नागपूर: नागपूरमधील वाडी परिसरात न्यायालयातील खटल्यात विरोधात साक्ष दिल्याचा राग मनात धरून एका हद्दपार गुन्हेगाराने अत्यंत निर्घृणपणे एका व्यक्तीवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यामध्ये तेलमालिशचे काम करणारे व्यक्ती गंभीर जखमी झाले असून, वाडी पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या काही तासांत मोबाईल लोकेशनच्या आधारे पसार झालेल्या आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, सचिन दीपक बुरहाणी (वय ४५, रा. खापरी केणे, पारडसिंगा, नरखेड) असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर सागर जगदीप चंद्रवत (वय २४, रा. नरखेड) असे अटक करण्यात आलेल्या हद्दपार गुन्हेगाराचे नाव आहे. जखमी सचिन बुरहाणी हे तेलमालिशचा व्यवसाय करतात आणि कामानिमित्त ते दर रविवारी वाडी परिसरातील बालाजी आयुर्वेदिक औषधी दुकानात यायचे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सागर चंद्रवत याच्याविरोधात यापूर्वीच हत्येचा किंवा गुन्ह्याचा एक खटला दाखल होता, ज्यामध्ये सचिन बुरहाणी यांनी न्यायालयात त्याच्या विरोधात साक्ष दिली होती. याच जुन्या वैमनस्यातून आणि रागातून सागरला परिसरातून हद्दपार (Exile) करण्यात आले होते.
मात्र, सचिन बुरहाणी यांच्या दर रविवारी वाडी येण्याच्या वेळाची व ठिकाणाची पूर्ण माहिती आरोपी सागरला होती. पूर्वनियोजित कट रचून रविवारी दुपारी वाडी हद्दीतील टी पॉइंटजवळ सचिन हे औषधी दुकानाजवळ आले असता, दबा धरून बसलेल्या हद्दपार गुन्हेगार सागरने त्यांच्या पाठीवर मागून सपासप चाकूने तीन वार केले. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात मोठी तारांबळ उडाली आणि नागरिकांमध्ये घबराट पसरली. या हल्ल्यात सचिन बुरहाणी रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळून गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच वाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी सचिन यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दाखल केले, जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. दरम्यान, वाडी पोलिसांनी कसून शोध घेत तांत्रिक व मोबाईलच्या पुराव्यांच्या आधारे काही तासांच्या आतच आरोपी सागर चंद्रवत याला अटक केली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
शहर
- पुणे: दिवेआगर समुद्र दुर्घटना: आळंदीतील 'त्या' ८ मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; राज्य सरकारकडून ४० लाखांचा निधी मंजूर!
- छत्रपती संभाजीनगर: संविधान जिवंत ठेवण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू; छत्रपती संभाजीनगरमधून कन्हैयाकुमार यांचा सरकारवर हल्लाबोल!
- पुणे: बहिणीला भेटण्यासाठी आला अन् काळाने घातला घाला; मोशीतील शेततळ्यात बुडून मामा-भाच्याचा मृत्यू!
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
महाराष्ट्र
- पुणे: दिवेआगर समुद्र दुर्घटना: आळंदीतील 'त्या' ८ मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; राज्य सरकारकडून ४० लाखांचा निधी मंजूर!
- छत्रपती संभाजीनगर: संविधान जिवंत ठेवण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू; छत्रपती संभाजीनगरमधून कन्हैयाकुमार यांचा सरकारवर हल्लाबोल!
- पुणे: बहिणीला भेटण्यासाठी आला अन् काळाने घातला घाला; मोशीतील शेततळ्यात बुडून मामा-भाच्याचा मृत्यू!
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
गुन्हा
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
- परभणी: २ वर्षे अनैतिक संबंध, महिलेनं २ अल्पवयीन मुलांच्या मदतीने प्रियकराला संपवलं; परभणीत मध्यरात्री रिक्षाचालकाच्या हत्येचा थरार!
- पुणे: नंबरप्लेट नसलेली मोपेड, एका गाडीवर तिघे अन् कात्रज ते शिवाजीनगर थेट प्रवास! वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह
- पुणे: पुण्यातील गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणातील आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी; पोलिसांनी कोर्टात दिली धक्कादायक माहिती!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गुरुवार राशिभविष्य २६ नोव्हेंबर २०२६: दत्तगुरु व स्वामींच्या कृपेने करिअर, पैसा आणि प्रगतीचे शुभ योग!
- केंद्र योग आणि मंगळाची कृपा: २५ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींना मिळणार आर्थिक लाभ आणि प्रगतीची सुवर्णसंधी? वाचा सविस्तर राशिभविष्य!
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोंदिया: दांडेगाव बसस्थानकाजवळ पोलीस वाहनाची पल्सर दुचाकीला भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, संतप्त ग्रामस्थांकडून रस्त्यावर टायर जाळून निषेध!
- गोवा: दोन नेत्यांचे मनोमीलन आणि रंगली लंच पे चर्चा; २०२७ च्या निवडणुकीसाठी भाजपची मोठी रणनीती, केंद्रीय नेतेही होते उपस्थित!
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!























Subscribe to my channel




