पुणे जिल्ह्यात पावसाचे थैमान! एक्सप्रेसवेवर भीषण दरड कोसळली, दोन्ही हायवे बंद; इंद्रायणीला पूर, आळंदीत दुकानांमध्ये शिरले पाणी

पुणे: पुणे जिल्हा आणि घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार आणि कोसळधार पावसामुळे प्रचंड दाणादाण उडाली आहे. पुणे आणि रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या या अतिवृष्टीमुळे आणि घाटात दरड कोसळण्याच्या भीषण घटनांमुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग (एक्सप्रेसवे) तसेच जुना मुंबई-पुणे महामार्ग या दोन्ही मुख्य मार्गांवरील वाहतूक दोन्ही बाजूंनी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणावर दरड आणि पाषाण कोसळल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने दोन्ही दिशांनी जाणारी वाहने थांबवली आहेत. यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून मोठी कोंडी निर्माण झाली आहे. आपत्कालीन यंत्रणा, पोलीस आणि महामार्ग प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून राडारोडा हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, पावसाचा जोर कायम असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत.

आळंदीत पूरस्थिती, इंद्रायणी नदीला पूर: दुसरीकडे, पुणे जिल्ह्यातील संततधार पावसामुळे पवित्र इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीला पूर आला आहे. या पुरामुळे आळंदी येथील प्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिर परिसर आणि लगतच्या बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले आहे. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने पुढील २४ तास पुणे आणि रायगडच्या घाटमाथ्यासाठी अत्यंत धोक्याचे असल्याचे सांगत 'रेड अलर्ट' जारी केला आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

इतर

मनोरंजन

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *