मराठवाड्यात ५० दिवसांच्या मोठ्या खंडानंतर पावसाचे पुनरागमन; हवामान विभागाकडून जिल्ह्यांमध्ये 'यलो अलर्ट' जारी

छत्रपती संभाजीनगर: सुमारे पन्नासहून अधिक दिवस पावसाने पाठ फिरविलेल्या मराठवाड्यात बुधवारी (ता. २३) विविध भागांत पावसाने हजेरी लावली. हलका ते मुसळधार असे त्याचे स्वरूप होते. 'ऑक्टोबर हीट'सदृश स्थिती आणि वाढलेल्या उकाड्याच्या पार्श्वभूमीवर झालेला हा पाऊस नागरिकांसाठी काहीसा मोठा दिलासा देऊन गेला.

हिंगोली शहर परिसरात आज जोरदार पावसाने हजेरी लावली. औंढा नागनाथ शहरासह तालुक्यात सलग एक तास मुसळधार पाऊस झाला. मागील दोन-तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली होती, ज्यामुळे प्रचंड उकाडा जाणवत होता. मात्र, दुपारनंतर वातावरणात अचानक बदल झाला आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरवात झाली.

परभणी जिल्ह्यातील मानवत येथे सायंकाळी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. तसेच सेलू शहरासह परिसरातही वारा व विजांच्या कडकडाटासह अधूनमधून पाऊस सुरू राहिला. धाराशिव जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच आठही तालुक्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या, ज्यामध्ये उमरगा व लोहारा तालुक्यांत सर्वाधिक पाऊस नोंदला गेला.

मोठ्या खंडानंतर जालना शहरातही पावसाने हजेरी लावली. सायंकाळी अचानक आकाशात ढगांची गर्दी दाटून आली आणि त्यानंतर सुमारे अर्धा तास शहरात पावसाची रिपरिप सुरू राहिली.

याशिवाय, नांदेड शहरासह जिल्ह्यात दुपारनंतर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी पाच मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, मुंबईतील प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राच्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी २३ ते २६ सप्टेंबरदरम्यान 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. या कालावधीत तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

1 thought on “मराठवाड्यात ५० दिवसांच्या मोठ्या खंडानंतर पावसाचे पुनरागमन; हवामान विभागाकडून जिल्ह्यांमध्ये 'यलो अलर्ट' जारी”

  1. Security was my main worry before joining but I quickly realized how safe this place really is. Every transaction runs smoothly and I never have to stress about hidden rules or long verification waits. The library of titles is massive and keeps getting refreshed with fresh hits. mmbaganx

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *