मेक्सिकोमध्ये मोठी खळबळ उडालीये. मेक्सिको सुरक्षा दलांनी रविवारी जगातील सर्वात धोकादायक ड्रग्ज तस्करापैकी एकाची हत्या केली. ज्यानंतर मोठी हिंसा झाली. जलिस्को न्यू जनरेशन कार्टेल (सीजेएनजी) चा प्रमुख नेमेसियो रुबेन ओसेगुएरा यांना ठार मारले. त्याच्या हत्येनंतर मोठी खळबळ उडाली आणि मोठी हिंसा पेटली. सध्या परिस्थिती तणावात असल्याचे सांगितले जात आहे. बंदुकधारी काही लोकांनी वाहनांना मोठी आग लावली. सुरक्षारक्षकांकडून या लोकांवर कारवाई केली जात आहे आणि त्यांना अटक केली जात आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता प्रयत्न केली जात आहेत. सध्याची परिस्थिती लक्षात घेता सरकारकडून शाळा बंद केल्या आहेत.
यासोबतच पंतप्रधान क्लाउडिया यांनी लोकांना शांत राहण्याचे आव्हान केले. मिळालेल्या माहितीनुसार, प्यूर्टेा वल्लार्टा आणि त्याच्या आसपास हिंसा सुरू झाली. या हिंसेवर नियंत्रण मिळवण्याकरिता सुरक्षादलांनी सकाळी मोठे सैन्य ऑपरेशन राबवले. जलिस्को, कोलिमा, मचोआकन आणि गुआनाजुआटो मधील राज्यात वाहनांना आणि इमारतींना आग लावून हायवे ब्लॉक करण्यात आला.
या जाळपोळीमुळे हवेत फक्त आणि फक्त मोठा धूर बघायला मिळाला. मेक्सिकोमधील हिंसाचाराचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसली. ग्वाडालाजारा एअरपोर्टवर लोक घाबरून इकडे तिकडे पळताना व्हिडीओमध्ये दिसले. सुरक्षा रक्षकांकडून नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही राज्यांमधील भीषण हिंसा लक्षात घेता राज्यपाल पाब्लो लेमन यांनी लोकांच्या घरामध्येच राहण्याचा सल्ला दिला.
सुरक्षा कारणांमुळे काही सेवा देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. जोपर्यंत परिस्थिती ही पूर्णपणे नियंत्रणात येणार नाही, तोपर्यंत शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. नेमेसियो रुबेन हा अगोदर पोलिस विभागात कामाला होता. तो अमेरिकेत काही वर्ष वास्तव्यास होता, त्यानंतर त्याला मेक्सिकोमध्ये पाठवण्यात आले. त्याने ड्रग्ज तस्करीचे मोठे साम्राज्य निर्माण केले, अखेर त्याला मारण्यात मोठे यश मिळाले.
शहर
- मुंबईतील ताज हॉटेलला बीएमसीचा दणका: रस्ता आणि पदपथ वापरासाठी तब्बल २७ कोटींची नोटीस बजावली"
- नागपूर: एसीबीचा धक्कादायक अहवाल; लाचखोरीत महसूल विभाग अव्वल, पोलिस विभाग दुसऱ्या क्रमांकावर
- लोणी काळभोर पोलिसांचा अंमली पदार्थांवर दणका: गांजा सेवन करणाऱ्या सात जणांना रंगेहात अटक; धडक कारवाईने खळबळ
- पुणे: पोलिसांची मोठी कारवाई! मोबाइल दुकान मालकाच्या हत्येच्या प्रयत्नातील 'घायवळ गँग'चा प्रवीण गुंड प्रशांत धुमाळ मुंबईतून जेरबंद
महाराष्ट्र
- कोल्हापूर: जिल्हा परिषद निवासी क्रीडा शाळेत चार विद्यार्थ्यांना उंदरांचा चावा; स्वच्छतेच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्न
- मुंबईतील ताज हॉटेलला बीएमसीचा दणका: रस्ता आणि पदपथ वापरासाठी तब्बल २७ कोटींची नोटीस बजावली"
- नागपूर: एसीबीचा धक्कादायक अहवाल; लाचखोरीत महसूल विभाग अव्वल, पोलिस विभाग दुसऱ्या क्रमांकावर
- लोणी काळभोर पोलिसांचा अंमली पदार्थांवर दणका: गांजा सेवन करणाऱ्या सात जणांना रंगेहात अटक; धडक कारवाईने खळबळ
गुन्हा
- मुंबईत घर खरेदी महागणार! मालमत्ता नोंदणी शुल्कात ३० हजारांवरून ५० हजारांपर्यंत वाढ करण्याच्या विचारात महायुती सरकार
- जळगाव: विवाहितेचे अपहरण करून अत्याचाराचा आरोप; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
- "छत्रपती संभाजीनगर हादरले: विवाहित शिक्षिकेवर पोलीस उपनिरीक्षकाकडून लैंगिक अत्याचार; प्रेमाचे जाळे विणून केली मारहाण"
- नागपूरच्या खापरखेड्यात भीषण अपघात: दोन कारची समोरासमोर धडक; कारचालकाचा जागीच मृत्यू, अनेक जखमी"
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- टाकाऊतून टिकाऊ: बहराइचच्या महिला कैद्यांनी गव्हाच्या पेंढ्यांपासून साधली प्रगती; 'ओडीओपी' योजनेमुळे मिळाली हक्काची कमाई"
- नवी दिल्ली: डोंगरावरून ढकलून ऐतिहासिक तोफा चोरल्या; वारसा सुरक्षेवर गंभीर प्रश्न
- नवी दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसची रणनीती तयार, 'हे' मुद्दे गाजणार!
- हैदराबाद: आंध्र प्रदेशात मंदिराच्या दर्शनाला जाण्याचा बहाणा, पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या


























Subscribe to my channel


