पुणे: सतत सुरू असलेल्या पावसामुळे खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत आहे. गुरुवारी (२३ जुलै) सकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार, खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमध्ये मिळून २१.०२ TMC म्हणजेच ७२.१२ टक्के पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे.
गेल्या २४ तासांत चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने एकूण १,८९९ MCFT पाण्याची आवक झाली. मात्र, गेल्या वर्षी याच दिवशी धरणसाखळीत २३.३० TMC (७९.९४%) पाणीसाठा होता. त्यामुळे यंदाचा साठा अद्याप मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे.
खडकवासला धरण ८८.५२% भरले
खडकवासला धरण परिसरात २४ तासांत १३ मिमी पावसाची नोंद झाली. धरणात सध्या १.७५ TMC (८८.५२%) पाणीसाठा असून ४७१ MCFT पाण्याची आवक झाली आहे. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून आतापर्यंत १.५१ TMC पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
पानशेत आणि वरसगावमध्ये समाधानकारक वाढ
पानशेत धरण परिसरात ८४ मिमी पाऊस झाला असून धरणातील पाणीसाठा ८.१४ TMC (७६.४४%) इतका झाला आहे. येथे ५८० MCFT पाण्याची आवक नोंदविण्यात आली.
वरसगाव धरणात ६९ मिमी पाऊस झाला. धरणात ९.११ TMC (७१.०५%) पाणीसाठा असून ६३४ MCFT पाण्याची आवक झाली आहे.
टेमघरमध्ये सर्वाधिक पाऊस
चारही धरणांमध्ये टेमघर परिसरात सर्वाधिक १९७ मिमी पावसाची नोंद झाली. धरणातील पाणीसाठा २.०३ TMC (५४.६८%) असून २१४ MCFT पाण्याची आवक झाली आहे. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणसाखळीतील पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पावसाची नोंद (मि. मी.)
कुरवंडे १११, भोर ६३.५, तळेगाव २६.५, निमगिरी १७.५, चिंचवड १५.५, पाषाण ९.४, दापोडी ८.०, शिवाजीनगर ७.६, बारामती ७.०, एनडीए ६.५, राजगुरुनगर ६.०, डुडुळगाव ६.०, इंदापूर ५.०, कोरेगाव पार्क ४.५, हडपसर ४.०, शिरूर २.०, दौंड १.५, हवेली १.०, नारायणगाव ०.५.
शहर
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
महाराष्ट्र
- कोल्हापूर: टेम्पोतून उतरताना बैल उधळला, पकडायला गेले अन् जीवाला मुकले! आजरा तालुक्यात तारेच्या कुंपणाचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू; मायलेकरांवर गुन्हा दाखल
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
गुन्हा
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
- ठाणे: शहापुरात संतापजनक घटना: ओळखीच्या तरुणाचे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोटदुखीतून धक्कादायक प्रकार उघड
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: विधानसभेचे १६ डिसेंबरला एकदिवसीय अधिवेशन; विरोधकांचा 'लोकशाहीचा अपमान' म्हणत हल्लाबोल
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
























Subscribe to my channel




