पतीच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर (Compassionate Appointment) सरकारी नोकरी मिळवणाऱ्या सुनेबाबत राजस्थान उच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निकाल दिला आहे. न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, पतीच्या मृत्यूनंतर अनुकंपा नोकरीवर लागलेल्या सुनेला तिच्या मासिक पगारातील २५ टक्के रक्कम सासूला देणे बंधनकारक आहे. न्यायमूर्ती आनंद शर्मा यांच्या एकल पिठाने 'अजमेर विद्युत वितरण निगम लिमिटेड' (AVVNL) ला निर्देश दिले आहेत की, त्यांनी सुनेच्या मासिक पगारातून २५ टक्के रक्कम कापून ती दरमहा सासूच्या बँक खात्यात जमा करण्याची व्यवस्था करावी.
नेमकं काय आहे प्रकरण? याचिकाकर्ते चोथ मल वर्मा आणि त्यांच्या पत्नी कमली देवी यांनी राजस्थान उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांचे सुपुत्र सुभाष चंद्र वर्मा हे 'अजमेर विद्युत वितरण निगम लिमिटेड' (AVVNL) मध्ये टेक्निकल हेल्पर पदावर कार्यरत होते. मार्च २०१७ मध्ये दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. मुलाच्या निधनानंतर त्याच्या पत्नीला (ममता रानी) अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळवून देण्यासाठी सासू-ससासरा आणि कुटुंबाने आपली 'ना हरकत प्रमाणपत्र' (NOC) दिले होते.
नोकरी मिळवताना त्या महिलेने कुटुंबातील इतर सदस्यांची देखभाल आणि भरण-पोषण करण्याचे प्रतिज्ञापत्र (Affidavit) व लिखित हमी दिली होती. परंतु, अनुकंपा नोकरी मिळाल्यानंतर काही काळाने त्या सुनेने आपले सासर सोडले, दुसऱ्यांदा विवाह (पुनर्विवाह) केला आणि मयत पतीच्या वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करण्यास साफ नकार दिला. तसेच त्यांना आर्थिक मदत देण्याचेही बंद केले. याविरोधात वृद्ध सासू-ससाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली.
न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण: या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने स्पष्ट केले की, अनुकंपा नियुक्ती हा कोणताही केवळ वैयक्तिक अधिकार किंवा विशेषाधिकार नसून, तो अचानक कमावत्या व्यक्तीचे निधन झालेल्या संपूर्ण कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठीचा एक कल्याणकारी उपाय आहे. नोकरी मिळवल्यानंतर कुटुंबाला वाऱ्यावर सोडणे आणि दिलेली वचने पाळाण्यास नकार देणे योग्य नाही.
न्यायालयाने एवीवीएनएल (AVVNL) प्रशासनाला आदेश दिले की, संबंधित महिला कर्मचाऱ्याच्या नियमित मासिक पगारातून २५ टक्के रक्कम थेट सासूच्या बँक खात्यात जमा केली जावी. सासूच्या हयातीपर्यंत ही व्यवस्था अशीच सुरू राहणार आहे. तसेच, मयत कर्मचाऱ्याचे उर्वरित टर्मिनल बेनिफिट्स (Terminal Benefits) देखील विधवा पत्नी आणि आई यांच्यामध्ये समान म्हणजेच ५०-५० टक्के वाटून देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या निकालानंतर कायदेशीर वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
शहर
- नाशिक: डोंगरदऱ्या अन् कडेकपारीत जीवाची बाजी लावून मदतीला धावणारी सह्याद्रीची २२ वर्षीय धाडसी 'वाघीण' तनया कोळी!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: पिंपरी-चिंचवडमधील शिल्पा गवारे आत्महत्या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल; लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होणार!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: राजकारणात मोठी खळबळ! शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्त्वाची गुप्त बैठक; जयंत पाटीलही उपस्थित!
- सातारा: दुष्काळामुळे पशुखाद्याचा प्रश्न गंभिर; जिल्ह्यातून बाहेर चारा विक्री व वाहतूक करण्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून सक्त मनाई!
- पुणे: छतावरून गॅलरीत शिरून घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; वानवडी पोलिसांकडून ९ महिन्यांनंतर ५ जणांना बेड्या, ७.५ लाखांचे सोने जप्त!
- नाशिक: डोंगरदऱ्या अन् कडेकपारीत जीवाची बाजी लावून मदतीला धावणारी सह्याद्रीची २२ वर्षीय धाडसी 'वाघीण' तनया कोळी!
गुन्हा
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर


























Subscribe to my channel




