अकोला: एक अतिशय संतापजनक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. "सदरक्षणाय खलनिग्रहणाय" हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य विसरत, अकोल्यातील एका नराधम पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःच्याच भाड्याच्या घरातील घरमालकाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची भयंकर घटना घडली आहे. लग्नाचे आमिष दाखवून आणि विविध प्रलोभने देऊन या पोलीस कर्मचाऱ्याने अल्पवयीन मुलीवर वारंवार शारीरिक अत्याचार केले. या सततच्या त्रासामुळे आणि मानसिक दबावामुळे नैराश्यात आलेल्या पीडित अल्पवयीन मुलीने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
कुटुंबीयांच्या वेळीच लक्षात आल्यामुळे आणि प्रसंगावधान राखल्यामुळे या मुलीचे प्राण जरी वाचले असले, तरी या गंभीर घटनेमुळे आणि मानसिक धक्क्यामुळे तिची प्रकृती अतिशय चिंताजनक बनली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्येच्या या प्रयत्नानंतर पीडित मुलगी सध्या कोमामध्ये असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. तिच्यावर रुग्णालयात आपत्कालीन व अद्यावत उपचार सुरू आहेत.
पोलिसावर गुन्हा दाखल, आरोपी फरार:
पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी पोलीस कर्मचारी पवन वडगावे याने संबंधित अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्याशी अयोग्य कृत्ये केली. याप्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात संबंधित नराधम पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून हा आरोपी पोलीस कर्मचारी फरार झाला असून पोलीस यंत्रणा त्याचा शोध घेत आहे.
नातेवाईक आणि ग्रामस्थांचा रोष, ठिय्या आंदोलन:
या धक्कादायक प्रकारामुळे अकोला जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. एका खाकी वर्दीतील रक्षकानेच अल्पवयीन मुलीचा घात केल्यामुळे संतप्त झालेल्या पीडित मुलीचे नातेवाईक, सामाजिक संघटना आणि गावकऱ्यांनी पोलीस उपविभागीय कार्यालयासमोर तीव्र संताप व्यक्त करत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. स्थानिक पोलिसांनीच आरोपी सहकाऱ्याला फरार होण्यास मदत केल्याचा गंभीर आरोपही आंदोलकांकडून करण्यात येत आहे. जोपर्यंत नराधम पवन वडगावे याला तात्काळ अटक केली जात नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला असून, या प्रकरणाचा सखोल तपास वरिष्ठ पातळीवर वर्ग करण्याची मागणी जोर धरत आहे.
शहर
- पुणे: पुण्याच्या वाहतुकीला मिळणार नवी दिशा..! २१,८०० कोटींच्या मेट्रो प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा
- पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते २१,८०० कोटी रुपयांच्या पुणे मेट्रो प्रकल्पांचे लोकार्पण; विरोधकांवर कडाडून टीका करत साधला निशाणा
- मुंबई: महायुतीत मोठे वादंग! भ्रष्टाचाराचा आरोप करत मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात भाजप कार्यकर्ते रस्त्यावर, मिरा-भाईंदरमध्ये राजकीय संघर्ष पेटला
- पुणे: मध्य भागात दिवाळी खरेदीसाठी नागरिकांची तुफान गर्दी; वाहतूक नियोजन अन् चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त
महाराष्ट्र
- कोल्हापूर: ऊसदरप्रश्नी 'स्वाभिमानी'चे पुणे-बंगळुरू महामार्ग रोको आंदोलन; किणी टोलनाक्यावर राजू शेट्टी दाखल, वाहतूक विस्कळीत
- पुणे: पुण्याच्या वाहतुकीला मिळणार नवी दिशा..! २१,८०० कोटींच्या मेट्रो प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा
- पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते २१,८०० कोटी रुपयांच्या पुणे मेट्रो प्रकल्पांचे लोकार्पण; विरोधकांवर कडाडून टीका करत साधला निशाणा
- मुंबई: महायुतीत मोठे वादंग! भ्रष्टाचाराचा आरोप करत मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात भाजप कार्यकर्ते रस्त्यावर, मिरा-भाईंदरमध्ये राजकीय संघर्ष पेटला
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ
- बंगळुरू: पंचतारांकित हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये विजेचा धक्का लागून दोन परदेशी पर्यटकांचा मृत्यू; वाचवताना दोघे जण गंभीर जखमी


























Subscribe to my channel




