एसआयआर मतदार यादी वाद: राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाला नोटीस

नवी दिल्ली: देशातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून देणाऱ्या 'एसआयआर' (SIR) आणि मतदार यादीतील कथित अनियमिततेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोग (ECI) तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अधिकृत नोटीस बजावली आहे.

मतदार यादीतून 'एसआयआर' (SIR) प्रक्रियेअंतर्गत तब्बल १३ कोटी मतदार वगळण्यात आल्याचा गंभीर आरोप करत याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगासह मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, तसेच इतर निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांना नोटीस जारी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर उत्तर मागवले आहे.

याआधी राहुल गांधी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या तात्काळ निलंबनाची आणि राजीनाम्याची मागणी केली होती. तसेच, निवडणूक आयोगाच्या अंतर्गत प्रक्रियेत आणि एसआयआरच्या अंमलबजावणीत नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावाही याचिकेत करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयाने सुरुवातीला मुख्य निवडणूक आयुक्तांच्या तात्काळ निलंबनाची मागणी फेटाळली असली, तरी संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाला कायदेशीर नोटीस बजावली आहे. जर कोणताही निर्णय बेकायदेशीरपणे किंवा नियमांचे उल्लंघन करून घेतला असेल, तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान दिला आहे.

 

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *