
Pune Crime News : पुण्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट दारुविरोधात मोहीम राबवली असून त्यांनी मोठी कारवाई केली आहे. जुना मुंबई पुणे हायवेवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट दारूच्या 60 हजार बाटल्या जप्त केल्या आहेत. 600 बॉक्समध्ये लपवण्यात आलेल्या बनावट मद्याची किंमत 21 लाख रुपये इतकी असल्याचं सांगण्यात येतेय. जुन्या मुंबई पुणे मार्गावर असलेल्या मामुर्डी गावाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही धडक कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, 23 जानेवारी रोजी एक ट्रक जुना मुंबई पुणे हायवे रोडवर, मामुरडी गावाजवळ येथून जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. यानुसार, सापळा रचून अधिकारी कर्मचाऱ्यांनी तो ट्रक अडवला आणि त्याची तपासणी केली. या ट्रक मध्ये गोवा राज्यात निर्मित बनावट देशी दारू रॉकेट असल्याचं समोर आले. पोलिसांनी संत्रा 90 मि.ली. क्षमतेच्या 60,000 बाटल्या (600 बॉक्स) एव्हढा मुद्देमाल मिळून आला. या मुद्देमालाची किंमत तब्बल 21 लाख रुपये इतकी आहे. या गुन्ह्यात 15 लाखाच्या वाहनासह एकूण 36 लाख रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.
|
|
गोव्यात जाऊन धडक कारवाई, 38 लाखांचा मुद्देमाल जप्त
जप्त बनावट देशी मद्य हे गोवा राज्यातील वडावल या ठिकाणी एका पत्र्याच्या गोडावूनमध्ये तयार केले जात आहे. गोव्यात तयार होणारं बनावट मद्याची विक्री महाराष्ट्र राज्यात केली जात होती असल्याचं तपासात समोर आले आहे. बनावट मद्याबाबतची माहिती समजल्याने या पथकामार्फत गोवा राज्यात जाऊन बनावट देशीमद्य निर्मितीच्या कारखान्यावर छापा घालून बनावट देशी मद्य तयार करण्यासाठी लागणारा 1 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल सीलबंद करण्यात आला आहे. झुल्फिकार ताज आली चौधरी व अमित ठाकूर आहेर या दोघांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. या कारवाईत आतापर्यंत 38 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
शहर
- अमरावती: रिद्धपूर येथे स्कूल बसमधून उतरताना पडून ७ वर्षांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.
- सातारा: जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला; कोयना धरणाचे विसर्ग कमी, धरणाचे वक्र दरवाजे दोन फुटांवर खाली आणले.
महाराष्ट्र
- अमरावती: रिद्धपूर येथे स्कूल बसमधून उतरताना पडून ७ वर्षांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
- कोल्हापुर: कबनुरात रील बनवताना तरुणाच्या डोक्यात घुसली गोळी; दुचाकीवरून पडल्याचा बनाव सिटी स्कॅनने उघडकीस.
- रत्नागिरी: मूल होण्यासाठी औषध व विधीचे आमिष दाखवून सव्वा लाखांचे दागिने लंपास.
गुन्हा
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.
- कोल्हापुर: कबनुरात रील बनवताना तरुणाच्या डोक्यात घुसली गोळी; दुचाकीवरून पडल्याचा बनाव सिटी स्कॅनने उघडकीस.
- मुंबई: सायबर भामट्यांचा प्रताप! कंपनीच्या संचालकांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप डीपी आणि टीम्स ग्रुप तयार करून तब्बल ४.२८ कोटींचा गंडा.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.
- बंगळुरु: २ कोटींच्या विम्यासाठी सलाईनमधून विष देऊन माजी सैनिकाचा खून; प्रियकराच्या सेल्फी व्हिडिओमुळे तीन महिन्यांनी मृतदेह बाहेर काढून पर्दाफाश.
- बिहार: पाटण्यात संतापाचा लाव्हा; भरधाव बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; संतप्त लोकांकडून बस आणि पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड करत आगजनी.
- हैदराबाद: ऑनलाईन बेटिंगचा बळी; युट्यूबवर पाहून हेलियम गॅसच्या सहाय्याने चार्टर्ड अकाऊंटंटने संपवले जीवन
























Subscribe to my channel



