
Delhi : दिल्लीतल्या जंतर-मंतर येथे सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनात गोंधळ झाला आहे. या आंदोलकांनी नवीन संसद भवनावर मोर्चा काढण्याच्या प्रयत्न केला. पोलिसांनी या आंदोलक कुस्तीपटूंना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये विनेश फोगट, साक्षी मलिक, संगीता फोगट आणि बजरंग पुनिया यांचा समावेश आहे. या कुस्तीपटुंच्या नेतृत्वाखालीच जंतर-मंतरवर आंदोलन सुरु आहे.
भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या अटकेची मागणी करत कुस्तीपटूंनी आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनाला एक महिना झाला. ब्रिजभूषण यांना अटक करा असी मागणी हे कुस्तीपटू सातत्याने करत आहेत. ब्रिजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रविवारी नवीन संसद भवनासमोर कुस्तीपटूंनी महिला महापंचायतीची घोषणा केली होती.
नव्या संसद भवनाच्या दिशेने मोर्चा काढणाऱ्या या कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी पोलीस आणि कस्तीपटूंमध्ये वाद झाल्याचे समोर आले. ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनानंतर कुस्तीपटू आणि खाप पंचायतीने नवीन संसद भवनासमोर 'महिला पंचायत'ची हाक दिली होती. त्यासाठीच आंदोलक कुस्तीपटूंनी जंतरमंतर येथून मोर्चा काढला होता. त्यादरम्यान पोलिसांनी आंदोलनकांना अडवण्याचा प्रयत्न केला असता पोलीस आणि कुस्तीपटूंमध्ये बाचाबाची झाली.
हातात तिरंगा घेऊन नवीन संसद भवनापर्यंत पोहोचण्यासाठी कुस्तीपटूंनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेडिंग ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांशी झालेल्या चकमकीत फोगट बहिणी जमिनीवर पडल्या. एवढेच नाही तर पोलिसांनी साक्षी मलिकसह बजरंग पुनिया, विनेश फोगट यांना ताब्यात घेतले. यामुळे सध्या जंतर-मंतर परिसरामध्ये गोंधळाचे वातावरण आहे. कुस्तीपटूंना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या खुर्च्या, तंबू आणि इतर सामान जंतरमंतरवरून हटवण्यात येत आहे. पोलिसांनी रोखल्यानंतर कुस्तीपटू केरळ हाऊसजवळ ठिय्या मांडून बसले आहेत. येथून संसद भवन हाकेच्या अंतरावर आहे.
दरम्यान, भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करत एका महिन्याहून अधिक काळ जंतरमंतरवर उपोषणाला बसलेल्या कुस्तीपटूंमध्ये फूट पडली आहे. शनिवारी संध्याकाळी कुस्तीपटूंच्या एका गटाने आंदोलन संपविण्यास सहमती दर्शवली. तर दुसऱ्या गटाने ब्रिजभूषणला अटक होईपर्यंत कोणत्याही किमतीत आंदोलन थांबवणार नसल्याचे सांगितले. या मुद्द्यावरून शनिवारी संध्याकाळी त्यांच्यात हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे.
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




