पण दिलं नाही. माझी अनेक दिवसांची मागणी आहे. महाराष्ट्रातील अस्वस्थता बघता तातडीने विधानसभेचं अधिवेशन बोलवा. पाच नाही, दहा दिवसाचं सेशन घ्या. मराठा, धनगर, मुस्लिम आणि लिंगायत आरक्षणावर घ्या. इथून संवैधानिक तरतूद करून दिल्लीत प्रस्ताव पाठवा. आम्ही दिल्लीत संवैधानिक तरतूद करून पाठवू. मराठा, लिंगायत, धनगर आणि मुस्लिमांना आरक्षण मिळत असेल तर आम्ही पूर्ण ताकदीने त्या सरकारबरोबर उभं राहू
शहर
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- पुणे: मानवतेला काळिमा फागणारी घटना; ३ वर्षांच्या 'डॅनी' श्वानाला बेल्टने बेदम मारहाण करत भिंतीवर आपटले, नराधम मालक परदेशीविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: कोट्यवधी रुपये 'सांडपाण्यात'! दर्जाहीन मलवाहिन्या आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे मुळा-मुठा नदीची बिकट अवस्था
महाराष्ट्र
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- कोल्हापूर: संकश्र्वरजवळ भीषण अपघात! तिरुपती दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा मालवाहू ट्रकला मागून जोरदार धडक; नाशिकमधील तरुणाचा जागीच मृत्यू
- अमरावती: समृद्धी महामार्गावर भीषण थरार! धामणगाव रेल्वे परिसरात टायर फुटल्याने ट्रकला अचानक लागली भीषण आग; चालकाचा जिवंत जळून मृत्यू, तर दुसऱ्याचा पुलावरून खाली पडून अंत
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
गुन्हा
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
- बीड: अहिल्यानगर महामार्गावरील कासार ओढ्यात आढळला निर्वस्त्र व दाढी वाढलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; आष्टी परिसरात उडाली खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: एकाला मंत्री बनवलं, दुसऱ्याला पद्मविभूषण दिलं… मुख्य निवडणूक आयुक्तांच्या वादावरून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
- नवी दिल्ली: पोलिसांना मोठा चकवा! CJP चे नेते अजिंक्य शिंदे, सौरभ दास आणि आशुतोष रांका थेट जंतरमंतरवर; पोलिसांची धावाधाव, पुन्हा घेतले ताब्यात!
- नवी दिल्ली: सुटकेनंतर ध्रुव राठीचा धक्कादायक खुलासा ;पोलिसांनी माफी मागितली, सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण ते डिटेंशन नव्हे तर अपहरण होतं!
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!




























Subscribe to my channel




