पुणे: मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे १४ जून रोजी पूल कोसळून चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली होती, तर अनेकजण जखमी झाले होते. या दुर्दैवी दुर्घटना झाल्यानंतर प्रशासनाकडून आणि नेत्यांकडून या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली होती, मात्र ही घोषणा अजूनही कागदावरच असल्याचे समोर आले आहे. या नवीन पुलाच्या बांधकामासाठी राज्य सरकारने ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून तांत्रिक बाबीही पूर्ण झाल्या आहेत. मात्र, पुलाच्या प्रस्तावित जागेवर नवीन पूल बांधण्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) सुरक्षेच्या कारणावरून तीव्र विरोध दर्शविला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, हा जुना पूल मोडकळीस आल्यानंतर आणि दुर्घटना घडल्यानंतर गावकऱ्यांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलासाठी आवश्यक असलेला सविस्तर आराखडा तयार करून राज्य सरकारकडून ८ कोटी रुपयांचा निधीही मंजूर करून घेतला. तसेच पुलावर सुरक्षेच्या कारणास्तव दोन ठिकाणी जाळी उभारण्याचा प्रस्ताव होता, ज्याच्या अतिरिक्त खर्चाला 'पीएमआरडीए'नेही मान्यता दिली होती. सुरुवातीला डीआरडीओने याला विरोध केला नव्हता, परंतु जेव्हा पुलाच्या प्रत्यक्ष बांधकामासाठी खणकाम सुरू झाले, तेव्हा हा पूल संस्थेच्या १०० मीटर परिसरात येत असल्याने सुरक्षेचा मुद्दा पुढे करत डीआरडीओने या बांधकामास विरोध केला.
या वादानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी 'डीआरडीओ'सह सर्व संबंधित अधिकाऱ्यांची दोन वेळा उच्चस्तरीय बैठक घेतली, परंतु डीआरडीओने या जागेवर परवानगी देण्यास स्पष्ट नकार दिला. यानंतर या ठिकाणी केवळ पादचारी पूल उभारावा असा पर्याय पुढे आला होता, परंतु ग्रामस्थांनी वाहतुकीसाठी रहदारीचा मुख्य पूल असावा अशी ठाम मागणी केली. ग्रामस्थांच्या या मागणीमुळे आता सार्वजनिक बांधकाम विभागावर पुलासाठी नवीन जागा शोधण्याची वेळ आली आहे.
सध्या जुन्या पुलाच्या पुढे साधारण ३०० मीटर अंतरावर नवीन जागा निश्चित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या नवीन जागेचा तांत्रिक अहवाल आल्यानंतरच अंतिम जागा ठरवली जाईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. राज्य सरकारने यापूर्वी मंजूर केलेल्या ८ कोटींच्या निधीतूनच या नवीन ठिकाणी पुलाचे बांधकाम केले जाईल, मात्र नवीन रचनेमध्ये जाळ्या बसविण्यात येणार नाहीत. तसेच ग्रामस्थांच्या रहदारीसाठी आवश्यक असलेल्या रस्त्यांना हा पूल जोडण्यासाठी काही खाजगी जमीन संपादित करावी लागणार असून, त्याबाबत संबंधित शेतकऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून त्यांनी जमीन संपादनासाठी सहमती दर्शविली आहे. तांत्रिक आराखडा मंजूर झाल्यानंतर जिल्हा प्रशासन जमीन संपादनाविषयी अंतिम निर्णय घेणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेमुळे आणि नवीन जागा शोधावी लागल्यामुळे पुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यासाठी किमान आणखी वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शहर
- मुंबई: दिंडोशीत माकडांचा उच्छाद! १९ व्या मजल्यवर पोहोचले माकड, वृंदावन सोसायटीचे रहिवासी त्रस्त; वनविभागाकडे कारवाईची मागणी
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा वृद्धाश्रमातील व्हिडिओ व्हायरल झाल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण; मित्राने दिली प्रकृती स्थिर असल्याची माहिती
- मुंबई: ज्ञानेश कुमारांनी कोणत्याही दबावाखाली येऊन राजीनामा देऊ नये: केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा विरोधकांना सणसणीत टोला व पूर्ण पाठिंबा
महाराष्ट्र
- पुणे: लक्ष्मी रोडवरील बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयाला भीषण आग; ७ अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल, मोठी दुर्घटना टळली
- कोल्हापुर: बिबट्याची दहशत! फुलेवाडी-लक्षतीर्थ मार्गावर उसाच्या शेतात शिरला बिबट्या, थर्मल ड्रोनच्या साहाय्याने शोधमोहीम सुरू
- पुणे: १५ ऑक्टोबरपूर्वी किंवा त्यापूर्वीही सुरू करता येणार ऊस गाळप हंगाम; साखर आयुक्त कार्यालयाचा मोठा निर्णय
- मुंबई: दिंडोशीत माकडांचा उच्छाद! १९ व्या मजल्यवर पोहोचले माकड, वृंदावन सोसायटीचे रहिवासी त्रस्त; वनविभागाकडे कारवाईची मागणी
गुन्हा
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- तमिळनाडू: थलापती विजय सरकारची धमाकेदार योजना; बाळ जन्माला येताच सरकारी रुग्णालयात मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!


























Subscribe to my channel



