
Pune : शहरात पेट्रोल पंपांवर वाढलेली गर्दी आणि काही पंप बंद असल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमावर आता स्पष्टता आली आहे. पेट्रोल असोसिएशनच्या कोअर कमिटीचे सदस्य अली दारुवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही परिस्थिती तुटवड्यामुळे नसून तांत्रिक आणि आर्थिक कारणांमुळे निर्माण झाली आहे. अचानक क्रेडिट विड्रॉ केल्यामुळे अनेक पेट्रोल पंप चालकांना अडचणींचा सामना करावा लागला. पेट्रोलचा तुटवडा नसून, काही पंप मालकांकडे आगाऊ इंधन खरेदी करण्यासाठी आवश्यक पैसे नसल्यामुळेच पंप बंद ठेवावे लागले आहेत. जे पंप चालक ॲडव्हान्स पेमेंट करू शकले नाहीत, त्यांचेच पंप सध्या बंद आहेत, असं अली दारुवाला यांनी स्पष्ट केलं आहे.
“पेट्रोलचा भाव एकही रुपया वाढणार नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी नागरिकांना दिलासा दिला. देशात इतका मोठा साठा उपलब्ध आहे की साठवण्यासाठी जागा कमी पडेल, असेही त्यांनी सांगितले. मात्र, लॉकडाऊनच्या भीतीमुळे नागरिक गरजेपेक्षा जास्त पेट्रोल साठवून ठेवत आहेत. एक-दोन लिटरऐवजी थेट 10 लिटर पेट्रोल घेण्याची घाई सुरू असल्याने पंपांवर अनावश्यक गर्दी होत आहे. नागरिकांनी पंपांवर गर्दी करू नये आणि जास्तीचे पेट्रोल साठवू नये", असे आवाहन त्यांनी केले आहे. "सध्या दिसणारी परिस्थिती ही केवळ अफवांमुळे निर्माण झालेली असून, प्रत्यक्षात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही", असं अली दारुवाला यांनी स्पष्ट केलं.
'१०० जहाजे भारताच्या दिशेने रवाना'
दरम्यान, "एक सकारात्मक आणि अतिशय चांगली गुडन्यूस समोर आली आहे. आज दुपारी साडेबारा वाजता इराणचे परराष्ट्र मंत्री आणि भारताचे परराष्ट्र मंत्री यांच्यात बैठक झाली. त्यानंतर इराणने भारतासह जगातील पाच देशांना इंधन वाहतुकीसाठी परवानगी दिली आहे. भारताकडे निघालेले सर्व टँकर्स पुढील ८ ते ९ दिवसांत सुरक्षितपणे पोहोचणार आहेत. भारताला पेट्रोल, डिझेल, एलपीजी, सीएनजी आणि एलएनजीचा पुरवठा करण्यासाठी जवळपास १०० जहाजे भारताच्या दिशेने रवाना झाली आहेत. पुढील ९ ते १० दिवसांत हा पुरवठा देशात पोहोचणार आहे", अशी माहिती अली दारुवाला यांनी दिली.
'परिस्थिती सुरळीत होणार'
याशिवाय, "सरकारला इंधनावर लिटरमागे सुमारे ५० रुपयांचा फटका बसत असल्याने सध्या ॲडव्हान्स पेमेंट घेऊनच इंधन पुरवठा केला जात आहे. तसेच पीएनजी पाइपलाईनचे रखडलेले कामही उद्यापासून पूर्ण होणार आहे. एकूणच, भारतात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून, पुढील १० ते १२ दिवसांत परिस्थिती पूर्णपणे सुरळीत होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता संयम ठेवावा", असे आवाहन अली दारुवाला यांनी केले.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!



























Subscribe to my channel




