धुळे/धाराशिव: धुळे जिल्ह्यातील गरताडबारी घाट परिसरात एका गर्भवती महिलेचा पेट्रोल टाकून अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आल्याची आणि तिचा जळालेला मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. या गुन्ह्याचा छडा लावण्यात धुळे पोलिसांना मोठी यश आले असून, अवघ्या तीन दिवसांत या अंधाऱ्या गुन्ह्याचा पर्दाफाश करत पोलिसांनी कळंब येथील तिघांसह एकूण चौघा संशयितांना ताब्यात घेतले आहे, तर दोन जण अद्याप फरार आहेत. याप्रकरणी धुळ्यातील मोहाडीनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२२ सप्टेंबर रोजी गरताडबारी घाटातील टेकडीलगतच्या वनक्षेत्रात एका गर्भवती महिलेचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला होता. मृत महिलेची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील, सहायक निरीक्षक शरद बागल, मोहाडीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन करंडे आणि सहायक निरीक्षक अशोक पायमोडे यांच्या विशेष पथकाने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळापासून सुमारे वीस किलोमीटर परिसरातील महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे सलग ११ तासांचे फुटेज तपासले.
या कसून तपासादरम्यान पोलिसांच्या नजरेस एक संशयित कार (एमएच-४३, एआर-४०७०) आली. या वाहनाच्या हालचालींचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर तपास पथक थेट अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील सप्तसूर सांस्कृतिक कला केंद्रापर्यंत पोहोचले, जिथे संशयित पोलिसांच्या जाळ्यात अडकले. चौकशीदरम्यान मृत महिलेची ओळख पिंकी हनुमंत काटकर (वय ३१, रा. रायगड, बीड) अशी पटली. ती जामखेड येथील कला केंद्रात नृत्यांगणा म्हणून काम करत होती. कला केंद्रातील अंतर्गत वादातून मांजरसुंबा चौफुली (ता. व जि. बीड) येथे पिंकी काटकर यांना मारहाण करण्यात आली होती, ज्यामध्ये त्या बेशुद्ध पडल्या. त्यांचा मृत्यू झाल्याचे समजून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने संशयितांनी तिचा मृतदेह वाहनात टाकला आणि राजस्थानच्या दिशेने जात असताना वाटेत एका निर्जन ठिकाणी मृतदेहावर पेट्रोल टाकला आणि तिला जाळून टाकले. त्यानंतर संशयित पुन्हा जामखेडला परतले.
या प्रकरणात पोलिसांनी सरफराज उर्फ शफीक अलीम मोमीन (वय ३८), आरिफ उर्फ खुज्या आसिफ शेख (वय ३१), लक्ष्मी बालाजी पवार (वय ३०, तिघे रा. कळंब), आणि स्वाती उर्फ आरती गणेश कुन्हाडे (वय २८, रा. जामखेड) यांना ताब्यात घेतले असून, गुन्ह्यात वापरलेली कार व मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणातील इतर दोन आरोपींचा शोध पोलीस घेत असून अधिक तपास सुरू आहे.
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!



























Subscribe to my channel




