सातारा: फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर हद्दीत एक अतिशय मन हेलावणारी आणि दुर्दैवी घटना घडली आहे. भरधाव वेगात असलेल्या एका स्विफ्ट कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व तरुण सुरवडी (ता. फलटण) येथील एका नामांकित कमिन्स कंपनीत कामाला असलेले कर्मचारी असल्याची माहिती समोर आली असून, या दुर्घटनेमुळे परिसरात व कंपनी वर्तुळात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, सुरवडी येथील कमिन्स कंपनीत काम करणाऱ्या सहा मित्रांनी गुरुवारी रात्री हॉटेलमध्ये एकत्र जेवायला जाण्याचा बेत आखला होता. त्यानुसार सायंकाለ काम संपवून हे सर्वजण एका स्विफ्ट कारमधून (क्रमांक MH-16-ET-1756) बडेखान परिसरातील सह्याद्री हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर परत येत असताना काही जणांच्या आग्रहवरून हा ग्रुप ताथवडे घाटात फिरायला गेला. घाटात बराच वेळ घालवल्यानंतर हे सर्वजण मध्यरात्रीच्या सुमारास पुसेगाव-फलटण मार्गे वाठार निंबाळकरच्या दिशेने आपल्या हॉस्टेलकडे परतत होते.
दरम्यान, मोहम्मद हुसेन हा कार चालवत असताना वाठार निंबाळकर हद्दीत आल्यावर अतिवेगामुळे त्याचे कारवरील ताबा सुटला. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या पुलाच्या कठड्याला (नालीच्या कड्याला) अत्यंत वेगाने धडकली आणि त्यानंतर कार उलटून पलटी झाली. ही धडक इतकी भीषण आणि भयानक होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, चालक कारमधून बाहेर फेकला गेला.
मृत आणि जखमींची नावे:
या भीषण अपघातात खालील तीन कर्मचाऱ्यांचा जागीच करुण अंत झाला:
मोहम्मद हुसेन (चालक, मूळ रा. अयोध्या, उत्तर प्रदेश)
अनिल हेबरम (रा. जमशेदपूर, झारखंड)
सदानंद पुर्ती (रा. जमशेदपूर, झारखंड)
तर या अपघातात नयन अमरजित लोंगाणी (वय २८, मूळ रा. अहिल्यानगर), सौरभ कुमार (रा. झारखंड) आणि एम. डी. सितारे (रा. बिहार) हे इतर तीन तरुण गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांची कारवाई व उपचार:
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी व नागरिकांनी गाढीत अडकलेल्या सर्व जखमींना बाहेर काढून तातडीने रुग्णवाहिकेमार्फत उपचारासाठी फलटण आणि बारामती येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अधिकृतपणे अपघाताची नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे.
Disclaimer: या पोस्टमधील माहिती उपलब्ध वृत्तस्रोत व अधिकृत माहितीनुसार प्रकाशित करण्यात आली आहे. तपास किंवा अधिकृत प्रक्रियेनुसार तथ्यांमध्ये बदल होऊ शकतो.
या पोस्टचा उद्देश केवळ माहिती देणे असून अंतिम सत्यता संबंधित शासकीय यंत्रणा व न्यायालयीन प्रक्रियेवर अवलंबून आहे.
शहर
- मुंबई: आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न; अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याच्या नोटीसवर काँग्रेस नेते नाना पटोले यांचा केंद्र सरकारवर घणाघात!
- पुणे: पद हवंय, आधी कामाचं रिपोर्ट कार्ड दाखवा ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली पुण्यातील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची कानउघडणी!
- मुंबई: दसरा मेळाव्याचा मार्ग मोकळा! दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अधिकृत परवानगी!
- पुणे: पदवीधर मतदारसंघ निवडणूक अपक्ष उमेदवार सचिन सानप यांच्या समर्थनासाठी मंत्री उदय सामंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार!
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोंबड्यांच्या खोलीत रात्रभर राहिला बिबट्या; सर्व कोंबड्या फस्त करत दरवाजा उघडणाऱ्या महिलेवर केला हल्ला!
- गोवा: कुल-मुंडकार प्रकरणांबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; १९ डिसेंबरपर्यंत सर्व प्रकरणांची होणार सोडवणूक!
- मुंबई: आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न; अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याच्या नोटीसवर काँग्रेस नेते नाना पटोले यांचा केंद्र सरकारवर घणाघात!
- कोल्हापूर: कोगनोळी टोल नाक्यावरील महामार्ग रोको आंदोलन ३० तासांनंतर स्थगित; राजू शेट्टींचा साखर कारखाने बंद पाडण्याचा इशारा!
गुन्हा
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर




























Subscribe to my channel




