
Pune : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीएला आता वर्तुळाकार रस्ता, रिंग रोड प्रकल्पासाठी काही अडचणी येत आहेत. या प्रकल्पासाठी संरक्षण विभागाची जमीन अद्याप ताब्यात येणं बाकी आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील सोलू ते वडगाव शिंदे या जागेची निविदा काढण्यात अडचण येत आहे. त्यामुळे आता आणखी काही काळ नगर रस्त्यावरून दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे. 'पीएमआरडीए'च्या रिंग रोडचं ग्रहण सुटत नसल्याचं चित्र आहे.
बाहेरून येणारी अवजड वाहनं पुणे शहरात येऊ नयेत, तसंच पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी रिंग रोड महत्त्वाचा आहे. महत्त्वाची बाब म्हणजे १९९७ मध्ये हा रस्ता पुणे जिल्हा प्रादेशिक योजनेत प्रस्तावित करण्यात आला. मात्र, आजपर्यंत तो मार्गी लागलेला नाही. पहिल्या टप्प्यात सोलू, निरगुडे ते वडगाव शिंदे अशा पाच किमीच्या रस्त्याचं काम हाती घेतलं आहे. पण यासाठी भूसंपादन प्रस्ताव 'पीएमआरडीए' ने जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवला होता. त्यानुसार वन आणि संरक्षण विभाग वगळून इतर जागा ताब्यात आली आहे.
|
Vashi Fire : नवी मुंबईत उंच इमारतीत भीषण आग; चिमुकलीसह चौघांचा मृत्यू, कारण ऐकून थरकाप उडेल |
पहिला टप्प्यातील 23 हेक्टर जागा सोलू ते वडगाव शिंदे दरम्यान असून ती वन आणि संरक्षण विभागाची आहे. त्यापैकी वन विभागाची जागा मिळण्याबाबत राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यानुसार जागा 'पीएमआरडीए'ला मिळेल. मात्र संरक्षण विभागाची जागा ताब्यात नसल्याने निविदा काढण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, अशी माहिती पीएमआरडीए, महानगर आयुक्त, डॉ. योगेश म्हसे यांनी दिली आहे.
'पीएमआरडीए'ने अर्थसंकल्पात 145 कोटी 75 लाख रुपयांची तरतूद या रस्त्यासाठी केली आहे. 65 मीटर रुंद आणि 128 किमी लांबीचा हा रस्ता आहे. सोलू ते निरगुडे आणि निरगुडे ते वडगाव शिंदे असे दोन भाग करण्यात आले आहेत. सोलू ते वडगाव शिंदे या 4.7 किमी लांबीच्या पहिल्या टप्प्याचं काम सुरू आहे. या पहिल्या टप्प्यामुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. मावळ तालुक्यातील परंदवडी ते खेड तालुक्यातील सोलू असा ४० किमीचा हा रस्ता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) विकसित करणार आहे. या रस्त्याला राज्य सरकारकडून सर्व मान्यता प्राप्त झाल्या आहेत.
- हा रिंग रोड, रस्ता एकूण 44 गावांतून जाणार आहे
- खेडमधील 1, हवेली 27, मुळशी 10 आणि मावळमधील 6 गावांचा या रस्त्यात समावेश
- प्रकल्पासाठी 743.41 हेक्टर जागा आवश्यक
- एकूण 128 किलोमीटर लांबीचा रस्ता असून, त्यापैकी सुमारे 83 किलोमीटर लांबीचं काम 'पीएमआरडीए' करेल, ४० किमीचं काम 'एमएसआरडीसी', तर ५.७० किमीचं काम महापालिका करणार आहे.
शहर
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- पुणे: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा निश्चित; २४ ऑक्टोबरला करणार 'प्रेरणास्थळा'चे उद्घाटन, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा!
- नाशिक: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ६ हजार आदिवासी करणार भव्य गोदाआरती; सिंहस्थ कुंभमेळा तयारीनिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन!
महाराष्ट्र
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- कोल्हापूर: निधी मिळत नसल्याने महायुतीच्या सदस्यांना सत्तेत आल्याचा पश्चाताप; आमदार सतेज पाटील यांचा मोठा दावा!
- जळगाव: महाराष्ट्रात दिवाळीनंतर होणार मंत्रिमंडळ विस्तार? आमदार बच्चू कडू यांचे मोठे भाकीत, जळगावमधून किशोर पाटलांना मंत्री करण्याची मागणी!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!




























Subscribe to my channel




