
PM Modi : लोकसभा निवडणूकीसाठी भाजपचा जाहीरनामा समोर आला आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज भाजपच्या जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. आजचा दिवस शुभ आहे. देशातील अनेक राज्यात नवीन वर्षाचा आनंद आहे. केरळ, तामिळनाडू, ओडिसा, बंगालमध्ये शुभ दिवस असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीची पूजा करतो. आई कात्यायनीच्या दोन्ही हाती कमळ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे या शुभ दिनी भाजपचं संकल्पपत्र समोर ठेवलं आहे.
देशातील अनेक सक्रिय नागरिकांनी हे संकल्पपत्र तयार करण्यासाठी सूचना पाठवल्या होत्या. विकसित भारताच्या ४ स्तंभावर हे संकलपत्र फोकस करत आहे. भाजपच्या संकल्पपत्रात युवा भारताच्या युवा संकल्पाची युवा आकांशा आहे. भाजपने दिलेले सर्व आश्वासनं पूर्ण केलेली आहेत. सबका साथ सबका विकास हेच भाजप ध्येय असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. तृतीयपंथीयांना प्रतिष्ठा देण्याचा निर्णय घेतला. त्यांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे. १ कोटी लखपती दीदी बनल्या आहेत.आता ३ कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याची गॅरंटी दिली आहे. गावच्या मुलींना पायलट बनवण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
|
|
मोफत राशनची योजना पुढचे ५ वर्ष सुरू असेल. गरिबाच्या जेवणाच ताट त्याच्या मनाला समाधान देणार असेल, ही मोदींची गॅरंटी आहे. आयुष्मान भारतमध्ये मोफत उपचार मिळत राहतील. भाजपने संकल्प केला आहे, ७० वर्षाच्या पुढील व्यक्तीला आयुष्मान योजनेत आणल जाणार आहे. त्याला ५ लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे. महिला खेळाडूंना पुढे जाण्यासाठी विशेष सुविधा बनवल्या जाणार आहे. कॅन्सरमुक्तीसाठी योजना चालवणार आहे. ग्रामीण भागातील सगळ्यांना सशक्त करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. पीएम किसान योजनेचा फायदा पुढे सुरू राहील. देशातील सहकारी संस्थांची संख्या वाढवली आहे. आत्मनिर्भरतेसाठी शेतकऱ्यांना प्रत्येक प्रकारची मदत करेल. शेतकऱ्यांना मोतीच्या शेतीसाठी प्रोत्साहन दिलं जाणार आहे. भाजपचा संकल्प भारताला फूड प्रोसेसिंग हब बनवणारा आहे, असं पंतप्रधान मोदी म्हटले आहेत.
परिवार वाढत असल्याने आणखी ३ कोटी घर बांधण्याचा संकल्प करत आहोत. पाईपने प्रत्येक घरी गॅस पोहोचण्यासाठी काम करणार असल्याचं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. मुद्रा योजनेतील निधीची मर्यादा २० लाख करण्यात येणार आहे. मोदींनी प्रधानमंत्री अवास योजनेच्या लाभ मिळालेल्या व्यक्तीला, (Politics) किसान योजनेचं योजनेच्या लाभ मिळालेल्या व्यक्तीला आणि छत्तीसगडच्या बस्तरमधून आलेल्या महिलेला उज्वला योजनेचा लाभ मिळाला आहे, त्यांना संकल्प पत्र दिलं आहे. पुढच्या वर्षी बिरसा मुंडा यांची जयंती राष्ट्रीय स्तरावर साजरी केली जाणार. सर्वांत जुनी भाषा तमिळ भाषा देशाची गौरव भाषा आहे. भाजप इको टुरिझमचे सेंटर बनवणार आहे.
पुढच्या वर्षी बिरसा मुंडा यांची जयंती राष्ट्रीय स्तरावर साजरी केली जाणार. सर्वांत जुनी भाषा तमिळ भाषा देशाची गौरव भाषा आहे. भाजप इको टुरिझमचे सेंटर बनवणार आहे. अनेक लहान लहान अनेक गोष्टींचा विचार करून आम्ही योजना तयार केल्या आहेत. 6G वर काम सुरू आहे. जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन मिळतील यासाठी प्रयत्न करत आहोत. सोशल, फिजिकल, डिजिटलचा विस्तार करणार आहे.
अजेंडा तयार करण्यासाठी भाजपने नुकतीच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. या समितीने अनेक बैठका घेऊन जाहीरनामा अंतिम केला आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, पीयूष गोयल, स्मृती इराणी, धर्मेंद्र प्रधान, अश्विनी वैष्णव, किरण रिजिजू आणि अर्जुनराम मेघवाल यांच्याशिवाय गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि माजी केंद्रीय मंत्री रवींद्रभाई पटेल यांच्यासह एकूण २७ नेते सहभागी झाले होते. शंकर प्रसाद हे या समितीचे सदस्य आहेत.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!



























Subscribe to my channel



