मुंबई: बोरीवली येथील प्रसिद्ध संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (SGNP) पर्यटकांची फसवणूक करून बनावट प्रवेश तिकिटे विकणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. कस्तूरबा मार्ग पोलिसांनी याप्रकरणी एका ३१ वर्षीय व्यक्तीला अटक केली असून, या रॅकेटमधील मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी पोलीस कसून तपास करत आहेत. या धक्कादायक प्रकारामुळे राष्ट्रीय उद्यानाच्या तिकिट व्यवस्थापनावर आणि सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रकरण कसे उघडकीस आले? मिळालेल्या माहितीनुसार, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ड्युटीवर तैनात असलेले वनरक्षक शिवराज बालाजी उगले यांच्याकडे एका पर्यटकाने येऊन तक्रार केली. पर्यटकाने सांगितले की, त्याला उद्यानात प्रवेश करण्यासाठी एक फटका दिलेला किंवा संशयास्पद तिकीट विकण्यात आले आहे. पर्यटकाची ही तक्रार गांभीर्याने घेत वनरक्षकाने तात्काळ तिकीट काउंटरची पाहणी केली. जेव्हा counter वर तपासणी करण्यात आली, तेव्हा उघड झाले की, त्या विशिष्ट तिकीटाची कोणतीही अधिकृत नोंद किंवा विक्री सिस्टीममध्ये दाखवली जात नव्हती.
यावरून संशय बळावल्याने पोलिसांनी व वनधिकाऱ्यांनी संबंधित तिकीट विक्री करणाऱ्या कर्मचाऱ्याकडे कसून चौकशी केली. आकाश रवींद्र सरदार (वय ३१, रा. मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सुरुवातीला त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपण बनावट तिकिटे विकत असल्याचे कबूल केले. त्याच्या ताब्यातून जप्त केलेल्या ९ तिकिटांची छाननी केली असता, त्यावर छापील माहिती, प्रिंट आणि फॉन्ट हे उद्यानाच्या खऱ्या तिकिटांपेक्षा पूर्णपणे वेगळे असल्याचे निदर्शनास आले.
मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू: कस्तूरबा मार्ग पोलिसांनी आरोपी आकाश सरदार याच्याकडे केलेल्या चौकशीत एक मोठा खुलासा झाला आहे. आकाशने पोलिसांना सांगितले की, हे बनावट तिकिटे गणेश ईश्वर ठाकुर नावाच्या व्यक्तीने तयार केली होती आणि ती त्याला विक्रीसाठी दिली होती. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, मुख्य आरोपी गणेश ठाकूर याच्याकडे बनावट तिकिटे तयार करण्यासाठी विशेष मशिनरी आणि सॉफ़्टवेअर (Software) उपलब्ध आहे. या उपकरणांच्या साहाय्याने तो हुबेहूब बनावट तिकिटे छापत असे.
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून मुख्य आरोपी गणेश ठाकूर याच्या शोधासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. मुख्य आरोपीच्या अटकेनंतरच या रॅकेटचे जाळे किती मोठे आहे आणि या गोरखधंद्यामुळे शासनाच्या महसुलाला नेमके किती कोटींचे किंवा लाखांचे नुकसान झाले आहे, याचा खरा आकडा समोर येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पर्यटकांना जास्त दराने किंवा बनावट तिकिटे विकून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश झाल्याने परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.
शहर
- मुंबई: शायना एनसींच्या कथित निषेध आंदोलनावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याच्या वादावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया!
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
- मुंबई: शायना एनसींकडून चुकून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडला गेल्याने राजकीय वादंग; किशोरी पेडणेकर यांचा तीव्र संताप!
- पुणे: भिडू, झाडे लावा रे.. बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या खास स्टाईलिश घोषणेने गाजले पुणे! जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात राबवले वृक्षारोपण अभियान
महाराष्ट्र
- नागपूर: अंबाझरीजवळ स्वामी विवेकानंद स्मारकाजवळ भरधाव कार नाल्यात कोसळून एकाचा दुर्दैवी मृत्यू
- मुंबई: शायना एनसींच्या कथित निषेध आंदोलनावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याच्या वादावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया!
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
- धुळे: तांत्रिक चुकीचा फटका! धुळ्यातील पिंप्री येथे लाखों रुपये खर्चून उभारलेला रेल्वे पूल पाडण्याची वेळ; आता त्याच ठिकाणी नवीन अंडरपासचे काम सुरू!
गुन्हा
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा


























Subscribe to my channel




