
Anil Parab Demands Ramdas Kadam Narco Test : शिंदेंच्या शिवसेनेचे रामदास कदम यांच्या आरोपाला ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. रामदास कदम आणि उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट कराच, पण त्यासोबत ज्योती रामदास कदम यांनी १९९३ मध्ये जाळून घेतलं की जाळलं? त्याबाबतही नार्को टेस्ट करण्याची मागणी मी करतो. रामदास कदम यांचं डोकं ठिकाणावर नाही. त्यांनी केलेले आरोप चुकीचे आणि खोटे आहेत. बाळासाहेबांच्या मृत्यूचेही राजकारण केले जातेय. माणसं चोरली, पक्ष चोरले पण काही झाले नाही.त्यामुळे आता बाळासाहेबांच्या मृत्यूचे राजकारण करून उद्धव ठाकरे वाईट असल्याचे दाखवण्याचे काम सुरू आहे. अनिल परब यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत रामदास कदम यांना प्रत्युत्तर दिले.
रामदास कदम यांच्यावर अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार आहे. मातोश्रीवर रामदास कदम झोपलेला बाकडा मी शोधत आहे, असा घणाघात ठाकरेंच्या शिवसेना नेते अनिल परब यांनी केलाय. रामदास कदम यांची नार्को टेस्ट करण्यात यावी. बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताचे ठसे कुणी घेतले? याचीही चौकशी झालीच पाहिजे? त्याशिवाय खेडमधील १९९३ मध्ये ज्योती रामदास कदम यांनी पेटवून घेतलं की पेटवलं? याचीही चौकशी करायला पाहिजे. त्या घटनेचे साक्षीदार माझ्याकडे आहेत, वेळ पडली तर मी त्यांना पुढे आणू शकतो, असे परब म्हणाले.
गृहराज्यमंत्र्यांच्या (योगेश रामदास कदम) आईने पेटवून घेतलं होतं. रामदास कदमांच्या मुलानेच त्याची चौकशी करावी. १९९३ च्या घटनेची चौकशी झालीच पाहिजे. त्याची चौकशी झालीच पाहिजे. खेडमध्ये धुमाकूळ सुरू आहे. जमिनी बळकावल्या, लोकांना त्रास दिला जातोय, या सर्वांचे पुरावे माझ्याकडे आहेत. रामदास कदम यांना मुख्यमंत्री का पाठीशी घालत आहेत? असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला.
मुंबई मनपा त्यांची होऊ शकत नाही. त्यामुळे रामदास कदम यांना पुढे करायचे अन् मूळ मुद्द्यापासून दूर करायचं. शिशूपाल यांचे आता १०० गुन्हे पूर्ण झाले आहेत. त्यांचे सर्व पुरावे येणाऱ्या अधिवेशनात दाखवणार आहे. मुख्यमंत्री यांना इतके पाठीशी का घालतात? यांच्यामुळे मुख्यमंत्री डागाळलेले आहेत. ते वाळूचोर, माफियांना का वाचवत आहेत? माझा सवाल आहे. रामदास कदम यांना बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या विधानावर माफी मागावी लागणार आहेच, अन्यथा कोर्टाच्या कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. रामदास कदम यांनी केलेल्या आरोपातील सत्य बाहेर आलेच पाहिजे? असे अनिल परब म्हणाले.
उद्धव ठाकरे आणि रामदास कदम यांची नार्को टेस्ट करावी. मी शिवसेनाचा आमदार म्हणून सांगतोय, १९९३ मध्ये ज्योती रामदास कदम यांनी जाळून घेतले की जाळून घेण्याचा प्रयत्न केला, याचाही नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मी मागणी करतोय, असे अनिल परब म्हणाले. रामदास कदम यांनी केलेले आरोप निराधार आहेत. बाळासाहेब ठाकरेंना भेटण्यासाठी शेकडो लाखो लोक होते. कोणताही मृतदेह शवपेटीशिवाय ठेवता येतो का? त्यांचे डोकं ठिकाणावर नाही. डॉक्टरांनी सांगितल्यानंतरच मृत्यू जाहीर झाला.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




